आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवेकडे सध्या खूप रोकड आहे, मात्र सध्या गुंतवणूक करावी अशी आकर्षक कंपनी दिसत नसल्याचे म्हटले आहे. ८९ वर्षीय अब्जाधीश बफे यांनी सांगितले की, सध्या गुंतवणुकीयोग्य काहीच नाही. त्यांनी हेही सांगितले की, स्थिती खूप लवकर बदलू शकते किंवा बदलूही शकत नाही. मार्च तिमाही अखेरीस बर्कशायरकडे १३,७०० कोटी(सुमारे १० लाख कोटी रु.) डॉलर रोकड होती. बर्कशायरचे समभागधारक वाट पाहताहेत की, बफे काही रक्कम कुठेतरी गुंतवतील. कोरोना विषाणूमुळे अनेक समभागांत मोठी घसरण आली आहे.
एसअँडपी ५०० फेब्रुवारीच्या विक्रमी पातळीवरून ३५% आले आहेत. याआधी जेव्हा समभागांत अशा पद्धतीची घसरण आली तेव्हा बफे यांनी अशा संधीचा फायदा उचलला होता आणि कंपन्यांत अंशत: मालकी हक्क खरेदी केला. २००८ च्या वित्तीय संकटादरम्यान त्यांनी बँक ऑफ अमेरिका आणि गोल्डमन सॉक्ससारख्या संस्थांमध्ये गुंतवणूक केली. बफे म्हणाले, आम्ही लोक खूप करू इच्छितो. आम्हाला ३, ४ वा ५ हजार कोटी डॉलरची गुंतवणूक करावी,असे वाटते. मात्र, सध्याच्या स्थितीत गुंतवणूक करावी,अशी आकर्षक कंपनी नाही.
अमेरिकेला रोखू शकत नाही : बफे यांनी सांगितले, अमेरिकेचा पाया खूप बळकट आहे आणि यामध्ये कोरोनासारखे संकट झेलण्याची क्षमता आहे. कोणतेही आव्हान अमेरिकेला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही.
बफे यांनी ७ आठवड्यांपासून केस कापले नाहीत, टायही घातला नाही
जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे म्हणाले, कोरोना संकटामुळे त्यांनी ७ आठवड्यांपासून केस कापले नाहीत आणि टायही घातला नाही. कोरोना विषाणू महारोगराई जगात मोठ्या प्रमाणावर लोकांच्या जीवनशैलीत बदल आणेल. येणाऱ्या काळात लोक विमान प्रवासातही कपात करण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, बफे ७,२०० कोटी डॉलर म्हणजे, ५.४० लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.