आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Zomato Cuts Staff By 13 Percent; Reduction In The Salaries Of The Remaining Employees

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:झोमॅटोची 13 टक्के कर्मचारी कपात; उर्वरित कर्मचाऱ्यांच्या वेतनातही कपात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेस्तराँ बंद असल्यामुळे फूड डिलिव्हरी व्यवसायावर खूप वाईट परिणाम

कोरोना विषाणू महारोगराईत ऑनलाइन अन्न पदार्थ संकलक कंपनी झोमॅटोने आपल्या १३ टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत जूनपासून पुढील सहा महिन्यांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. कंपनीनुसार, कोरोना विषाणूमुळे हॉटेल व रेस्तराँ बंद असल्यामुळे फूड डिलिव्हरी व्यवसायावर खूप वाईट परिणाम झाला आहे. झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी कर्मचाऱ्यांना मेलद्वारे सांगितले की, कमी वेतनाच्या कर्मचाऱ्यांसाठी कमी कपात आणि जास्त वेतन असणाऱ्यांसाठी जास्त कपात(५० टक्क्यांपर्यंत) प्रस्तावित केली जात आहे. गोयल यांनी लिहिले की, झोमॅटोने आपल्या कामावर जास्त लक्ष द्यावे असे आम्हाला जेव्हा वाटते तेव्हा भविष्यात आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडे पुरेसे काम राहणार नाही. 

आम्हाला आपल्या सर्व सहकाऱ्यांना एका आव्हानात्मक कामाचे वातावरण द्यायचे आहे, मात्र आम्ही भविष्यात आपल्या कार्यबळाच्या जवळपास १३ टक्के कामात असे करू शकणार नाहीत. झोमॅटोचे सह-संस्थापक, सीओओ गौरव गुप्ता आणि सीईओ फूड डिलिव्हरी व्यवसाय मोहित गुप्ता प्रभावित कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर नोकरी मिळावी यासाठी संपर्कात राहतील. दीपिंदर गोयल म्हणाले, झोमॅटो आर्थिक आणि भावनात्मकदृष्ट्या पूर्णपणे शक्य ती सर्व मदत करेल.

बातम्या आणखी आहेत...