आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोट फाटली, रंग लागला तर चिंतेत पडू नका:काय सांगतो RBIचा नियम; जाणून घ्या- फाटलेल्या नोटा कशा मिळतात बदलून

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या खिशात असलेल्या नोटांवरून आपल्या मनात अनेक विचार कायम येत असतात. खास करून कोणाकडूनही नोट घेताना आपण नोट फाटकी तर नाही ना, त्यावर काही लिहलेले नाही ना, याची पूर्ण खात्री करून स्विकारतो.

तर आपल्याकडे असलेली अशी फाटकी नोट देखील अनेक दुकानदार घेत नाहीत. चांगली नोट द्या, अशी मागणी दुकानदार देखील आपल्याकडे करतो. अर्थात यात काहीच चूकीचे नाही. मग फाटलेल्या नोटांचे करायचे काय, याबाबत आरबीआयने काय नियम सांगितले आहे.

फाटलेली अन् रंग लागलेली नोट कशी बदलणार आदी प्रश्नांची उत्तरे घ्या जाणून

जर तुमच्याकडे असलेल्या नोटावर कोणताही रंग लागला. आपल्याकडून ती नोट फाटली तर मग आपण काय करायला पाहीजे, असा प्रश्न पडतो. याबाबत आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया अशा नोटांबाबत काय सांगतो, याची माहिती आज आपण यातून घेणार आहोत.

देशात करन्सी जारी करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियावर आहे. अधिनियम के कलम 22 अनुसार भारतात नोट जारी करण्याचा अधिकार आरबीआयला आहे. कायद्याच्या कलम 25 नुसार, नोटांची डिझाईन त्याचे स्वरूप हे रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय बोर्डाच्या संलाचक मंडळाच्या विचारानंतरच केंद्रसरकारच्या मान्यतेच्या अधिन असेल.

नोटांना जर रंग किंवा डाग लागलेला असेल तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया नुसार त्या तरीही या नोटा वैध आहेत. फक्त यामध्ये एकच अट आहे. त्या नोटांवर लिहलेला नंबर मात्र वाचता येण्यायोग्य असला पाहीजे. रिझर्व्ह बॅंकेचे म्हणणे आहे की, नोटेवर जर राजकीय किंवा धार्मिक स्वरूपाचा संदेश लिहलेला असेल तर अशा नोटा बदलता येणार नाही.

कट झालेली किंवा फाटलेली नोटेला तुम्ही कोणत्याही बॅंकेत जाऊन बदलू शकता. रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने वेळोवेळी फाटलेल्या नोटासंदर्भात परिपत्रक जाहीर केलेले आहे. त्यामुळे तुम्ही फाटलेल्या नोटा सहज कोणत्याही बॅंकेत जाऊन बदलू शकता.

रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार, एक व्यक्ती एका वेळी 20 नोटांपेक्षा जास्त नोटा बदलू शकत नाही. तसेच बदल करण्यासाठी आणलेल्या नोटांची एकूण किंमत ही पाच हजारांपेक्षा कमी असली पाहीजे. परंतू पूर्णपणे फाटलेली त्या नोटेचे तुकडे तुकडे झालेले असेल तर असे नोट बदलता येत नाही. नोटा बदलताना बॅंकेत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. ते तुम्ही सहज रित्या बदलू शकता.

या बातम्या देखील जरूर वाचा

पीपीएफ अकाऊंट कसे उघडतात:तुम्हाला कसा होतो फायदा, किती मिळतो परतावा; काय आहेत नियम- वाचा सविस्तर

आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना आणि गुंतवणूकीचा दीर्घकालीन उत्तम म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजनेकडे पाहीले जाते. जी आकर्षण व्याजदर आणि गुंतविलेल्या रकमेवर चांगलावा परतावा देते. परंतू तुम्हाला माहिती आहे का, पीपीएफ अकाऊंट नेमकं कोणाला उघडता येते. त्यासाठी किती खर्च लागतो. वर्षभर किती गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी काय नियम असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घ्या. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

FD आणि RD मध्ये काय असतो फरक:गुंतवणूक कशी कराल, किती मिळेल परतावा, आदी प्रश्नांची उत्तरे घ्या जाणून

गुंतवणूकीचा तसेच पैशांची बचत करण्याचा विषय जेव्हा आपल्या मनात येतो. तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर FD आणि RD हे दोन पर्याय उभे राहतात. पण गुंतवणूक करायची झाल्यास या दोन प्रकारापैकी कशात गुंतवणूक करायची, असा प्रश्न उपस्थित होतो. यापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता, हे त्वरीत समजत नाही. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...