जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

 • युटिलिटी डेस्क - भारतीय जीवन विमा प्राधिकरण (LIC) ने एकदाच गुंतवणुकीचा आकर्षक प्लॅन सादर केला आहे. यात फक्त एकदा गुंतवणूक करून दुसऱ्याच वर्षापासून आयुष्यभर इनकम मिळण्याची शाश्वती आहे. जीवन शांति असे या योजनेचे नाव असून त्यातून कुठल्याही पेन्शन प्लॅनप्रमाणे लाभ घेता येईल. या प्लॅनमध्ये आपल्याला मासिक, त्रैमासिक, सहामाही अथवा वार्षिक लाभ घेण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. सोबतच, यामध्ये किमान वार्षिक रिटर्न्स 32,150 रुपये आहेत. असा मिळेल फायदा LIC च्या या योजनेत आपणास एकदाच पूर्ण रक्कम भरावी लागणार...
  February 23, 11:28 AM
 • नवी दिल्ली - भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत पीएफवरील व्याजदरात ०.१० टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला. पीएफच्या २०१८-१९ या वर्षातील ठेवींवर आता ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएफवर पाच वर्षांतील नीचांकी ८.५५ टक्के व्याज होते. ईपीएफओचे विश्वस्त पी.जे. बनासुरे यांनी सांगितले, किमान मासिक पेन्शन २००० रुपये करण्याच्या...
  February 22, 08:37 AM
 • मुंबई- सरकारने १२ बँकांना ४८,२३९ कोटी रुपये भांडवल उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ही रक्कम देण्यात येईल, त्यामध्ये काही बँकांना रिझर्व्ह बँकेने तत्काळ सुधारण्याच्या श्रेणीमध्ये (पीसीए) ठेवलेले आहे. हा पैसा मिळाल्यानंतर बँकांची कर्ज देण्याची क्षमता चार ते पाच लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. छोटे व्यापारी अनेक दिवसांपासून कर्ज मिळण्यास अडचणी येत असल्याची तक्रार करत होते. आता या नवीन कर्जामुळे अर्थव्यवस्थेत तेजी...
  February 21, 08:14 AM
 • नवी दिल्ली- भारतीय शहरांमध्ये जीवन विमा काढणाऱ्या पाच व्यक्तींमधील केवळ एकाकडेच टर्म प्लॅन असतो. मॅक्स लाइफ आणि कॅनटार आयएमआरबीच्या सर्व्हेमध्ये ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार शहरात राहणाऱ्या दोनतृतीयांश भारतीयांकडे (६५ टक्के) कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जीवन विमा असतो. मात्र, यामध्ये सुमारे २१ टक्के लोकांकडेच टर्म इन्शुरन्स असतो. हा सर्व्हे देशभरातील १५ मेट्रोपॉलिटन आणि टिअर-१ शहरातील ४,५६६ लोकांशी चर्चा करून तयार करण्यात आला आहे. मॅक्स लाइफचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)...
  February 21, 08:12 AM
 • युटिलिटी डेस्क - LPG सिलिंडरवर सरकार सब्सिडीचे पैसे देते. हे पैसे तुम्ही दिलेल्या बँक अकाउंटमध्ये काही दिवसांतच जमा होतात. तथापि, काही जण असेही आहेत ज्यांना हे माहिती होत नाही की, त्यांच्या अकाउंटमध्ये सबसिडी जमा होतेय अथवा नाही. यासोबतच अनेकांनी सबसिडीवर सोडलेली आहे, पण तरीही त्यांना याची माहिती नसते. अशा वेळी तुम्ही सिलिंडरवर मिळणारी सबसिडी ऑनलाइन आपल्या मोबाइलमधूनच चेक करू शकता. # सबसिडी चेक करण्याची प्रॉसेस 1. सर्वात आधी www.mylpg.in वेबसाइट तुमच्या स्मार्टफोनवर ओपन करा. 2. आता तुम्ही ज्या...
  February 21, 12:01 AM
 • नॅशनल डेस्क - भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक नोटिफिकेशन जारी करून बँक ग्राहकांना अलर्ट केले आहे. यूनीफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या पैशांच्या व्यवहारात फसवणूक होत आहे. ग्राहकांचे खाते रिकामे केले जात आहेत. आरबीआयला अशा स्वरुपाच्या फसवणुकीच्या तक्रारी मिळत आहेत. त्यामुळेच आरबीआयने नोटिफिकेशन जारी करून ग्राहकांना त्यातून वाचण्याचा उपाय सांगितला आहे. ग्राहकांनी AnyDesk अॅपचा वापर करू नये. आपल्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप असल्यास वेळीच अनइंस्टॉल करावे असे बँकेने...
  February 18, 12:34 PM
 • नवी दिल्ली- शेअर बाजारातील चढ-उतार आणि राजकीय अनिश्चिततेत इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये जानेवारीदरम्यान गुंतवणुकीत ६० टक्क्यांची घट झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात यामध्ये ६,१५८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये १५,३९० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. याव्यतिरिक्त इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये भांडवलाच्या प्रवाहात सलग तिसऱ्या महिन्यात घसरण दिसून आली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये हा आकडा १२,६२२ कोटी रुपये होता. जानेवारीतील ताजा आकडा यापेक्षा ६७...
  February 13, 09:15 AM
 • नवी दिल्ली- डॉलरमध्ये घसरण आणि गुंतवणूकदार आणि व्यापारी यांच्या वतीने खरेदीमध्ये करण्यात आलेल्या वाढीमुळे महिन्याभरापासून बुलियन बाजारात तेजी आहे. अमेरिका आणि चीन यांच्या दरम्यान सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्याने सोने खरेदीचा कल आणखी वाढला आहे. २०१८ मध्ये अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याज दरात वाढ करण्याची गती मंद होण्याच्या अपेक्षेने काही काळ आलेली तेजी सोडली तर सर्वाधिक काळ घसरणच दिसून आली. सोन्याच्या किमतीमधील तेजी केवळ डॉलर घसरल्यामुळे आलेली नाही. गुंतवणुकीसाठीची...
  February 13, 09:10 AM
 • नवी दिल्ली- निवृत्तीधारकांची संघटना ईपीएफओ पीएफ जमावरील व्याजदर २०१८-१९ साठी ८.५५ टक्के कायम ठेवण्याची शक्यता आहे. मागील वर्षीदेखील पीएफ जमावर इतकेच व्याज मिळाले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)चे सहा कोटी पेक्षा जास्त भागधारक आहेत. एका उच्चपदस्थ सूत्राने सोमवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ईपीएफओच्या केंद्रीय संचालक मंडळाची (सीबीटी) पुढील बैठक २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यामध्ये ईपीएफओच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. यामध्ये पीएफ जमावरील...
  February 12, 05:59 PM
 • मुंबई- रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात रिस्ट्रक्चरिंग योजना घोषित केली होती, त्याचा सुमारे ७ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) फायदा मिळणार आहे. या उद्योगांच्या सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे रिस्ट्रक्चरिंग होण्यास मदत मिळेल. वित्त सेवांचे सचिव राजीवकुमार यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, हा आकडा मानांकन संस्था इक्राने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे. इक्राने एमएसएमईच्या १०,००० कोटी रुपयांच्या कर्जाचे रिस्ट्रक्चरिंग होण्याचा अंदाज व्यक्त केला...
  February 12, 09:37 AM
 • नवी दिल्ली- भारतात भारतीय जीवन वीमा निगम म्हणजेच LIC ची जीवन वीमा पॉलिसी सगळ्यात जास्त घेतल्या जाते. याचे मोठे कारण म्हणजे, या पॉलिसीवर भारत सरकारची गॅरेंटी असते. जर तुम्ही LIC ची पॉलिसी घेतली असेल, तर तुमचे पैसे कधीच बुडणार नाहीत. तुमच्या पॉलिसीची मेच्योर होते, किंवा मध्येच तुम्ही तुमचे पैसे काढून घेता, तरिदेखील पॉलिसीचे पूर्ण फायदे तुम्हाला मिळतील. LIC च्या पॉलिसीवर भारत सरकार सॉवरेन गॅरंटी देते. याचा अर्थ LIC कोणत्याही कारणाने कंपनी बुडाली तरिही तुमचे पैसे बुडणार नाहीत. काय आहे सॉवरेन...
  February 1, 12:01 AM
 • औरंगाबाद- नोटबंदी, सातत्याने चढ-उतार होणारे व्याजदर यामुळे २०१८ या आर्थिक वर्षात बँकेतील मुदत ठेवींचे (एफडी) प्रमाण घटले आहे. कार्वी या वित्त सेवा कंपनीच्या ताज्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. सरत्या वर्षात सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील एसआयपी, कंपनी रोखे व शेअर्सना अधिक पसंती दिल्याचे दिसते. आर्थिक वर्ष २०१७ च्या तुलनेत बँक मुदत ठेवींचे प्रमाण २०१८ मध्ये १.६१ टक्क्यांनी घटले आहे. याच काळात शेअर्स, म्युच्युअल फंड, कंपनी रोखे यातील गुंतवणूक मात्र लक्षणीय वाढली आहे....
  January 31, 07:37 AM
 • मुंबई- फरार हिरे व्यापारी मेहूल चोकसीने भारतीय स्टेट बँकेकडूनही ४०५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. १४,००० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा मुख्य आरोपी असलेला चोकसी याच्याशी संबंधित स्टेट बँकेचे हे पहिलेच प्रकरण समोर आले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीशकुमार यांनी सांगितले होते की, या घोटाळ्यात पीएनबीची १,३६० कोटी रुपयांची थकीत रक्कम सोडल्यास एसबीआयचे इतर पैसे थकीत नाहीत. मुंबई, रायगड, नाशिक आणि हैदराबादमधील संपत्तीवर हे कर्ज घेतलेले आहे....
  January 24, 09:40 AM
 • नवी दिल्ली- वयाच्या ४० व्या वर्षी जीवनात अनेक बदल होतात. म्हणजेच, कुटुंब वाढवण्याची किंवा करिअरमध्ये पुढे जाण्याची योजना तुम्ही तयार करत असाल. तुमच्यावर २० ते ३० वर्षे वयापेक्षा जास्त जबाबदारी असते. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या गुंतवणुकीची आवश्यकता असते, जी उद्दिष्ट आणि जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन ठेवण्यास मदत करते. युनिट-लिंक्ड विमा योजनांच्या माध्यमातून करण्यात आलेली नियमित गुंतवणूक तुम्हाला संतुलन ठेवण्यास मदत करते. या ठिकाणी गुंतवणुकीसंदर्भात काही सल्ले देण्यात आले आहेत....
  January 23, 09:48 AM
 • नवी दिल्ली- इनकम टॅक्स वाचवण्याचे अनेक पर्याय असतात. त्यापैकीच एक उपाय आहे तो म्हणजे हाउस रेंट अलाउन्स (HRA). हा तुमच्या सॅलरीचा एक पार्ट असतो. तुमची सॅलरी स्लिप पाहा जर त्यात HRA संबंधित काही माहिती मिळत असेल तर त्या माध्यमातून तुम्ही टॅक्स वाचवू शकतात. परंतू HRAचा फायदा फक्त सॅलरी मिळणाऱ्या, किंवा व्यक्ती एखाद्या भाड्याच्या घरात राहतो अशा लोकांनाच मिळू शकतो. ज्या लोकांचा स्वत:चा बिजनेस आहे त्यांना या संधीचा फायदा घेता येणार नाही. HRAचा फायदा घेण्यासाठी महत्वाचे डॉक्यूमेंट्स HRAचा फायदा...
  January 22, 12:12 AM
 • नवी दिल्ली- खासगी क्षेत्रातील कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सने एक नवीन विमा पॉलिसी सादर केली आहे. या नवीन विमा पॉलिसीअंतर्गत तुम्ही डास चावल्यानंतर होणाऱ्या आजारांवरदेखील विमा करु शकणार आहात. ही एक हेल्थ पॉलिसी असून तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह सर्वांसाठी हा विमा खरेदी करु शकतात. बजाज कंपनी अलायन्सच्या या फॅमिली फ्लोटर पॉलिसीअंतर्गत तुम्ही तुमच्या कुटुंबातील सहा सदस्यांना सहभागी करुन घेऊ शकतात. या आजारांवर मिळेल कव्हर या पॉलिसीमध्ये डासांपासून होणाऱ्या 7 प्रकारच्या...
  January 21, 03:20 PM
 • नवी दिल्ली- तुमचे क्रेडिट स्कोर (Credit Score) चांगले आहे का? बँकेतून लोन घेताना तुम्ही हा प्रश्न अनेकदा ऐकला असेल. आज क्रेडिट स्कोरवर लोनसंबंधी सर्व गोष्टी आधारलेल्या आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरीकेतील लोकांचे क्रेडिट स्कोरविषयी सांगणार आहोत. 35 टक्केपेक्षा अधिक लोकांचा आहे 760 हून जास्त स्कोर मागील काही वर्षांपासून अमेरिकेतील लोकांचा क्रेडिट स्कोर सातशेपेक्षा जास्त आहे. रिपोर्टनुसार एप्रिल 2018मध्ये हा स्कोर 695 होता. वेंटेजस्कोरच्या मते, 35 टक्के...
  January 21, 12:30 AM
 • नवी दिल्ली- आज स्वत:चे एक घर खरेदी करावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुमचेही तेच स्वप्न असेल आणि त्यासाठी तुम्ही होम लोन (Home Loan) घ्यायची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला चार खास टीप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला होम लोन लवकरात लवकर मिळेल. त्यासोबतच तुम्ही होम लोनचा योग्य निर्णय घेऊ शकाल. सर्वात आधी चेक करा क्रेडिट कार्ड रेटींग तुम्ही होम लोन घेत असाल तर सर्वात आधी तुमच्या क्रेडिट कार्डची रेटींग चेक करा. त्यासाठी तुम्ही सिव्हील रिपोर्ट काढून क्रेडिट कार्डचे रेटींग स्कोर चेक करु शकतात. जर...
  January 18, 02:16 PM
 • नवी दिल्ली- मकर संक्रातीवर सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमची नवीन सीरिज लॉन्च होत आहे. यांत तुम्ही 18 जानेवारीपर्यंत गुतंवणुक करू शकता. या स्कीमची खास बाब म्हणजे सरकारने सॉवरेन गोल्ड बान्डच्या योडनेची नवीन सीरीजसाठी 3,214 रूपये प्रति ग्रामची किंमत ठरवली आहे. काय आहे स्कीम सरकारी स्वर्ण बॉन्ड योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू केली होती, ज्याचा उद्देश सोन्यांची फिजीकल डिमांडला कमी करणे आणि घरातील बचतीचा काही भाग आर्थिक संस्थांना मिळावा हा आहे. अशी मिळेल 50 रूपये प्रति ग्राम सूट हा सॉवरेन स्वर्ण...
  January 13, 12:12 AM
 • नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीआधी सरकार छोट्या व्यावसायिकांसाठी आणखी एक भेट देऊ शकते. केंद्र सरकार देशभरातील छोट्या व्यावसायिकांसाठी अपघात विमा योजना आणण्याचा विचार करत आहे. सूत्रांनुसार विम्याची रक्कम १० लाखांपर्यंत असू शकते. कंपनीच्या उलाढालीवर ती अवलंबून असेल. त्यासाठी किरकोळ प्रीमियम भरावा लागेल. जीएसटीत नोंदणीकृत असलेल्या व्यापाऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल. सूत्रांनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच याची घोषणा केली जाऊ शकते. पंतप्रधान विम्याच्या धर्तीवर : ही अपघात विमा योजना...
  January 12, 07:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात