आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Yes Bank Ltd Has Taken Headquarter Building Of Anil Dhirubhai Ambani Group (ADAG) In Mumbai

येस बँकेची कारवाई:येस बँकेने अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे मुंबईतील मुख्यालय ताब्यात घेतले, 2892 कोटींचे कर्ज फेडू न शकल्याने केली कारवाई

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिल अंबानी ग्रुपवर येस बँकेचे 12,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे

खासगी क्षेत्रातील येस बँक लिमिटेडने मुंबईतील अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे (एडीएजी) मुख्यालय रिलायन्स सेंटर आपल्या ताब्यात घेतले आहे. सिक्युरिटीकरण अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल अ‍ॅसेट अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अ‍ॅक्ट (एसएआरएफईएसआय) अंतर्गत 22 जुलै रोजी इमारतीचा ताबा घेण्यात आला.

बुधवारी फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये बँकेने म्हटले आहे की, सांता क्रूझ (मुंबई) येथील 21 हजार फुटपेक्षा अधिक जागा असलेली हेडक्वार्टरची इमारत आणि दक्षिण मुंबईतील नागिन महलमधील दोन मजले आपल्या ताब्यात घेतले आहेत. जे त्याकाळी रिलायन्सचे हेडक्वार्टर होते.

2,892 कोटींची परतफेड करण्यात अपयशी

अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपने बँकेचे 2,892 कोटी रुपयांची थकबाकी भरली नाही यानंतर येस बँकेने ताब्यात घेतले. यावर्षी मार्चमध्ये अंबानी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते की, येस बँकेसाठी अनिल धीरूभाई अंबानी समूहाचा संपूर्ण जोखीम पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कायदा आणि आर्थिक नियमांचे पालन करीत आहे. येस बँकेचे अनिल अंबानी यांच्या ग्रुपवर एकूण 12,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

ते म्हणाले की, या गटाचा राणा कपूर, त्यांची पत्नी व त्यांच्या मुलींशी संबंध किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही संस्थेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क नाही.

कपूर परिवारावर बँक फसवणुकीच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले होते

यावर्षी मे महिन्यात प्रकरणात निदेशालयाने राणा कपूर, त्यांची मुलगी रोशनी कपूर, राधा कपूर आणि राखी कपूर यांच्या विरोधात येस बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले होते. याशिवाय आरोपपत्रात मॉर्गन क्रेडिट्स, येस कॅपिटलचे देखील नाव आहेत. सध्या प्रशांत कुमार येस बँकेचे संचालक म्हणून काम करत आहेत.

ब्लिस हाउस आरएबी एंटरप्राइज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची 100% सहायक कंपनी आहे, ज्याचे मालक राणा कपूरची पत्नी बिंदू कपूर आहे. अनिल अंबानी 2008 मध्ये जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, मात्र टेलिकॉम, ऊर्जा आणि मनोरंजन क्षेत्रात मोठ्या तोट्यामुळे त्यांच्यावरील कर्ज वाढत गेले.