आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Watermelons Of Various Colors Are Now Also Available; An Initiative Of 'Me Shetkari Foundation'

पुणे:आता विविध रंगांची कलिंगडेही उपलब्ध; ‘मी शेतकरी फाउंडेशन’चा उपक्रम

पुणे / जयश्री बोकीलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतून लाल, बाहेरून पिवळे विशाला वाण तर बाहेरून हिरवे व आतून लाल रंगाचे मस्तानी वाण

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली की वेध लागतात ते रसदार फळांचे. या काळात कलिंगड (टरबूज), द्राक्षे, खरबूज अशी विविध फळे आवडीने खाल्ली जातात. ‘मी शेतकरी फाउंडेशन’च्या वतीने आता लाल रंगाच्या जोडीने इतर रंगांची रसदार कलिंगडे उपलब्ध करण्यात आली आहेत. नागरिकांनी या नव्या आणि वेगळ्या फळांचा आस्वाद घ्यावा, म्हणून “कलिंगड आणि खरबूज महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

सामान्यत: लाल रंगाचे कलिंगड बाजारात सहज उपलब्ध असते. मात्र या महोत्सवामध्ये नागरिकांना विविध जातींच्या, वाणांच्या आणि विविध रंगांच्या कलिंगडांचा आनंद घेता येणार आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामातील हा महोत्सव पुढील वर्षीच्या हंगामापर्यंत सुरू असणार आहे. पुण्यातील कात्रज भागात याचे मुख्य कार्यालय असणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे. केवळ कलिंगड आणि खरबूजच नव्हे तर इतर फळे आणि भाजीपालादेखील ग्राहकांना घरपोच मिळणार असल्याची माहिती मी शेतकरी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिली.

या वेळी नोन यू सीडचे उपमहाव्यवस्थापक संदीप कुलकर्णी, राष्ट्रीय विपणन व्यवस्थापक गोवर्धन अगस्ती, मी शेतकरी फाउंडेशनचे प्रसाद पवार, अनिकेत खामकर आणि सारिका सरोदे उपस्थित होते.

संजय देशमुख म्हणाले की, आम्ही विविध प्रकारांची, वाणांची, जातींची फळे किंवा भाजीपाला ग्राहकांना पुरवतो याची माहिती ग्राहकांना वेळोवेळी देत असतो. त्याचबरोबर ग्राहकाने कोणती फळे किंवा भाजी खरेदी केली व कोणती करायला हवी यासाठी तीन महिन्यांपर्यंतच्या सगळ्या नोंदी ठेवतो. आम्ही आमच्या शेतातून ताज्या भाज्या कमीत कमी मनुष्य हाताळणीसह ग्राहकांच्या घरी पोहोचवतो. शेतीमध्ये येणाऱ्या समस्यांवर आम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. शेतकऱ्यांसाठी जागतिक दर्जाची कृषी पद्धती, शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा व ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा मानके आणि सुरक्षित, आरोग्यदायी आणि निरोगी अन्न पोहोचवण्यासाठी मी शेतकरी फाउंडेशन कटिबद्ध आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, त्याचबरोबर तेथे काम करणाऱ्या कामगारांनादेखील योग्य मोबदला मिळावा यासाठी मी शेतकरी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.

आतून लाल, बाहेरून पिवळे विशाला वाण तर बाहेरून हिरवे व आतून लाल रंगाचे मस्तानी वाण
संदीप कुलकर्णी म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हे आमचे प्राधान्य आहे. शेतकऱ्यांचे पीक उत्पादन जास्तीत जास्त करण्याबरोबरच त्यांच्या मालाला जास्तीत जास्त बाजारभाव देण्यासाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान आणि प्रगत साहित्याचा वापर करण्याच्या दृष्टीने आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असतो. कंपनीने विकसित केलेला आतून लाल आणि बाहेरून पिवळा रंग असणारे विशाला जातीचे वाण आणि बाहेरून हिरवा मात्र आतून पिवळा असणाऱ्या मस्तानी वाणाची लागवड करून एका वेगळ्या शेतीची पायवाट आज शेतकरी अवलंबत आहेत. या दोन्ही वाणांबरोबर मन्नत जातीच्या कलिंगडाचीही लागवड फायदेशीर आहे.

बातम्या आणखी आहेत...