आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • If You Need Money, You Can Take A Loan On Your Car Just Like At Home, Read The Detailed Information

कामाची बातमी:तुम्हाला पैशांची गरज असेल तर घराप्रमाणे तुमच्या कारवरही घेता येते कर्ज, वाचा सविस्तर माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

जर अचानक पैशाची गरज भासली आणि कोणताही मार्ग माहित नसेल तर तुम्ही तुमच्या कारवर कर्ज घेऊ शकता. बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) दोन्ही ‘लोन अगेन्स्ट कार' ऑफर करतात. कारच्या सध्याच्या किमतीच्या 50% ते 150% पर्यंत कर्ज देण्यात येते. 1 ते 7 वर्षांपर्यंतचे कर्ज 13-15% व्याजावर मिळू शकते. त्यासाठीचे प्रक्रिया शुल्क 1-3% पर्यंत आहे.

बँका ट्रॅक रेकॉर्ड पाहतात

कारवरील कर्ज मंजूर करण्यापूर्वी बहुतेक बँका अर्जदाराच्या कर्ज परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहतात. जर तुम्ही सध्याच्या कर्जाचे (असल्यास) सर्व EMI वेळेवर फेडलेले असेल तरच तुम्हाला कर्ज मिळेल.

आवश्यक कागदपत्रे

 • मतदार ओळखपत्र / फोटो रेशन कार्ड / पासपोर्ट
 • पॅन कार्ड, आधार कार्ड
 • तीन वर्षांचा आयकर रिटर्न
 • तीन महिन्यांची पगार स्लिप
 • पगार खाते विवरण
 • कारचे आरसी बुक
 • कार विमा कागदपत्रे

‘लोन अगेन्स्ट कार'साठी पात्रता

 • बँका आणि NBFC सहसा 10 वर्षांपेक्षा कमी जुन्या कारसाठी कर्ज देतात.
 • अर्जदाराकडे नोकरी किंवा व्यवसायासारखा निश्चित उत्पन्नाचा स्रोत असावा.
 • अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्षे असावे.
बातम्या आणखी आहेत...