आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न- उत्तरे:अल्प कालावधीसाठी होल्ड करू शकता यस बँक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एबी कॅपिटल, अदानी विल्मर, दावत, एलआयसी, टाटा कॉफी, टीसीएस, युनिपार्ट्स, ऊर्जेच्या शेअर्सचे काय करू- मौलिक शहा
एबी कॅपिटल, अदानी विल्मर, टाटा कॉफी, टीसीएस होल्ड करू शकता. दावतही मध्यम मुदतीसाठी होल्ड करू शकता. कारण सरकारने ऑर्गेनिक नॉन-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. एलआयसीमध्ये आपली इंडस्ट्री लीडरशिप कायम ठेवण्याची क्षमता आहे, पण यात नफा मिळवण्यासाठी ३-५ वर्षे धीर धरावा. तुम्ही युनिपार्ट्सही होल्ड करू शकता.

माझ्याकडे झायडस लाइफसायन्सेस, यस बँक, फिनो पेमेंट बँकेचे शेअर आहेत. यापैकी कोणते होल्ड करणे फायद्याचे आहे ?- राकेश पारिख
यस बँक अल्प कालावधीसाठी होल्ड करू शकता. फिनो पेमेंटही दीर्घ मुदतीसाठी होल्ड करू शकता. मात्र, झायडस लाइफ सायन्सेसमधून बाहेर पडा.

माझ्याकडे पॉलीप्लेक्स, यूफ्लेक्स व जिंदल पॉली फिल्मचे शेअर आहेत. एक वर्षासाठी काय अंदाज आहे? - अजय कुमार सक्सेना
कच्च्या मालाच्या किमती कमी होत आहेत आणि पॅकेजिंग कंपन्यांसाठी चांगले वातावरण आहे. तुम्ही हे शेअर्स होल्ड करून ठेवा, असा सल्ला आहे.

बीपीसीएल ४१५ च्या दराने व बीएसई ४५० च्या दराने घेतले आहेत. दीर्घ अवधीसाठी ते होल्ड करू की काढून घेऊ? -पंकज परमार
बीपीसीएलमधून बाहेर पडा. कारण मार्जिनवर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. बीएसई दीर्घ मुदतीसाठी होल्ड करू शकता.

माझ्या पोर्टफोलियोत समाविष्ट शेअर्सबाबत सांगा- अमरसिंह राजपूत
इक्विटास बँक आणि सूर्योदय स्मॉल बँकेतून आयडीएफसी फर्स्ट बँकेत स्विच करा. नुवोकोतून अल्ट्राटेकमध्ये स्विच करण्याचा सल्ला आहे. कृष्णा व विजया डायग्नोस्टिक्समधून अपोलो हॉस्पिटलमध्ये स्विच करा. दीर्घ मुदतीच्या दृष्टीने तुम्ही फिनो पेमेंट होल्ड करू शकता.

-स्नेहा पोद्दार, एव्हीपी रिसर्च, मोतीलाल ओसवाल फायनॅन्शिअल सर्व्हिसेस

बातम्या आणखी आहेत...