आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुमच्या खात्यासाठी संपूर्ण लॉगिन प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी व्हॉट्सअॅप आता दुहेरी पडताळणी कोड वैशिष्ट्यावर काम करत आहे. यामुळे व्हॉट्सअॅप अकाउंटमध्ये लॉग इन करताना सुरक्षा अधिक सुरक्षित होईल. हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असेल.
व्हॉट्सअॅपच्या फीचरचा मागोवा घेणारी वेबीटाइंफो Wabetainfo या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, या फीचरच्या मदतीने कंपनीला एकापेक्षा जास्त डिव्हाईसवर लॉग इन करण्यापूर्वी त्याच व्हॉट्सअॅप अकाउंटची पडताळणी करावी लागेल. फीचर सुरू केल्यानंतर, जेव्हा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप वर दुसऱ्या डिव्हाइसमध्ये लॉग-इन करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला जुन्या डिव्हाइसवर 6 अंकी कोड मिळेल. तुम्हाला तुमच्या नवीन डिव्हाइसवर हा कोड एंटर करणे आवश्यक आहे. कोड जुळल्यानंतरच, तुम्ही नवीन डिव्हाइसवर व्हॉट्सअॅपवर लॉग इन करू शकाल.
पडताळणी प्रक्रिया मजबूत
6 अंकी कोडमुळे सत्यापन प्रक्रिया मजबूत होईल. जेव्हा तुम्ही नवीन फोनवर व्हॉट्सअॅपवर लॉग इन करता तेव्हा चॅट लोड करण्यासाठी आणि बॅकअप घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर 6 अंकी स्वयंचलित कोड पाठवला जातो. माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते. व्हॉट्सअॅपवर बनावट लॉगिनची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या दुहेरी पडताळणी कोडचा उद्देश WhatsApp लॉगिन प्रक्रिया मजबूत करणे आणि खात्यातील वैयक्तिक माहिती आणि डाटाचा गैरवापर रोखणे हा आहे.
नोटिफिकेशनद्वारे दिली जाईल माहिती
रिपोर्टनुसार, हे फीचर आल्यानंतर, जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाइसवर जुन्या व्हॉट्सअॅपमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला एक सूचना मिळेल. हे व्हॉट्सअॅप अकाऊंट आधीच कोणत्याही डिव्हाईसवर लॉग इन केलेले आहे, असे त्यात लिहिलेले असेल. तुम्हाला अजूनही व्हॉट्सअॅपवर लॉग इन करायचे असल्यास, जुन्या डिव्हाइसमध्ये पाठवलेला कोड नवीन डिव्हाइसवर टाकावा लागेल. अशा प्रकारे लोकांना समजेल की कोणीतरी त्यांच्या खात्यात लॉग इन करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते दुसरा सत्यापन कोड कोणालाही शेअर करणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.