आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्याची खास मुलाखत:एनपीए टाळण्यासाठी येस बँकेचा किरकोळ कर्जावर भर

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपर्यंत पुनर्रचना आराखड्यात राहिल्यानंतर आता येस बँकेचे नवीन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. बँकेला सुमारे ९००० कोटींची पीई गुंतवणूकदेखील मिळणार आहे. आता बँकेचा पूर्ण भर व्यवसाय वाढणे आणि ग्राहकांची सेवा प्रदान करण्यावर आहे. येस बँकेचे एमडी आणि सीईओ प्रशांतकुमार यांनी दैनिक भास्करच्या अजय तिवारी यांना बातचीतमध्ये सांगितले की, बँक सध्या, किरकोळ कर्जावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे आणि बुडीत कर्जे टाळण्यासाठी कॉर्पोरेट कर्जावर कमी भर देणार. मुलाखतीतील काही ठळक मुद्दे-

दोन वर्षे पुनर्रचना योजनेत राहिल्यानंतर बँकेची काय स्थिती आहे? पुनर्बांधणी योजनेतून एक बँक यशस्वीरीत्या बाहेर पडल्याचे अजून तरी पाहिले नाही. एक तर ती बंद होते किंवा विलीन होते. पण एवढ्या मोठ्या बँकेला पुनर्रचना योजनेतून बाहेर काढणे मोठे यश आहे. ठेवी व कर्जाबाबत ज्या अडचणी होत्या त्याही दूर झाल्या आहेत. बँक आता प्रगतीच्या मार्गावर आहे.

दोन मोठे खासगी इक्विटी गुंतवूणकदार बँकेत पैसा लावत आहेत. याचा वापर कसा करणार? या गुंतवणुकीमुळे बँकेची भांडवली रचना खूप मजबूत होईल. त्याचा उपयोग बँकेला पुढे नेण्यासाठी होईल. जगातील अशा सर्वात मोठ्या पीई इक्विटी गुंतवणूकदाराने ९००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली, याचा अर्थ बँकेचे भविष्य उज्ज्वल असल्याची त्यांना खात्री आहे.

वाढीसाठी काय धोरण आहे ? या वर्षी आम्ही १५% कर्ज वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या तिमाहीतच १४% वाढ झाली. याशिवाय दर महिन्याला १ लाख नवीन ग्राहक जोडण्याचे लक्ष्य आहे.

किरकोळ ग्राहक किंवा कॉर्पोरेट्स, कुणावर लक्ष केंद्रित केले जाईल? गेल्या दोन वर्षांपासून किरकोळ ग्राहक आणि एमएसएमईवर आमचा जास्त फोकस राहिला आहे. कारण यात एनपीए (कर्ज बुडण्याचा) धोका कमी राहतो. एकंदर बॅलन्सशीट मजबूत झाली तर पुन्हा आम्ही कॉर्पोरेट्सकडे वळणार आहोत. कारण सावधगिरी तर बाळगायला हवी. एनपीए जास्त आहे, तो कमी करणार ? मार्च २०२१ नंतर प्रत्येक तिमाहीत आमचा एनपीए कमी होत चालला आहे. आमचा नेट एनपीए ४.२% आहे. तो आधी ६% ते ७% पर्यंत होता. मात्र आमचा एनपीए मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी आम्ही अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीसोबत भागीदारी करत आहोत. ऑगस्टनंतर आमचा एनपीए त्याच्याकडे हस्तांतरित होईल. त्यानंतर आमचा सकल एनपीए १.५ ते २% पर्यंत खाली येईल.

बातम्या आणखी आहेत...