आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Windfall Tax ; Petrol, Diesel, Now More Tax On Export Of Diesel And Air Turbine Fuel, Latest News And Update 

कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स घटला:डिझेल अन् जेट इंधनाच्या निर्यातीवर आता जास्तीचा कर, जाणून घ्या-टॅक्समधील वाढ अन् घट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील विंडफॉल कर कमी केला आहे. शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या पेट्रोलियम कंपन्यांद्वारे घरगुती उत्पादन केलेल्या कच्च्या तेलावरील विंडफॉल कर 11 हजार रुपये प्रति टनावरून 9,500 रुपये प्रति टन करण्यात आला आहे. ही कपात 2 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेली आहे.

डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवर कर वाढवला
यासोबतच डिझेल आणि एअर टर्बाइन इंधन (ATF) च्या निर्यातीवर अतिरिक्त शुल्क वाढवण्यात आले आहे. डिझेलच्या निर्यातीवरील कर 12 रुपयांवरून 13 रुपये प्रति लिटर करण्यात आलेला आहे. तर एटीएफच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 3.5 रुपयांवरून 5 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.

दर 15 दिवसांनी विंडफॉल कराचा घेतला जातो आढावा

यावर्षी 1 जुलैपासून विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला. आजपर्यंत, पेट्रोल आणि एटीएफवर 6 रुपये प्रति लिटर तर डिझेलवर 13 रुपये प्रतिलिटर निर्यात शुल्क (विंडफॉल टॅक्स) लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 20 जुलै रोजी सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवरील हा कर रद्द केला. केंद्र सरकार दर 15 दिवसांनी विंडफॉल कराचा आढावा घेत असते.

1 नोव्हेंबर रोजी एटीएफच्या किमती वाढल्या
एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) किंवा जेट इंधनाच्या किमती 1 नोव्हेंबरपासून 4842.37 रुपयांनी वाढल्या आहेत. देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी जेट इंधनाच्या किमती दिल्लीत 1,20,362.54 रुपये प्रति किलो, कोलकाता येथे 1,27,023.83 रुपये, मुंबईमध्ये 1,19,266.36 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,24,998.48 रुपये प्रति किलोलीटर आहेत. किमती वाढल्यामुळे विमान प्रवास महागाई वाढू शकते.

5 महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर
गेल्या 5 महिन्यांपासून देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. जुलैमध्ये महाराष्ट्रात पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी स्वस्त झाले. तरी देखील इतर राज्यातील इंधनाचे दर जैसे थे च आहेत.

बातम्या आणखी आहेत...