आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांची कपात:आयटी क्षेत्रात कपातीदरम्यान बदलतायत कामाच्या पद्धती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयटी क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न ९०च्या दशकापासूनच मध्यमवर्गीयांचे राहिले आहे. मात्र हल्लीच्या काही महिन्यांत मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली. नवी भरती सरासरी २५ टक्के कमी झाली आहे. यादरम्यान सर्वाधिक उच्च पातळीच्या आयटी सेवेवर कंपन्या जोर देत आहेत की, कर्मचारी कार्यालयात परत यावेत. सिग्नेट इन्फोटेकसारख्या काही मध्यम आकाराच्या कंपन्या हायब्रिड वर्क ऑफर करत आहेत. सिग्नेट इन्फोटेकचे संस्थापक आणि संचालक, नीरज हठीसिंग सांगतात, ‘कर्मचारी कार्यालयात काम करत असल्याचा आनंदच आहे. मात्र पर्याय म्हणून हायब्रिड वर्क कल्चर आकर्षक आहे.

सॅटेलाइट ऑफिसचा ट्रेंड वाढला : अनेक इतर तंत्रज्ञान कंपन्यात टिअर-२ आणि ३ शहरात आठवड्यातून दोन दिवस काम करण्यासाठी सॅटेलाइट ऑफिस बनवत आहेत. मात्र कोरोनादरम्यान स्थापित झालेल्या साल्ट नावाच्या फिनटेक प्लॅटफॉर्मजवळ रिमोट वर्क एकमेव पर्याय होता. साल्टमध्ये इंजिनिअरिंगचे सह-प्रमुख अंशुल मित्तल सांगतात, ‘कार्यालयासारखी कॉपी करण्यासाठी आमच्याकडे झूम लिंकच्या माध्यमातून व्हर्चुअल ऑफिस सेटअप आहे.