आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:व्हॉट्सअ‌ॅपने मार्चमध्ये 47 लाख खात्यांवर घातली बंदी, यूझर्सने भारतीय कायद्याचे व अ‌ॅप नियमांचे केले उल्लंघन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉट्सअॅपच्या नवीन मासिक अहवालानुसार, कंपनीने वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि नियमांच्या आधारे मार्च 2023 मध्ये भारतात 47 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 1 मार्च ते 31 मार्च 2023 दरम्यान, व्हॉट्सअपने 4,715,906 भारतीय वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे.

या अकाऊंटने भारतीय कायद्याचे किंवा व्हॉट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर 4,720 तक्रारी आल्याचेही अहवालात समोर आले आहे. त्यापैकी 4,316 बंदीचे आवाहन करण्यात आले होते, मात्र व्हॉट्सअॅपने केवळ 585 खात्यांच्या विरोधात कारवाई केली.

फेब्रुवारीत 46 लाख भारतीय युझर्सवर बंदी घातली याआधी फेब्रुवारीमध्ये व्हॉट्सअॅपने 46 लाख भारतीय यूजर्सवर बंदी घातली होती. यापूर्वी जानेवारीमध्ये 29 लाख, डिसेंबरमध्ये 36 लाख आणि नोव्हेंबरमध्ये 37 लाख खाती बंद करण्यात आली होती.

खाते का बंद होतात?
कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याने त्याच्या व्हॉट्सअॅपवर बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारा, धमकावणारा किंवा त्रास देणारा, द्वेष पसरवणारा किंवा भडकावणारा मजकूर शेअर केला. तर त्याच्या खात्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, जर एखाद्या वापरकर्त्याने कंपनीच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केले तर त्याचे खाते देखील बॅन केले जाऊ शकते.

हे ही वाचा

मोठा बदल:एकाच वेळी 4 फोनवर चालेल आता व्हॉट्सअ‌ॅप; OTP द्वारे करू शकाल तुम्ही लॉग-इन, जाणून घ्या- वापरण्याची प्रक्रिया

आता व्हाट्सअपमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता तुम्ही एकाच वेळी चार फोनमध्ये एकच खाते वापरण्यास (लॉग-इन) सक्षम असणार आहे. व्हाट्सअप बेवच्या मदतीने, तुम्ही फोन आणि पीसी (डेस्कटॉप) दोन्हीमध्ये समान व्हाट्सअप खाते वापरू शकता, आता हे वैशिष्ट्य फोनसाठी देखील उपलब्ध असणार आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअपचे हे फीचर काही आठवड्यांत सर्व यूजर्सपर्यंत पोहोचेल. काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअप बीटा यूजर्ससाठी जारी करण्यात आले होते. व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या नवीन फीचरची माहिती दिली आहे. त्याने लिहिले-आता तुम्ही एकाच वेळी चार फोनवर व्हॉट्सअपवर लॉग इन करू शकाल. - येथे वाचा संपूर्ण बातमी