आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Wealthy Families Set Up Family Legacy Fund To Save Ancestral Businesses During Epidemi; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:महामारीदरम्यान वडिलोपार्जित व्यवसाय वाचवण्यासाठी पुढे येताहेत श्रीमंत घराणी, फॅमिली लीगसी फंडाची स्थापना

न्यूयॉर्क17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्यवसायासाठी संघर्ष करत होते फॅमिली बिझनेस, बँकाही कर्ज देत नव्हत्या

ज्याचं त्याचं दु:ख तोच जाणो असे म्हणतात. अमेरिकी व्यवसायातही अशीच स्थिती समोर आली आहे. महारोगराईच्या या काळात वडिलोपार्जित व्यवसाय चालवणाऱ्या लोकांनी इतरांच्या वडिलोपार्जित व्यवसायाला मदत करण्यासाठी एक फंड स्थापन केला आहे. याच्या मदतीने अनेक वडिलोपार्जित व्यवसाय विकण्यापासून वाचले आणि कौटुंबिक वारसा अबाधित राहिला. या विशेष फंडाची सुरुवात करणारे ७६ वर्षीय चार्ल्स विगर यांना महारोगराई सुरू झाल्यानंतर आपली इन्व्हेस्टमेंट फर्म विकावी लागली होती. त्यांनी व्यवसाय उभा करण्यात अनेक दशके घातली होती. अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाल्याचे विगर यांना जाणवले. यानंतर अर्थव्यवस्था रुळावर येत होती. कधीकाळी सुस्थितीत असणाऱ्या व्यवसायात जम बसवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांना वाटले.

महामारीत अनेक कंपन्या स्वत:ला वाचवू शकणार नाहीत, असे त्यांना वाटले. त्यामुळे विगर यांनी नव्या फंडात गुंतवणूक करण्याचे ठरवले आणि त्याला नाव दिले, फॅमिली लीगसी कॅपिटल. हा फंड संघर्ष करणाऱ्या वडिलोापार्जित व्यवसायाला कर्ज देईल. विगर यांनी सांगितले की, लोक काेणत्या अडचणीत आहेत हे आपण समजू शकतो. ते स्वत:कोणता मोठा व्यापारी समूह नाहीत. अनेकांना वडिलोपार्जित व्यवसायात मदतीची गरज आहे आणि समजूतदार गुंतवणूकदारांकडे हा व्यवसाय वाचवणे आणि चांगला रिटर्न प्राप्त करण्याची एक चांगली संधी आहे. महामारी सुरू होण्याआधी श्रीमंत घराणी अन्य घराण्यांसोबतच्या करारात रस दाखवत होती. अनेक श्रीमंत घराण्यांकडे गुंतवणुकीसाठी बराच पैसा होता. मात्र, ते पारंपरिक गुंतवणुकीत भर देत होते. त्यांच्या गुंतवणुकीतून ते मदत करू शकत होते.

दुहेरी फायदा : श्रीमंतांसाठी गुंतवणूक, व्यवसायासाठी मदत
फॅमिली लीगसी कॅपिटलने पहिली गुंतवणूक एक हायएंड हॉटेलमध्ये केली. महामारीमध्ये ग्राहक न आल्यामुळे या तीन दशके जुन्या वडिलोपार्जित हॉटेलचा व्यवसाय ठप्प झाला होता. यामुळे त्यांना मदत मिळाली आणि हा व्यवसाय त्यांच्याकडेच राहिला. विगर म्हणाले, श्रीमंतांसाठी ही गुंतवणूक आहे, जी फंडाच्या उच्च फीच्या बदल्यात त्यांना चांगला रिटर्न देऊ शकते. तसेच कंपन्यांसाठी कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्याने त्यांच्यासाठी या रोकडची खूप आवश्यकता आहे.

बातम्या आणखी आहेत...