आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Why Do The Rich Have 8 Airbags And The Poor Have One? Where 'the Poor Should Also Get Protection; News And Live Updates

ऑटोमोबाईल कंपन्यांना गडकरींचा प्रश्न:श्रीमंतांच्या गाडीमध्ये 8 एअरबॅग आणि गरीबांच्या गाडीत फक्त 2 का? म्हणाले - गरिबांनाही मिळाली पाहिजे सुरक्षा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 एप्रिल 2021 पासून दोन एअरबॅग अनिवार्य

देशातील लोअर, मध्यम आणि गरीब लोकांनाही प्रवासादरम्यान आवश्यक सुरक्षा मिळण्यासाठी गाडीत 8 एअरबॅग असायला हव्यात. जेणेकरुन प्रवासादरम्यान, सुरक्षेची हमी मिळेल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत ऑटोमोबाईल कंपन्यांना प्रश्न उपस्थित केला आहे.

ते म्हणाले की, कंपन्या फक्त श्रीमंत लोकांनी खरेदी केलेल्या मोठ्या कारमध्ये 8 एअरबॅग पुरवतात, तर लहान कारमध्ये फक्त 2 ते 3 एअरबॅग असतात. असे का? आपल्या देशात गरिबांनाही सुरक्षा मिळायला हवी. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी ऑटोमोबाईल कंपन्यांना प्रश्न विचारला आहे.

किमान 6 एअरबॅग आवश्यक
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, लहान कार मुख्यतः निम्न आणि मध्यमवर्गीय लोक खरेदी करतात. जर त्यांच्या कारमध्ये एअरबॅग नसतील आणि अपघात झाला तर त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, मी सर्व कार उत्पादकांना त्यांच्या सर्व कारमध्ये कमीतकमी 6 एअरबॅग प्रदान करण्याचे आवाहन करीत आहे असे ते म्हणाले.

कारची वाढणार किंमत
गाडीत एअरबॅगची संख्या वाढवल्याने छोट्या कारची किंमत कमीतकमी 3,000 ते 4,000 पर्यंत वाढेल असे नितीन गडकरी यांनी कबूल केले आहे. परंतु, यामुळे गरिबांनाही पूर्ण संरक्षण मिळाले पाहिजे असे ते म्हणाले.

1 एप्रिल 2021 पासून दोन एअरबॅग अनिवार्य
देशात 1 एप्रिल 2021 पासून सर्व नवीन कारमध्ये दोन एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षाविषयक समितीच्या सूचनेनंतर मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.

ऑटो मोबाईल इंडस्ट्रीने व्यक्त केली चिंता
नितीन गडकरींचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे. जेंव्हा ऑटो मोबाईल इंडस्ट्रीने चिंता केली आहे की, जास्त कर आणि कडक सुरक्षा नियमांमुळे त्यांची उत्पादने महाग झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...