आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याचा अंदाज:जगाचा आर्थिक विकास 2%, भारताचा 6.३% टक्के राहील

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याचा अंदाज आहे. २०२२ मध्ये, जागतिक अर्थव्यवस्था ३.१% च्या वेगाने वाढली. आता जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी अंदाज व्यक्त केला की, २०२३ मध्ये ही वाढ २% पर्यंत खाली येऊ शकते. पण भारत आणि चीन याला अपवाद असतील. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ६.३% असू शकतो. मालपास म्हणाले, “भारताव्यतिरिक्त, चीन हा एकमेव देश आहे, जो जागतिक मंदीला अपवाद ठरेल. मजबूत खाजगी गुंतवणुकीसह चीनचा विकास दर २०२३ मध्ये ५% पेक्षा जास्त असेल. चीनचे चलन स्थिर आहे.

भारताला भांडवल बाजाराचे उदारीकरण करण्याची गरज मालपासच्या मते, जागतिक मंदीच्या प्रभावापासून भारतही सुटणार नाही. ८% वाढीचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताला भांडवल बाजाराचे उदारीकरण करावे लागेल. मालपास येथे १० ते १६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या २०२३ च्या वसंत सभेच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मालपासची ही टिप्पणी अशा वेळी आली, जेव्हा जागतिक बँकेने २०२३-२४ मधील भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला.