आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्हॉट्सअॅप हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे, जे तुम्हाला जगभरातील लोकांशी जोडते. व्हॉट्सअ आपल्या यूजर्ससाठी लागोपाठ नवीन फीचर रोलआउट करीत आहे. पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपने एक भन्नाट फीचर आणले आहे. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने व्हॉट्सअॅप युजर्स इंटरनेटशिवायही कनेक्टेड राहू शकणार आहेत.
5 जानेवारी रोजी कंपनीने एका ट्विटमध्ये या फीचरची माहिती दिली होती. कंपनीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, व्हॉट्सअॅप वापरणार्या प्रत्येकास नवीन वर्षाच्या शुभेच्छा! 2023 वर्षाची सुरुवात खाजगी मजकूर किंवा कॉल करून साजरा केला. आम्हाला याची जाणीव आहे की असे अनेक लोक आहेत, ज्यांना इंटरनेट बंद असल्याने त्यांच्या जिवलग व्यक्तींपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही प्रॉक्सी फीचर आणले आहे.
व्हॉट्सअॅप ट्विटमध्ये म्हटले की, व्हॉट्सअॅप हे इंटरनेट ब्लॉक झाल्यावर प्रॉक्सी सर्व्हरद्वारे कनेक्ट राहण्याचे फिचर रोलआउट करत आहे. जगभरातील वॉलंटियर्स आणि ऑर्गेनायजेशन्सच्या प्रॉक्सी सर्व्हर सेटअपद्वारे व्हॉट्सअॅप युजर्स कनेक्ट राहतील. प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट असतानाही युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा मिळत राहील. त्यांचे मेसेजेस एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील, असे व्हॉट्सअॅपने सांगितले आहे. म्हणजेच तुमचे संभाषण प्रॉक्सी सर्व्हर, व्हॉट्सअॅप किंवा मेटा अशा कोणत्याही असलेल्या घटकास दिसणार नाहीत.
प्रॉक्सी सर्व्हर विनामूल्य संवादासाठी इतरांना मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे. व्हॉट्सअॅपने लिहिले की, जर तुमच्या देशात व्हॉट्सअॅपब्लॉक असेल तर तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी प्रॉक्सी वापरू शकता.
व्हॉट्सअॅप म्हटले की, 'गेल्या काही महिन्यांपासून इराणमधील समस्या आपण पाहत आहोत. लोकांचे मानवाधिकार नाकारण्यात आले आहेत. लोकांना तातडीची मदत मिळणे बंद झाले आहे. हे शटडाऊन चालू राहिले. त्यामुळे जिथे सुरक्षित आणि विश्वसनीय संवादाची गरज आहे. तिथे लोकांना या प्रॉक्सी सर्व्हरमुळे मदत होईल अशी आम्हाला आशा आहे.
हे प्रॉक्सी वैशिष्ट्य काय आहे?
WhatsApp शी थेट कनेक्ट करणे शक्य नसताना तुमचे अॅप प्रॉक्सी सर्व्हरद्वारे कनेक्ट होऊ शकते. प्रॉक्सी वापरून WhatsApp गोपनीयता आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये कोणताही बदल नाही.
ट्विटमध्ये दिली माहिती व्हॉट्सअॅपने अलीकडेच एका ट्विटमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. ज्यामध्ये या वैशिष्ट्यांचा उल्लेख केला आहे.
प्रॉक्सी कसे जोडायचे?
इंटरनेटच्या मदतीने तुम्हाला सोशल मीडिया किंवा सर्च इंजिनचा शोध घ्यावा लागेल ज्यांनी प्रॉक्सी क्रिएट केले आहे.
Android वर प्रॉक्सी सर्व्हरशी कनेक्ट करणे
तुम्ही WhatsApp ची सर्वात अलीकडील आवृत्ती वापरत आहात याची खात्री करा.
चॅट टॅबमध्ये, अधिक पर्याय > सेटिंग्ज यावर टॅप करा.
स्टोरेज आणि डेटा > प्रॉक्सी यावर टॅप करा.
प्रॉक्सी वापरा वर टॅप करा.
प्रॉक्सी सेट करा वर टॅप करून प्रॉक्सी ॲड्रेस एंटर करा.
सेव्ह करा वर टॅप करा.
कनेक्शन यशस्वी झाले तर तसे बरोबरच्या खुणेने दाखवले जाईल.
तुम्ही प्रॉक्सी वापरून WhatsApp मेसेजेस पाठवू किंवा प्राप्त करू शकत नसल्यास, तो प्रॉक्सी ॲड्रेस ब्लॉक केलेला असू शकतो. ब्लॉक केलेला प्रॉक्सी ॲड्रेस हटवण्यासाठी त्यावर जास्त वेळ प्रेस करा आणि पुन्हा प्रयत्न करण्यासाठी नवीन प्रॉक्सी ॲड्रेस एंटर करा.
iPhone वर प्रॉक्सी सर्व्हरशी कनेक्ट करणे
तुम्ही WhatsApp ची सर्वात अलीकडील आवृत्ती वापरत आहात याची खात्री करा.
WhatsApp सेटिंग्ज वर जा.
स्टोरेज आणि डेटा > प्रॉक्सी यावर टॅप करा.
प्रॉक्सी वापरावर टॅप करा.
प्रॉक्सी ॲड्रेस एंटर करा आणि कनेक्ट करण्यासाठी सेव्ह करा वर टॅप करा.
कनेक्शन यशस्वी झाले तर तसे बरोबरच्या खुणेने दाखवले जाईल.
तुम्ही प्रॉक्सी वापरून WhatsApp मेसेजेस पाठवू किंवा प्राप्त करू शकत नसल्यास, तो प्रॉक्सी ॲड्रेस ब्लॉक केलेला असू शकतो. वेगळा प्रॉक्सी ॲड्रेस वापरून पुन्हा प्रयत्न करा.
टीप: तृतीय पक्ष प्रॉक्सी वापरल्यास प्रॉक्सी प्रोव्हायडरसोबत तुमचा IP ॲड्रेस शेअर केला जातो. WhatsApp द्वारे तृतीय पक्ष प्रॉक्सी ॲड्रेस पुरवले जात नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.