आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Women Entrepreneurs Account For Less Than 10 Percent Of Startup Funding In The Country

जागतिक निधीत महिलांचा वाटा 30-33 टक्‍के:देशात स्टार्टअप फंडिंगमध्ये महिला उद्योजकांचा वाटा 10 टक्‍के   पेक्षा कमी

अजय तिवारी | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टिम भारतात एकूण निधीत महिला उद्योजकांचा वाटा १०% पेक्षाही कमी आहे. गेल्या वर्षी भारतीय स्टार्टअप्सना २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल मिळाले. यात महिलांच्या नेतृत्वातील स्टार्टअपचा वाटा फक्त ९.६% म्हणजेच २० हजार कोटींपेक्षाही कमी आहे. २०२२ मध्ये २००हून अधिक महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सनी १९,८८९ कोटी रुपये उभे केले. २०२१ मध्ये जमा झालेल्या ३९ हजार कोटी रुपयांपैकी हे जवळपास निम्मे आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील ई-कॉमर्स स्टार्टअपसाठी निधी गेल्या वर्षीपासून ८२% कमी झाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी देशात बनलेल्या एकूण युनिकॉर्नमध्ये महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सचा वाटा वाढून ३३% झाला. २०२१ मध्ये हा आकडा १४% आणि २०२० मध्ये १६% होता. स्टार्टअप इकोसिस्टम तज्ज्ञ समीर कपूर यांच्या मते, विकसित देशांमध्ये हे प्रमाण सुमारे एक तृतीयांश आहे.

गेल्या वर्षी देशाच्या स्टार्टअपला मिळालेला निधी २०२१च्या तुलतनेत ४० टक्के कमी होऊन २.०६ लाख कोटी रुपये झाली. स्टार्टअप इकोसिस्टिम एक्स्पर्ट समीर कपूरने सांगितले, कोरोनानंतर बहुतांश तंत्रज्ञान कंपन्यांचे अतिरिक्त मूल्यांकन करण्यात आले. त्यात गुंतवणूक जास्त झाली. मात्र २०२२ मध्ये अनेक मोठे स्टार्टअप्सचे आयपीओ अपयशी ठरले. यानंतर गुंतवणूूकदारांनी यात विचार करून गुंतवणूक केली. त्यांनी सांगितले की, सुमारे ८० टक्के महिलांना आपला उद्योग सुरू करण्याआधी सुरुवातीच्या पातळीवर स्वत:च पैसे लावावे लागतात.

^महिलांना उद्योजक नव्हे तर पारंपरिक भूमिकेत पाहण्याची सवय पडली आहे. अनेक वेळा गुंतवणूकदार आणि उद्योजकांचे विचार न जुळल्यामुळे त्यांना कमी निधी मिळतो. पण कल्पना स्पष्ट असेल, तर स्टार्टअप महिलांच्या नेतृत्वाचा असो की पुरुषांच्या नेतृत्वाचा काही फरक पडत नाही. - डॉ. गरिमा साहनी, सहसंस्थापक प्रिस्टिन केअर

महिला उद्योजकांच्या स्टार्टअप्समध्ये कमी निधी वर्ष फंडिंग वाढ/कमी करार वाढ/कमी 2020 11,613 ---- 128 ---- 2021 38,988 236% 236 84% 2022 19,910 49% 203 14%

एंटर. टेकमध्ये फडिंग

सेक्टर फंडिंग वाढ/कमी करार वाढ/कमी ई-कॉमर्स 1,651 -82% 75 -5% एंटरप्राइजटेक 3,219 +65% 35 +25% फिनटेक 3,269 -21% 24 -38% हेल्थ टेक 1,054 +78% 17 -41% एडटेक 7,659 -63% 14 -64% (रक्कम कोटी रुपयात, स्रोत: आयएनसी 42)

बातम्या आणखी आहेत...