Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

 • नवी दिल्ली -येत्या आॅक्टोबर महिन्यापासून ग्राहकांना आरोग्य विमा कंपनी बदलण्याची (विमा पॉलिसी पोर्टेबिलिटी) सुविधा देण्यात येणार असल्याचे विमा नियामक मंडळाने (इरडा) सांगितले. यामुळे मूळ पॉलिसी न बदलता विमा कंपनी बदलणे शक्य होणार आहे. यापूर्वी इरडाने ही सुविधा एक जुलैपासून लागू करण्याचे जाहीर केले होते. विमा पॉलिसी पोर्टेबिलिटीमुळे पॉलिसीधारकाला कंपनी बदलता येणार आहे. यासाठी इरडा एक संगणकावर आधारित पद्धती तयार करीत आहे, ज्यात विमाकर्ता कंपनीकडून देण्यात आलेल्या आरोग्य विमा पॉलिसीची...
  June 26, 04:16 AM
 • नवी दिल्ली- कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने शैक्षणिक कर्जासाठी शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत ४.५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाया पालकांच्या पाल्यांनाच लाभ मिळू शकेल. देशातील ख्यातनाम व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतीय बँक संघटनेच्या (आयबीए) शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विशिष्ट बँकांकडून दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. या...
  June 25, 05:46 AM
 • नवी दिल्ली-राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने (एनएसआयसी) एसबीआयसोबत स्वस्त कर्जांसाठी करारासंदर्भात बोलणी सुरू केली असून या करारांतर्गत लघु आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना सुलभ व वाजवी कर्जे उपलब्ध करून दिली जातील. राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने येस बँक, अॅक्सिस बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियासोबत यापूर्वीच असे करार केले आहेत. लघु उद्योजकांना त्यांचे ग्राहक करून घेण्यासाठी जास्तीत जास्त बँका आपल्यासोबत करार करीत असून सध्या एसबीआयशी यासंदर्भात बोलणी सुरू असल्याची माहिती महामंडळाचे...
  June 25, 05:13 AM
 • मुंबई - ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांसमोर ठेवून आयडीबीआय फेडरलने आयडीबीआय फेडरल टर्मन्श्युरन्स सिनिअर्स इन्श्युरन्स प्लॅन ही नवीन मुदत विमा योजना बाजारात आणली आहे. वैद्यकीय चाचणीमुक्त असलेल्या या अनोख्या विमा योजनेमध्ये ५० पेक्षा जास्त वय असलेल्या वरिष्ठ व्यक्तींना विमा संरक्षण देण्यात आले आहे. वयाची चाळीशी ओलांडलेली कोणतीही व्यक्ती ही मुदत विमा योजना घेऊ शकते आणि त्यासाठी प्रती महिना १०० रुपये किमान प्रिमियम भरावा लागेल. ही योजना वयाच्या ८५व्या वर्षांपर्यंत घेता येऊ शकेल आणि...
  June 24, 04:05 AM
 • नवी दिल्ली - सेवानिवृत्ती दाव्यांचा निपटारा आणि खाते अद्ययावत करण्यात होणाऱया विलंबावर सरकारची करडी नजर असल्याचा इशारा आज सरकारकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेला देण्यात आला. ईपीएफओकडील प्रलंबित प्रचंड प्रकरणांबद्दल अर्थ मंत्रालयाने नुकतीच चिंता व्यक्त केली आहे. सन २०१०-११ या वित्तीय वर्षासाठी ईपीएफओ खातेधारकांना ९.५ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने मंजूर केला असल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मल्लिकार्जुन खारगे यांनी दिली. ३१ मार्च २०१०...
  June 23, 03:41 AM
 • नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील व्याजदरात वाढ झाल्यानंतर आठवडाभरातच आयएनजी वैश्य या खासगी क्षेत्रातील बँकेने २५ मूळ अंकांनी व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडून जारी पत्रकानुसार, या वाढीमुळे ९.४५ टक्के असणारा बँकेचा व्याजदर आता ९.७० टक्के झाला आहे. सुधारित व्याजदर मूळ दराशी संलग्न सध्याच्या सर्व कर्जांना २१ जूनपासून लागू होईल. या वाढीमुळे आयएनजीची गृह, वाहन तसेच इतर कर्जे महागणार आहेत. ही व्याजदर वाढ जाहीर करताना बँकेने बेंचमार्क प्राइम लेंडिंग (बीपीएल) दरातही २५ मूळ अंकांची वाढ...
  June 22, 06:57 AM
 • नवी दिल्ली - एलआयसी कार्ड्स आणि अँक्सिस बँकेने आज भागीदारी करून ग्राहक, एलआयसी व तिच्या उपकंपन्यांच्या कर्मचार्यांसाठी एक मूल्यवर्धित क्रेडिट कार्ड सादर केले आहे. विमानतळाच्या लाऊंजमध्ये प्रवेश तसेच इंधन अधिभारात सूट मिळण्यासाठी या कार्डद्वारे अनेक फायदे मिळू शकतील, असे एलआयसी व अँक्सिस बँकेच्या संयुक्त पत्रकात सांगण्यात आले. या माध्यमातून एलआयसीच्या ग्राहकांना पेमेंट करता येऊ शकण्याच्या गरजा पूर्ण होतील, अशी माहिती अँक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक शिखा शर्मा यांनी दिली....
  June 21, 04:17 AM
 • औरंगाबाद । एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाने 90 दिवसांची निश्चित मुदतठेव योजना सुरू केली आहे. ही योजना 100 टक्के डेब्ट स्वरूपाची असून, इतर ठेवींना चांगला पर्याय असल्याचे कंपनीचे विभागीय व्यवस्थापक शेखर बुवा यांनी सांगितले. 23 ते 28 जून या कालावधीत या योजनेत सहभागी होता येईल. किमान गुंतवणूक 10 हजार रुपये, लाभांश व वृद्धी असे दोन पर्याय, करमुक्त लाभांश (वितरण करानुसार), एका युनिटचे मूल्य 10 रुपये अशी या योजनेची काही वैशिष्ट्ये आहेत.
  June 21, 04:03 AM
 • औरंगाबाद- आपला समाजाच्या रक्तातच बचत आहे. पूर्वी स्त्रिया कनगी किंवा माठात पैसे जपून ठेवत आणि आर्थिक पेचप्रसंगात ही बचत आपल्या पतीला देत. बचत आणि गुंतवणूक ही भारतीय स्त्रीची मोठी परंपरा आहे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी केले. भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक अनिल भालेराव, बँकेच्या संस्थापक अध्यक्षा मंदाताई जोशी, अध्यक्षा संध्या कुलकर्णी, सरव्यवस्थापक मधुकर कुलकर्णी, उपाध्यक्ष...
  June 21, 03:43 AM
 • माझा मित्र एका प्रथितयश कंपनीचा मार्केटिंग प्रमुख होता. आपली नोकरी बदलण्याच्या विचारात होता. त्याची मुख्य चिंता आर्थिक समस्याची होती. त्याने माझ्याकडे ती चिंता बोलूनही दाखवली. चांगला पगार असूनही तो आर्थिक संकटात असल्याचे दिसल्याने मी आश्चर्यचकित झालो. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, अडचण पगाराची नसून योग्य पद्धतीने नियोजन न केल्याची आहे. या चर्चेदरम्यान मी काही मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. ते आपणास सांगू इच्छितो. त्यामुळे रमेशसारख्याच अडचण निर्माण झालेल्या...
  June 20, 03:24 AM
 • वर्ष १९९१ पासून आपल्या देशात अमलात आणलेल्या आर्थिक सुधारणांच्या अनेकविध उपायांतील अलीकडचे उदाहरण म्हणजे ही नवीन निवृत्ती योजना. सर्वसाधारणपणे निवृत्तीवेतन किंवा पेन्शन ही संकल्पना आपल्या देशात तरी पिढीजातपणे सरकारी कर्मचायांच्या हक्काची गोष्ट मानली जात असे. खासगी क्षेत्रातील तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी किंवा स्वयंरोजगारितांसाठी अशा पद्धतीने सरकारी यंत्रणेतून निवृत्ती वेतनाची पद्धत या आधी तरी आपल्या देशात नव्हती. सरकारी कर्मचा-यांत त्यांच्या दरमहा पगारातून...
  June 20, 03:14 AM
 • मुंबई: आयडीबीआय बँकने निवडक प्रवर्गातील शैक्षणिक कर्जे व किरकोळ मुदतठेवींचे दर ५० मूळ अंकांनी वाढवले आहेत. तथापि, मूळ दर मात्र बदलले नसल्याचे आयडीबीआयकडून सांगण्यात आले. सध्या आम्ही मूळ दर वाढवले नाहीत, जमा रकमांची मागणी मंदावली आहे आणि आम्ही आमची तरलता स्थितीही विचारात घेण्याचे ठरवले आहे, अशी माहिती आयडीबीआयचे कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी आर. के. बन्सल यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेने दहाव्या वेळी धोरणात्मक व्याजदरात २५ मूळ अंकांची वाढ केल्यानंतर बँकांवर निर्माण...
  June 19, 04:21 AM
 • नवी दिल्ली: तुम्ही सेवानिवृत्त होत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कोणत्याही कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांना मिळणा-या एकरकमी पेन्शनवर (कम्युटेशन) आता कोणतीही कर आकारणी केली जाणार नाही. नुकतीच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. सीबीडीटीच्या अधिसूचना क्रमांक ३३/२०११ नुसार कर्मचायांच्या हितासाठी नियोक्त्याकडून उपलब्ध झालेली रक्कम आयकरमुक्त असेल. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचायांसाठी भारतीय जीवन वीमा निगम (एलआयसी) किंवा इतर विमा...
  June 19, 04:19 AM
 • मुंबई ब्युरो: रिझर्व्ह बॅँकेच्या गव्हर्नर डॉ. श्यामला गोपीनाथ यांनी पोस्टातल्या अल्पबचत योजनांमधील दीर्घ मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याची शिफारस केली आहे, परंतु तरीही ठेवीदारांना बॅँकांमधील ठेवींचे जास्त आकर्षण आहे.बाजारातील सध्याच्या व्याजदराचा विचार करता श्यामला गोपीनाथ यांच्या समितीने शिफारस केलेल्या अल्पबचत योजनांमधील मुदत ठेवींच्या व्याजाच्या तुलनेत बॅँकांकडून मुदत ठेवींवर जवळपास अर्धा टक्का जास्त व्याज देण्यात येत आहे.समितीने सुचवलेला प्रस्ताव मान्य...
  June 17, 04:16 AM
 • मुंबई: एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादनात दखल घ्यावी एवढी घट झाली होती. असे असूनही कॉर्पोरेट जगताने पहिल्या त्रैमासिकांत भरलेल्या आगाऊ करात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे आर्थिक विकास दर घसरण्याची चिंता आता कमी झाली आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हेडक्वार्टर्स म्हटल्या जाणार्या शंभर कंपन्यांनी चौदा टक्के अतिरिक्त आगाऊ कर जमा केलेला आहे. विशेषत: बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्या याबाबत अग्रेसर राहिलेल्या आहेत. देशातील सर्वांत मोठी असलेली बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 1100 कोटी...
  June 17, 03:37 AM
 • महागाईच्या झळा बसत असल्याने त्यावर उतारा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या दीड वर्षातील व्याज दरातली दहावी वाढ गुरुवारी जाहीर केली. बँकेने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गृहकर्ज आणि गाड्यांच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ झाली आहे. महागाई कमी करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे सामन्यांचं स्वतःच्या घराचं स्वप्न आणखी महागणार आहे. चालू आर्थिक महिन्याच्या पहिल्या तिमाहीच्या पहिल्या दीड महिन्याच्या आर्थिक घडमोडींचा आढावा रिझर्व्ह...
  June 16, 01:47 PM
 • नवी दिल्लीपोस्ट बचत खाते दारांसाठी एक वाईट बातमी आहे. पोस्टातील बचत खात्या द्वारे मिळणा-या व्याजावरही आता कर आकारणी केली जाणार आहे. वैयक्तीक बचत खात्यातील जमा रकमेवरील 3,500 रुपयांपर्यते व्याज हे करमुक्त असणार आहे. तर संयुक्त खात्यासाठी ही मर्यादा 7 हजार रुपयांपर्यंत असेल. असे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) काढलेल्या अधिसुचनेत म्हटले आहे. या संदर्भात सीबीडीटीच्या अधिका-याकडे विचारणा केली असता नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ बँकेतील जमा रकमेवरच...
  June 15, 11:57 AM
 • बॅँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या किरकोळ कर्ज व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बॅँकेने किरकोळ कर्जांसाठी खास केंद्र (रिटेल हब) उभारण्याचा विचार केला असल्याचे बॅँकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए.एस. भट्टाचार्य यांनी सांगितले. मुंबईतील कफ परेड येथील वरिष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.या किरकोळ केंद्रांमुळे कर्ज मंजुरीसाठी अगोदर लागणारा 10 ते 12 दिवसांचा कालावधी कमी होऊन फक्त 3 दिवसात कर्जे मंजूर होण्यास मदत...
  June 15, 07:07 AM
 • नवी दिल्ली - भारतीय शहरांतील शहरीकरणाच्या वाढत्या गतीला सामोरे जाण्यासाठी गृहनिर्मिती प्रकल्पांवरील विविध कर वाजवी असायला हवेत, असा निष्कर्ष लेखासंस्था ग्रँट थ्राँटन आणि सीआयआयच्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.स्थलांतराला सामावून घेण्यासाठी निवासी गृहनिर्मितीचा खर्च वाजवी असायला हवा, असे मत सर्वेक्षण कंपनीने जारी केलेल्या पत्रकात कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार विशेष चंडीओक यांनी व्यक्त केले आहे. सन 2012 पर्यंत भारतीय शहरांत 35 दशलक्ष घरांची कमतरता असेल, याकडे लक्ष वेधताना...
  June 14, 01:10 PM
 • शैक्षणिक खर्चात गेल्या दोन वर्षांत प्रचंड वाढ झाल्याने पालकवर्गांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यास दरवर्षी दीड ते दोन लाख रुपये शुल्क मोजावे लागतात. अभियांत्रिकीसाठी आता एक लाख रुपये दरवर्षी मोजावे लागणार आहेत. गेल्या दहा वर्षांत विविध बॅंकानी शैक्षणिक कज्रे देण्यास सुरुवात केल्याने, पालकांच्या खर्चाचा भार थोडा हलका झाला आहे. बॅंकासोबतच आता आयकर खातेही पुढे सरसावले आहे. शैक्षणिक कज्रे घेणार्याना आता आयकरातून सूट मिळणार आहे.डिडक्शनचा प्रकार:...
  June 13, 03:28 AM
 
जाहिरात

RECOMMENDED