आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रिलायन्स इंडस्ट्रीज:महसूल 42% घटूनही 13 हजार 248 कोटी रुपयांचा नफा, गतवर्षीच्या तुलनेत 31 टक्के अधिक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीपी सौद्यातून अनपेक्षित कमाई, जिओचे चांगले उत्पन्न व काटकसरीमुळे निकाल सुधारला

कोरोना काळातही भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने घसघशीत नफा कमावला आहे. चालू वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीत महसुलात ४२ टक्क्यांची घट येऊनही कंपनीला १३,२४८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गतवर्षाच्या समान कालावधीत १०,०१४१ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा यंदा त्यात ३१ टक्के वाढ झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जारी निकालांनुसार, कंपनीला चालू वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीत १ लाख ९२९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तो गतवर्षीच्या याच कालावधीतील १ लाख ७४,०८७ कोटी रुपयांपेक्षा ४२ टक्क्यांनी कमी आहे. तथापि, बीपी सौद्यातून मिळालेले ४,६९९ कोटी रुपयांचे एकरकमी उत्पन्न, जिओची चांगली कमाई आणि खर्चात कपात केल्यामुळे तिमाही निकाल चांगला राहिला. रिलायन्स जिओला एप्रिल-जून तिमाहीत २,५२० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तो गतवर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत १८२.८ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी जून तिमाहीत जिओला ८९१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. यासोबतच तिमाहीत जिओचे ९९ लाख ग्राहक वाढले तसेच एकूण ग्राहक ३९ कोटी ८३ लाखांवर गेले. कंपनीचे प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न (एआरपीयू) सुमारे १० रुपयांनी वाढून दरमहा १४०.३ रुपये झाले आहे.

अनुमान से अच्छे नतीजे
कंपनीचा अपेक्षित तिमाही नफा ७,२०० कोटी रुपयांच्या तुलनेत १३,२४८ कोटी रुपयांवर गेला. ४,९६६ कोटी रुपयांचे अनपेक्षित उत्पन्न वगळले तर हा नफा अपेक्षेपेक्षा जास्त आहे. रिलायन्स जिओने तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली. तथापि, किरकोळ व पेट्रोकेमिकल व्यवसायाचे प्रदर्शन सरासरीपेक्षा कमीच राहिले. एकूण, निकाल चांगले असून कंपनीचे शेअर्स चांगली कामगिरी करतील ही अपेक्षा आहे. - आतिश मटलावाला, वरिष्ठ विश्लेषक, एसएसजे सिक्युरिटीज