आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन गेमिंग:बोनस-इन्सेंटिव्ह काढून घेतल्यास आता लागणार कर

वृत्तसंस्था | नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीडीटीने टीडीएस नियमांबाबत स्थिती केली स्पष्ट

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) ऑनलाइन गेंमिंगवर लागणाऱ्या टीडीएस तरतुदींबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आता ऑनलाइन गेमिंगमध्ये यूजर्सच्या खात्यात जमा केलेला बोनस किंवा इंसेंटिव्ह ही निव्वळ जिंकलेली रक्कम मानली जाईल. ती काढल्यास स्रोतावर टीडीएस लागू होईल. बोनस किंवा इंसेंटिव्ह रकमेचा वापर केवळ खेळण्यासाठी केला जात असेल तर त्यावर टीडीएस लागणार नाही.

जिंकलेली निव्वळ रक्कम दरमहा १०० पेक्षा जास्त नसेल तर टीडीएस कपात करण्याची गरज नाही, असेही सीबीडीटीने स्पष्ट केले आहे. कर कपातीवेळी यूजर्सच्या खात्यात पुरेशी रक्कम जमा नसेल तेव्हाही हा नियम लागू राहील. १ एप्रिलपासून ऑनलाइन गेमिंगवर नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये ऑनलाइन गेमिंगद्वारे जिंकलेल्या रकमेवर आयकर कपात केला जाईल.