आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ITR भरल्यानंतर 30 दिवसांत करा पडताळणी:आयकर भरण्याची शेवटची पायरी पडताळणी, अन्यथा फाईल होईल अमान्य, जाणून घेऊया प्रक्रिया

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक वर्ष 2021-22 साठी प्राप्तीकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होऊन गेली आहे. जर तुम्ही 31 तारखेच्या आत आयटीआर भरला असेल तर आता त्याची पडताळणीही आवश्यक आहे. त्याशिवाय आयटीआर फॉर्म अपूर्ण मानला जातो. आयटीआर फाईल करण्याची शेवटची पायरी म्हणजे पडताळणी असणार आहे. आपला आयटीआर फॉर्म भरण्याची प्रक्रिया यशस्वी झाली आहे की नाही. हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करू शकता. तर जाणून घेऊया आयकर पडताळणी करण्याची प्रक्रिया.

या पद्धतीने तुम्ही पडताळणी करू शकता

  • आयकर रिटर्न फाइलची पडताळणी करण्यासाठी, आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे.
  • सर्वप्रथम ई-फायलिंग पोर्टल Incometax.gov.in वर जाऊन लॉग इन करा.
  • यानंतर तुम्हाला सर्वात वरच्या पानावर e-file चा पर्याय मिळेल.
  • तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न विभागात जाऊन ई-व्हेरिफाय रिटर्न निवडावे लागेल.
  • यानंतर, तुम्ही जे काही रिटर्न भरले आहे ते दिसेल.
  • त्यानंतर ई-व्हेरिफाय लिंकवर क्लिक करा आणि आधार ओटीपी वापरून व्हेरिफाय रिटर्न पर्याय निवडा.
  • हे केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक संदेश येईल. ज्याद्वारे तुम्ही पडताळणी करू शकता.
  • आयकर विभागाच्या वेबसाइटवर हा वन टाइम पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही सबमिट बटणावर क्लिक केले. त्यानंतर आयटीआर पडताळला जातो.

30 दिवसांच्या आत पडताळणी गरजेची

पडताळणीशिवाय आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. पडताळणीनंतरच प्राप्तिकर विभाग तुमच्या आयटीआरवर प्रक्रिया करतो. याशिवाय जर आयटीआरची पडताळणी झाली नाही. तर तुमचा रिफंड अडकणार आहे. यापूर्वी रिटर्न भरण्याच्या तारखेपासून 120 दिवसांपर्यंत पडताळणी करावी लागत होती. मात्र, आता ही मुदत 30 दिवसांवर आणली आहे. जर तुम्ही पडताळणी केली नाही. तर तुमची आयटीआर फाइल अधिकृतरित्या मान्य केली जाणार नाही.

5 कोटी 83 जणांनी आयकर भरले
2021-22 या आर्थिक वर्षासाठी 5 कोटी 83 लोकांनी आयकर रिटर्न (ITR) भरले आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार शेवटच्या तारखेला म्हणजे 31 जुलैला 72.42 लाख नागरिकांनी रिटर्न भरले.

ITR दाखल केला नसेल तर काय करायचे ?
आयकर विभागाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवली नाही. ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 होती. अशा परिस्थितीत जर तुम्ही अद्याप ITR भरला नसेल. तर त्यासाठी तुम्हाला विलंब शुल्क भरावा लागेल. जर वैयक्तिक करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. तर त्याला 5000 रुपये विलंब शुल्क भरावा लागेल. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रूपयांपेक्षा कमी असेल त्यांना विलंब शुल्क म्हणून एक हजार रूपये भरावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...