आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • We Will Increase The Participation Of Private Industries In The Products Required For Railways: Raosaheb Danve

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मागणीला यश:रेल्वेसाठी लागणाऱ्या उत्पादनांमध्ये खासगी उद्योगांचा सहभाग वाढवू : रावसाहेब दानवे

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे विभागासाठी लागणाऱ्या विविध उत्पादनांपैकी खासगी उद्योगांसाठी अधिक उत्पादने खुली करू, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ललित गांधी यांना दिली. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ँड अ‍ॅग्रिकल्चर’चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्लीमधील रेल भवन येथे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन रेल्वे विभागासाठी लागणारी अधिकाधिक उत्पादने खासगी उद्योगांसाठी खुली करून देण्यासाठी केलेल्या मागणीचा पाठपुरावा व अन्य मागण्यांसाठी बैठक आयोजित केली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.

रेल्वेसाठी लागणारे विविध सुटे भाग, उपकरणे उत्पादन करण्याची परवानगी खासगी उद्योगांना दिल्यास मोठ्या प्रमाणावर उद्योग वाढण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी उपयोगी ठरेल, अशी भूमिका ललित गांधी यांनी मांडली.

या वेळी रेल्वे मालवाहतूक, प्रवासी वाहतुकीसंबंधी विविध मागण्याही सादर करण्यात करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक पुणे नवीन रेल्वेमार्गाचे काम तत्काळ सुरू करणे, कोल्हापूर-वैभववाडी या कोकण रेल्वेस जोडणाऱ्या मार्गाचे काम तत्काळ सुरू करणे, नाशिक- पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करणे, कोरोनानंतर सेवा बंद केलेल्या सर्व गाड्या पूर्ववत सुरू करणे, कोरोनाकाळानंतर विविध एक्स्प्रेसचे बंद केलेले सर्व थांबे पूर्ववत सुरू करणे या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश होता.

तसेच कोकण रेल्वेमार्गावरील कुडाळ येथे पार्सल सेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. या सर्व मागण्यांसाठी आवश्यक तो अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश रेल्वे राज्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच १७ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत लखनऊ येथे होणाऱ्या रेल्वेच्या डिझाइन व संशोधन केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनास सहभागी होण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या शिष्टमंडळाला विशेष निमंत्रण दिले.

बातम्या आणखी आहेत...