आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • World Bank Suspends Publication Of Ease Of Business Report This Year, India Ranks 79th In 5 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहवाल:जागतिक बँकेने व्यवसाय सुलभता अहवालाचे प्रकाशन यंदा रोखले, 5 वर्षांत क्रमवारीत भारताची 79 स्थानांची सुधारणा

नवी दिल्ली / अर्चना चाैधरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक बँकेने या वर्षीच्या आपल्या डुइंग बिझनेस अहवालाचे प्रकाशन रोखले आहे. मागील काही अहवालांमध्ये डेटा बदलांच्या अनियमिततेनंतर जागतिक बँकेने हा निर्णय घेतला आहे. बँकेने याचा तपासही सुरू केला आहे.

जागतिक बँकेनुसार, ऑक्टोबर २०१७ आणि २०१९ मध्ये प्रकाशित डुइंग बिझनेस अहवाल २०१८ आणि २०१९ च्या डेटामध्ये बदलाच्या संदर्भात अनेक अनियमितता समोर आल्या आहेत. या बदलांचा डुइंग बिझनेसच्या कार्यपद्धतीशी ताळमेळ बसत नव्हता. तपासानंतर, अनियमिततेच्या सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांच्या डेटामध्ये सुधारणा केली जाईल. तसेच गत पाच वर्षांच्या अहवालातील डेटाचाही आढावा घेतला जाईल. या अनियमिततेचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांना व संचालक मंडळाला बँकेने सद्य:स्थितीची पूर्ण माहिती दिली आहे. मात्र बँकेने या देशांची नावे सांगितली नाहीत. दरम्यान, या क्रमवारीत २०१४ मध्ये १४२ व्या स्थानी असलेला भारत २०१९ मध्ये ६३ व्या स्थानी आला होता. पाच वर्षांत या क्रमवारीत भारताची ७९ स्थानांची सुधारणा झाली होती. दुसरीकडे, व्यापार मंत्रालयाचे प्रवक्ते योगेश बावेजा यांनी याबाबत सांगितले, क्रमवारीविषयी जागतिक बँकेच्या निर्णयानंतरही भारत इझ ऑफ डुइंग बिझनेसमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवणार आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत बँकेच्या क्रमवारीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चिलीच्या अहवालात केलेल्या बदलावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर २०१८ मध्ये पॉल रोमर यांनी जागतिक बँकेच्या चीफ इकॉनॉमिस्ट पदाचा राजीनामा दिला होता.

अशी आहे क्रमवारी
हा अहवाल २००३ पासून प्रकाशित केला जातो. यात जगातील १९० अर्थव्यवस्थांच्या कामगिरीचा आढावा असतो. तेथील व्यवसाय सुलभतेचेही परीक्षण होते. यात व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, नियम-कायदे अशा निकषांच्या आधारे क्रमवारी ठरते. क्रमवारीत चांगले स्थान मिळवणाऱ्या देशांमध्ये उद्योगांची स्थिती चांगली असते.