आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स:वॉरेन बफे यांनी अणुबॉम्बशी केली AI ची तुलना, जगात सर्व काही बदलण्याची क्षमता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनी बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी नुकत्याच दिलेल्या निवेदनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ची तुलना अणुबॉम्बच्या निर्मितीशी केली आहे. कंपनीच्या वार्षिक बैठकीत, 92 वर्षीय गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी AI तंत्रज्ञानाच्या जलद वाढीबद्दल आणि ते जग कसे बदलू शकते याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी असा दावा केला की, AI जगातील प्रत्येक गोष्ट बदलू शकते. पुरुषांचे विचार आणि वागण्याशिवाय.

वॉरन बफे यांनी AI वर व्यक्त केली चिंता
वॉरेन बफे यांचा असा विश्वास आहे की, AIच्या स्वतःच्या मर्यादा आहेत, जसे की ते मजेदार विनोद सांगण्यास असमर्थत आहे. तथापि, बफे यांनी सर्व प्रकारचे काम करण्याची एआयची क्षमता मान्य केली आहे आणि त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्या मदतीने चॅटजीपीटी वापरण्याची संधी मिळाल्याचे बफे यांनी नमूद केले.

AI ची तुलना अणुबॉम्बशी करणे आवश्यक
वॉरेन बफे यांच्या मते, एआयची अणुबॉम्बशी तुलना करणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर बफे दीर्घकाळापासून अण्वस्त्रांचे विरोधकही आहेत. ते म्हणतात की, जर त्यांना हल्ल्याची शक्यता कमी कशी करायची हे माहिती असेल तर ते त्यासाठी आपले सर्व पैसे देतील.

बफे म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अणुबॉम्बची निर्मिती आवश्यक होती, परंतु त्याच्या निर्मितीने जगासमोर मोठी शक्ती आणली. ज्याने लोकांचे विचार आणि वागणे सोडून सर्व काही बदलले. पण ते जगासाठी चांगले आहे का?

बफे यांचा AIच्या दीर्घकालीन परिणामांवर जोर
त्याचप्रमाणे वॉरेन बफे यांनी अल्पकालीन फायद्यांऐवजी एआयच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे. बफे यांच्या व्यतिरिक्त, जे लोक त्याच्या विकासात सामील होते त्यांनीदेखील AI बद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हवामान बदलापेक्षा AI चा जास्त धोकादायक
गुगलचे माजी कर्मचारी आणि 'एआयचे गॉडफादर' मानले जाणारे जेफ्री हिंटन यांनीही काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, जगाला एआयचा धोका हवामान बदलापेक्षाही धोकादायक असू शकतो. स्टुअर्ट रसेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स: ए मॉडर्न अ‍ॅप्रोचचे लेखक, यांनीही एआयची तुलना चेर्नोबिल आपत्तीशी केली आहे.

AI च्या निर्मितीमुळे आपत्ती येऊ शकते
स्टुअर्ट रसेल म्हणाले होते की, नियंत्रण न ठेवल्यास एआयच्या निर्मितीमुळे आपत्ती येऊ शकते. रसेल यांनी हेदेखील उघड केले की त्यांनी ओपनएआय आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांना जीपीटी-4 पेक्षा अधिक प्रगत AI मॉडेल्सचा विकास थांबवण्याचे आवाहन करणाऱ्या याचिकेवर स्वाक्षरी केली आहे.