आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसाय:महामारीत झूमची झेप, नेटफ्लिक्ससारख्या कंपन्यांच्या मूल्यात 80 % घसरण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड महामारीच्या सुरुवातीच्या काळात तंत्रज्ञान कंपन्यांनी मोठी झेप घेतली होती. अब्जावधी लोक घरात बंद होते, त्यामुळे काम आणि मनोरंजन ऑनलाइन झाले. महामारी सुरू झाल्यानंतर पाच कंपन्यांचे शेअर्स ऑगस्ट २०२१ मध्ये ३२०% पर्यंत वाढले होते. नॅसडॅक निर्देशांकावरील तंत्रज्ञान कंपन्यांनी ८८% ची वाढ नोंदवली. आता ही तेजी संपली आहे. नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग कंपनी, पेलोटन व्यायाम बाइक कंपनी, रॉबिनहूड शेअर ट्रेडिंग अॅप, शाॅपिफाय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग फर्म त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून ८०% खाली आहेत.

दोन वर्षांपासून डिजिटलायझेशन आणि रिमोट कामामुळे उत्पादकतेत लक्षणीय वाढ झाल्याचे कोणतेही स्पष्ट पुरावे नाहीत. तरीही तंत्रज्ञान कंपन्यांबद्दल आशावादी असण्याची कारणे आहेत. खरा फायदा ग्राहक तंत्रज्ञान कंपन्यांपेक्षा डिजिटल बदलाचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणाऱ्या कंपन्यांना झाला आहे. खरे तर डगमगणाऱ्या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल कमकुवत आहेत. २२ ऑगस्टला झूमची वार्षिक कमाई वाढ ८% वर आली होती. तीन दिवसांनी पेलोटनने तिमाही विक्रीत ३०% घट नोंदवली. सबस्क्रायबर्स नेटफ्लिक्स सोडून डिस्ने प्लससारख्या इतर प्लॅटफॉर्मवर जात आहेत. रॉबिनहूडने २५% कर्मचारी कपात केली आहे. यावर्षी संगणक विक्री १०% आणि मोबाइल फोन विक्री ७% ने घटण्याचा अंदाज आहे.

क्लाउडमुळे सायबर सुरक्षेची मागणी निर्माण झाली आहे. तीन सर्वात मोठ्या नोंदणीकृत सायबर सुरक्षा कंपन्यांची कमाई महामारीनंतर जवळपास दुप्पट झाली आहे. त्यांचे बाजारमूल्य तिप्पट झाले आहे. लॉकडाऊन आणि फिजिकल डिस्टन्सिंगने डिजिटल पेमेंट हे आणखी एक तंत्रज्ञान पुढे आणले आहे. महामारीत वेगाने धावणाऱ्या कंपन्यांचा फुगा फुटला असेल, पण डिजिटलायझेशन सुरूच आहे.

क्लाउड कॉम्प्युटिंग व्यवसाय ३९ लाख कोटी रुपयांचा क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा आणि डिजिटल पेमेंट यांसारख्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या पायाभूत सुविधा तंत्रज्ञानाची भरभराट होत आहे. क्लाउड कम्प्युटिंग उद्योग २०१९ च्या १९.३८ लाख कोटी रुपयांवरून ३९.८९ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. अॅमेझाॅनचा क्लाउड व्यवसाय दरवर्षी ३३% दराने वाढत आहे. क्लाउड सेवांमध्ये अॅमेझॉनचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्ट आणि गुगल आहेत. त्यांची वार्षिक विक्री अनुक्रमे ४०% आणि ३६% च्या दराने वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...