आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Even If You Are Not Married, Term Insurance Is Required, Three Major Reasons Behind It, Read In Detail

टर्म इन्शुरन्स उपयुक्तच:लग्न झालेले नसले तरी टर्म इन्शुरन्स आवश्यक, त्यामागची तीन मोठी कारणे, वाचा सविस्तर माहिती

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टर्म इन्शुरन्स फक्त विवाहित लोकांसाठीच आहे असे बहुतेक लोकांना वाटते. कारण लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात. लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या येतात हे खरे आहे, पण तुम्ही अविवाहित असतानाही टर्म इन्शुरन्स घेण्याची अनेक कारणे आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, अविवाहितांनी मुदत विमा का घ्यावा.

तुमचेही कुटुंब आहेच

तुम्ही अविवाहित आहात, पण तुमचे एक कुटुंब आहे जे तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहे. कदाचित तुम्ही एकल दत्तक पालक आहात आणि तुम्हाला मुले आहेत. तुमचे पालक निवृत्त होणार आहेत. तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असणारे लहान भावंडे आहेत. विचार करा तुमचा अपघात झाला आणि तुम्ही हे जग सोडून गेलात तर तुमच्या कुटुंबाची काळजी कोण घेणार?

त्यांना कोणत्या आर्थिक त्रासातून जावे लागेल ते तुम्ही समजू शकता. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीतून जावे लागू नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही मुदत विमा योजना खरेदी करणे आवश्यक आहे. हे तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देईल.

तुमच्या कर्जाची परतफेड कोण करेल

तुम्ही लहान भावंडांसाठी गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज घेतले आहे. तुमचे निधन झाल्यानंतर संपूर्ण भार तुमच्या कुटुंबियांवर पडेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तणाव आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला अशा तणावपूर्ण परिस्थितीपासून वाचवेल.

अ‍ॅडप्टीव्ह पालक होण्यासोबतच जबाबदाऱ्याही असतील

अ‍ॅडप्टीव्ह पालक या नात्याने, तुमच्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळावे अशी तुमची इच्छा असेल. तुम्हाला तुमच्या मुलांची सर्व स्वप्ने पूर्ण करायची इच्छा असेल. या स्वप्नांमध्ये चांगल्या शिक्षणाचाही समावेश असेल. तुम्ही तुमच्या मुलांसोबत नेहमी असाल असे सांगता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...