आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • YouTube Earnings Will Be Taxed Up To 24% Under US Law; What Will Be The Impact On India's Content Creators?

यूट्यूबवरुन कमाई करणाऱ्यांना दणका:अमेरिकन कायद्यामुळे लागणार 24% कर; जाणून घ्या भारतीय कंटेंट क्रिएटर्सवर काय होणार परिणाम ?

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाहिरातीतून मिळालेल्या पैशातील मोठा भाग गूगल स्वतःकडे ठेवतो

यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन कमाई करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. गूगल यूट्यूब कमाईवर या महिन्यापासून 24% कर लावणार आहे. ही नवीन पॉलिसी अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशातील कंटेंट क्रिएटर्सवर आजपासून लागू होईल. परंतु, जानकारांचे म्हणने आहे की, भारताचे व्हिडिओ अमेरिकेत जास्त पाहिले जात नसल्यामुळे भारतीय क्रिएटर्सवर नवीन नियमचा जास्त परिणाम होणार नाही.

काय आहे यूट्यूबची नवीन टॅक्स पॉलिसी? कधी झाली याची घोषणा? भारतीय यूट्यूबर्सच्या कमाईवर याचा किती परिणाम पडेल ? नवीन पॉलिसीमुळे नुकसान कमी व्हावे, यासाठी काय करावे ? जाणून घ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे...

अमेरिकेच्या टॅक्स कायद्यांतर्गत जगातील यूट्यूबर्स

अमेरिकेचा कर कायदा 'इंटरनल रेव्हेन्यू कोड' च्या चॅप्टर तीन अंतर्गत, यूट्यूबवर अमेरिकेच्या दर्शकांकडून कमाई करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सकडून टॅक्सची माहिती घेण्याची जबाबदारी गूगलची आहे. त्यांच्या कमाईतून टॅक्स कापावा आणि याची माहिती इंटरनल रेव्हेन्यू सर्विसला द्यावी. म्हणजेच, एखादा क्रिएटर अमेरिकेच्या बाहेर राहून अमेरिकेच्या दर्शकांकडून कमाई करत असेल, तर 1 जून 2021 पासून त्याला टॅक्स भरावा लागेल.

गूगलने या नवीन पॉलिसीची घोषणा यावर्षी मार्चमध्ये केली होती. यानुसार, यूट्यूब पार्टनरशिप प्रोग्राममध्ये सामील सर्व कंटेंट क्रिएटर्सना 31 मेपर्यंत टॅक्सची माहिती देणे गरजेचे होते.

नवीन पॉलिसीमुळे कमाईवर काय परिणाम होईल ?
इन्फ्लूएंसर मार्केटिंग प्लॅटफॉर्म, डू योर थिंगचे फाउंडर अंकित अग्रवाल सांगतात की, बहुतेक इंडियन यूट्यूबर्स स्थानिक भाषेत कंटेंट बनवतात. म्हणून हे व्हिडिओ पाहणारे अनेक लोक भारतीय आहेत. यूट्यूब फक्त त्या कमाईवर टॅक्स लावत आहे, जी अमेरिकेच्या दर्शकांकडून झाली आहे. त्यामुळे या पॉलिसीचा भारतीय क्रिएटर्सवर जास्त परिणाम होणार नाही. तसेच, गूगलला टॅक्सची माहिती दिल्यानंतर फक्त अमेरिकन दर्शकांकडून झालेली कमाईवरच टॅक्स लावला जाईल, भारतीय दर्शकांकडून झालेल्या कमाईवर याचा काहीच परिणाम होणार नाही.

जर यूट्यूबरने 31 मेपर्यंत टॅक्सची माहिती दिली नाही ?

कंपनीच्या नवीन पॉलिसीनुसार, जर यूट्यूबरने आपल्या टॅक्सची माहिती 31 मेपर्यंत दिली नाही. तर, कंपनी त्याच्या एकूण कंमाईवर 24% टॅक्स लावेल. म्हणजेच, जर तुमची एकूण कमाई 1000 रुपये असेल, तर 240 रुपये टॅक्स द्यावा लागेल. पण, टॅक्सची माहिती दिली असेल, तर फक्त अमेरीकन दर्शकांकडून झालेल्या कमाईवर टॅक्स लागेल.

जर यूट्यूबरने टॅक्सची माहिती दिली आणि भारत-यूएस टॅक्स करार क्लेम केला ?

या स्थितीत यूट्यबरच्या 1000 रुपयांच्या कमाईवर फक्त 15 रुपये टॅक्स जाईल. कंपनीने सांगितल्यानुसार, भारत आणि अमेरिकेत टॅक्स करार झाला आहे. यानुसार, दोन्ही देशांच्या दर्शकांकडून झालेल्या एकूण कमाईवर 15% टॅक्स लागेल.

अमेरिकन दर्शकांकडून कुठलीही कमाई न झाल्यावर ?

क्रिएटर्सची अमेरिकन दर्शकांकडून कमाई झाली असेल किंवा नसेल, आपल्या टॅक्सची माहिती Google ला द्यावी लागेल. येणाऱ्या काळात अमेरिकन दर्शकांकडून कमाई झाल्यावर टॅक्स कापला जाईल, अथवा कापला जाणार नाही.

जाहिरातीतून मिळालेल्या पैशातील मोठा भाग गूगल स्वतःकडे ठेवतो

कंटेंट क्रिएटर्सच्या कमाईचा मोठा भाग गूगल आपल्याकडे ठेवतो. तुमच्या चॅनेलला मॉनिटाइज करायचे असेल, तर गूगलच्या काही अटी मान्य कराव्या लागतात. यातील एक अट म्हणजे, तुमच्या चॅनेलवर आलेल्या जाहिरातींच्या पैशातील 45% गूगल स्वतःकडे ठेवतो. यूट्यूबच्या जाहिरातीमधून गूगलला वर्षाला 1 लाख कोटी रुपयांची कमाई होते.

बातम्या आणखी आहेत...