आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशात जायचे त्याला व्हिसा लागणार:VISA काढण्याची प्रक्रिया घ्या जाणून, किती प्रकारचा असतो व्हिजा, वाचा सविस्तर

नवी दिल्ली2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेश प्रवास करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तर अनेकांना ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी देखील मिळते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पासपोर्ट (Passport) आणि व्हिसा (VISA) या दोन गोष्टी आवश्यक असतात.

व्हिसा म्हणजे व्हिजिटर्स इंटरनॅशनल स्टे अ‌ॅडमिशन असे इंग्रजीत संबोधले जाते. दुसऱ्या देशात राहण्यासाठी हा एक प्रकारचा अधिकृत परवानगी कागदपत्र असते. तुम्हाला तुमच्या देशातून पासपोर्ट मिळतो, पण तुम्हाला ज्या देशात जायचे आहे तेथील व्हिसा घ्यावा लागतो. परदेशात जाण्यासाठी व्हिसा असणे अत्यंत आवश्यक आहे. व्हिसा म्हणजे एखाद्या देशाद्वारे आपल्या देशात येणाऱ्या व्यक्तीला परवानगी देणे. तुम्हाला ज्या देशाला भेट द्यायची आहे, त्या देशाचे सरकार तुम्हाला व्हिसा जारी करते. हा व्हिसा पासपोर्टवर किंवा कागदपत्राच्या स्वरूपात स्टॅम्प लावून दिला जातो.

व्हिसाचे किती प्रकार असतात
एखाद्या प्रवाशाला किती दिवस परदेशात किंवा दुसऱ्या देशात जायचे आहे आणि कशासाठी जायचे आहे. या बाबी व्हिसावर लिहलेल्या असतात. व्हिसाचे विविध प्रकार असून त्यासाठी कारण द्यावे लागते. त्यानुसार व्हिसा उपलब्ध करून दिला जातो.

व्हिसाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत

1. नॉन-इमिग्रंट व्हिसा : जर तुम्हाला दीर्घकाळ परदेशात जायचे असेल, तर तुम्हाला नॉन-इमिग्रंट व्हिसा घ्यावा लागेल.

2. इमिग्रंट व्हिसा : जर तुम्हाला परदेशात जाऊन तिथे राहायचे असेल तर तुम्हाला इमिग्रंट व्हिसा घ्यावा लागेल. त्याला ओव्हरसीज व्हिसा असेही म्हणतात.

या दोन व्हिसा व्यतिरिक्त अनेक प्रकारचे व्हिसा

  • ट्रान्झिट व्हिसा
  • टूरिस्ट व्हिसा
  • बिझनेस व्हिसा
  • ऑन अरायव्हल व्हिसा
  • स्टुडन्ट व्हिसा
  • मॅरेज व्हिसा
  • मेडिकल व्हिसा

व्हिसासाठी अर्ज कसा करावा?
1. ऑफलाइन पद्धत

तुम्हाला दूतावासात जावे लागेल आणि तेथे तुम्हाला तुमचे सर्व अधिकृत कागदपत्रे तपासावी लागतील. या संपूर्ण प्रक्रियेत तुमचे घरही तपासले जाते, त्यानंतर तुम्हाला परदेशी व्हिसा मिळतो.

2. ऑनलाइन पद्धत :

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून काम सोपे झाले आहे. इंटरनेटद्वारे व्हिसासाठी अर्ज केल्यास, तुम्हाला तो फक्त पाच दिवसांत मिळू शकतो. यासाठी तुम्हाला छोट्या प्रक्रियेतून जावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...