आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • World Oldest Whiskey Auctioned, Latest News And Update News, All About The Macallan The Reach Price 

जगातील सर्वात जुन्या व्हिस्कीचा लिलाव:'द मॅकलन द रीच' ब्रॅंडची किंमत 1.75 कोटी ठेवण्यात आली; 1940 मध्ये ही व्हिस्की बनवली गेली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील लिलावगृह 'सोथेबीज' जगातील सर्वात जुन्या व्हिस्कीचा लिलाव करत आहे. सर्वात जुन्या असलेल्या 81 वर्षीय व्हिस्कीचे नाव आहे 'द मॅकलन द रीच'. लिलावगृह सोथेबीज यांच्या अधिकृत वेबसाईडवर 'द मॅकलन द रीच' लिलावासाठी ठेवले आहे. सोथबीजने या व्हिस्कीचे काही फोटोही वेबसाईटवर शेअर केले आहेत.

'द मॅकलन द रीच' ची अंदाजे किंमत 1.75 कोटी

सोथेबीजच्या संकेतस्थळानुसार जाऊन लोक या व्हिस्कीसाठी बोली लावू शकतात. लिलावगृहाने बोली लावण्यासाठी 5 ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित केलेली आहे. व्हिस्की प्रेमींसाठी, 'द मॅकलन द रीच' ची अंदाजे किंमत श्रेणी 110,000 ते 200,000 GBP म्हणजेच 96.72 लाख ते 1.75 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

1940 मध्ये व्हिस्कीची फक्त एक बाटली तयार झाली
'द मॅकलन द रीच' 1940 मध्ये एकही डिस्टिल्ड बॉटल तयार करण्यात आली. या व्हिस्कीची फक्त एक बाटली तयार केली गेली. ही अत्यंत गोड आणि स्मोकी फिनिशसह 41.6 abv ची डीप ऑबर्न सिंगल माल्ट व्हिस्की आहे. विजेत्या बोली लावणाऱ्याला 'द मॅकलन द रीच' च्या बाटलीसह एक लहान कांस्य शिल्प मिळणार आहे.

सोथेबीजच्या संकेतस्थळानुसार, 'द मॅकलन द रीच' च्या बाटलीचा 3/288 क्रमांकावर लिलाव करण्यात आला आहे. बाटली तीन हाताने बनवलेल्या कांस्य शिल्पांवर ठेवली आहे, लाल चामड्याने बनवलेल्या लाकडी कॅबिनेटमध्ये प्रदर्शित केली आहे. त्याचे कांस्य शिल्प सास्किया रॉबिन्सन यांनी तयार केले आहे. त्याचवेळी कॅबिनेट 1940 मध्ये मॅकलन इस्टेटमधील एल्मच्या झाडाच्या लाकडाचा वापर करून बनवले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...