आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • With 5G Rolling Out In The Country From October, Smartphones Will Have To Be Updated With High speed Internet

सामान्यांच्या बजेटमधील 5G स्मार्टफोन:ऑक्टोबरपासून 5G होणार कार्यान्वित, फोनला हायस्पीड इंटरनेटसह अपडेट करावे लागणार

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात 5G स्पीड इंटरनेट आणण्याची तयारी जोरात सुरू आहे. अलीकडेच दीड लाख कोटी रुपयांच्या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात यासाठी बोली लावण्यात आली. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीस देशातील कॉर्पोरेट्स आणि व्यावसायिकांसारख्या निवडक वापरकर्त्यांसाठी 5G सेवा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एकीकडे ही परिस्थिती असताना फोनमधील 5G स्पीडसाठी 4G सेवा निरुपयोगी ठरणार आहे. यासाठी तुम्हाला 5G स्मार्टफोन लागणार आहे. ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी खास बजेटमधील (सर्वसामान्यांच्या आवाक्यातील) पाच 5G स्मार्टफोनची यादी घेऊन आलो आहोत. ज्यात उत्तम प्रोसेसरसह टिकाऊ बॅटरी देखील असणार आहे. तर जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दल.

1. Moto G51 5G
या स्मार्टफोनध्ये 6.8-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. ट्रिपल रिअल कॅमेऱ्यांचा सेटअप 50MP + 8MP + 2MP असेल. 13MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल. बॅटरी 5000 mAh असल्याने एकदा चार्ज केल्यावर मोबाईल दिवसभर चालतो. प्रोसेसरच्या बाबतीत विचार केला तर यामध्ये 480+ SoC प्रोसेसर असते. त्याची किंमत 12,249 रूपये आहे.

2. Poco M4 Pro 5G
Poco M4 Pro 5G हा 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा एक सर्वोत्तम फोन आहे. जो 3 स्टोरेज प्रकारांमध्ये येतो. यामध्ये 4GB + 64GB ची किंमत 12,499 रुपये, 6GB + 128GB ची किंमत 14,499 रुपये आणि 8GB + 128GB ची किंमत 16,499 रुपये आहे. 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. कॅमेराच्या सुविधेत 50MP + 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 5000mah बॅटरी आणि प्रोसेसर म्हणून MediaTek डायमेंशन 810 आहे.

3. Realme Narzo 30 5G
हा स्मार्टफोन 90HZ डिस्प्लेसह 6.5-इंच स्क्रिनसह येतो. ज्यामध्ये 5000mah बॅटरीचा सपोर्ट आहे. प्रोसेसरच्या बाबतीत, MediaTek Dimensity 700 5G प्रोसेसर, 48MP प्राथमिक कॅमेरा आहे. फोन 2 स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. 4GB + 64GB साठी 14,999 रुपये आणि 6GB + 128GB साठी 16,999 रुपये ग्राहकांना मोजावे लागतील.

4.Redmi Note 10T 5G
हा स्मार्टफोन दोन प्रकारात उपलब्ध आहे. 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी त्याची किंमत 11,999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलसाठी किंमत 13,999 रूपये आहे. यात 48-mp ट्रिपल रेअर कॅमेरा, MediaTek Dimensity 700 SoC प्रोसेसर आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळते.

5. सॅमसंग गॅलेक्सी M13 5G
या स्मार्टफोनमध्ये MTKD 700 octa core प्रोसेसर उपलब्ध आहे. 50MP + 2MP च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरे उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनचा डिस्प्ले 6.5 इंचाचा असून 5000mAh बॅटरीचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...