आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाऊक महागाई (WPI निर्देशांक) आघाडीवर सरकारला झटका बसला आहे. नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई 14.23 टक्क्यांवर पोहोचली आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये महागाई 12.54 टक्के होती. सप्टेंबरमध्ये 10.6% होती. यापूर्वी सोमवारी, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये वाढून 4.91% झाली. ऑक्टोबरमध्ये महागाई 4.48% नोंदवण्यात आली होती.
महागाई दर 12 वर्षात सर्वात जास्त
न्यूज एजेंसी रॉयटर्सनुसार, घाऊक महागाईचा हा दर 12 वर्षांच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. इंधन आणि वीजेच्या किंमतीमध्ये तेजीमुळे घाऊक महागाईमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.
महिना दर महिन्याच्या आधारावर महागाई दर
घाऊक महागाई दर काय असतो?
होलसेल प्राइज इंडेक्स किंवा घाऊक मूल्य निर्देशांकाचा अर्थ अशा किंमतींशी असतो, जो घाऊक बाजारात एका व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याकडून वसुल करतो. या किमती मोठ्या प्रमाणात केलेल्या सौद्यांशी जोडलेल्या असतात. याच्या तुलनेत कंझ्यूमर प्राइस इंडेक्स (CPI) किंवा ग्राहक किंमत निर्देशांक सामान्य ग्राहकांद्वारे ऑफर केलेल्या किमतींवर आधारित असतो. CPI आधारित महागाईच्या दराला रिटेल इंफ्लेशन किंवा खुदरा महंगाई दर असे म्हटले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.