Home >> Business >> Personal Finance

Personal Finance News

 • आपण बॅंकेत पैसे ठेवले असतील तर आपल्याला एक खूषखबर आहे. कारण याबाबत भारतीय रिजर्व बॅकेने़ काही पावले उचलली असून बॅंकांना बचतखात्यावर तीन महिने किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधीच्या आधारावर व्याज देण्याची सूचना करु शकते. सध्या बहुतांशी बॅंका सहा महिने किंवा त्यांच्यापेक्षा अधिक कालावधीच्या आधारावर ग्राहकांच्या खात्यावर व्याज जमा करण्यात येते. मात्र जास्त व्याज देणाच्या बदल्यात ग्राहकांना बॅंकाच्या इतर सुविधांसाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण बॅंका ग्राहकांच्या...
  May 28, 07:06 PM
 • आयसीआयसीआय बॅंकेने लीग ऑफ वर्ल्डस १०० मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅण्ड्समध्ये ५३ वे स्थान मिळवले आहे. मिलवॉर्ड ब्राउन याने तयार केलेल्या यादीत आयसीआयसीआय ही बॅक भारतातील एकमेव ब्रॅण्ड आहे. १४.९ अब्ज डॉलरचे ब्रॅण्ड मूल्य असलेल्या या बॅंकेने सलग दुसऱ्यांदा हे स्थान पटकावले आहे. ब्रॅण्ड्झ निर्देशांकाने अनेक घटकांनुसार ब्रॅण्ड व्हॅल्यू निश्चित केली आहे. त्यात उत्पन्नातील ब्रॅण्ड्सचे योगदान, मालमत्तेचे मूल्यांकन, समृद्धीचा अंदाज व ग्राहकाच्या दृष्टिकोनाचे मोजमाप आंदींचा समावेश आहे....
  May 27, 08:12 PM
 • मुंबई - बॅंकेत पैसे असूनही एटीएमचा व्यवहार करताना ग्राहकांना काही कारणास्तव पैसे मिळाले नाहीत तर संबंधति बॅंकांनी सात दिवसाच्या आत संबंधित ग्राहकाच्या खात्यात रक्कम जमा करावी, असे निर्देश शुकवारी रिझर्व बॅंकेने बंकाना दिले. याबाबत ग्राहकाने बॅंकेकड़े तक्रार अर्ज दिल्यानंतर त्यांची सात दिवसात दखल घ्यावी अन्यथा त्यानंतर ग्राहकाच्या खात्यात दररोज १ रुपये प्रमाणे त्याला परतावा द्यावा. यापूर्वी ही मुदत १२ दिवसाची होती. मात्र बॅंका ग्राहकांच्या तक्रारीची वेळेत दखल घेत नव्हत्या....
  May 27, 06:41 PM
 • घर घेतांना राहा सावध घर घेणे सोपे नसते. असे म्हणतात, घर पाहावे बांधून.. अर्थात आजकाल मोठ्या शहरांमध्ये स्वतंत्र घरे बांधणे कठीणच आहे. त्यातही सदनिका घेणे थोडा सोपा आहे. पण, तिथेही अनेक अडचणी येतातच. त्यामुळे घर खरेदी करतांना सावध राहूनच पुढचे व्यवहार करावे. घर खरेदी करतांना काही गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे. नंतरच पुढे जावे. घराची वास्तविक किंमत विकसाकासोबत केल्या जाणाऱ्या अग्रीमेंट मध्ये घराच्या किंमतीबाबत सगळ्या गोष्टींचा उल्लेख असतो. वीज, पाणी, पार्किंगची जागा, रजिस्ट्रेशन...
  May 25, 03:50 PM
 • सिबिल रेकोर्ड क्लीअर हवा आजकाल 'सिबिल' हा शब्द बहुतांश लोकांचा परिचयाचा असेल. कोणतेही कर्ज घ्यायला गेलात किंवा क्रेडीट कार्ड साठी अर्ज केला कि या शब्दाचा संबंध येणारच. सिबिलच्या यादीत तुमचा क्रेडीट स्कोर असतो. तो जेवढा जास्त तेवढी तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त. काय आहे हा सिबिल नावाचा प्रकार आणि त्यातील क्रेडीट स्कोरची पद्धती, हे समजून घेऊ या. सिबिल ही एक क्रेडीट इन्फोर्मेशन कंपनी आहे. प्रत्येक कर्ज घेणाऱ्या आणि क्रेडीट कार्ड धारकाची माहिती सिबिलकडे असते. तशी माहिती सिबिलकडे...
  May 25, 02:51 PM
 • गृह खरेदीसाठी थोडे थांबा घर असावे, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण गृहखरेदीचा योग कधी साधावा याबाबत सगळेच जण संभ्रमात असतात. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार घरांच्या किंमती नजीकच्या काळात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही काळ थांबून मगच खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या घरांच्या किंमती बऱ्याच वाढलेल्या आहेत. त्यातच गृहकार्जाही महागले आहे. याशिवाय रेती, सिमेंट, लोखंडाच्या किंमती वाढल्यामुळे निर्मितीमूल्यही जास्त झाला आहे. साहजिकच याचा परिणाम घरांच्या किंमतीवर झाला...
  May 25, 01:48 PM
 • जर तुम्ही प्राप्तिकरदाते असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला प्राप्तिकराचा रिफंड एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंतच मिळणार आहे. ही नवी योजना या वर्षापासूनच लागू करण्यात येणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने प्राप्तिकर रिफंडविषयीचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाला दिले आहेत. आतापर्यंत करदात्यांना प्राप्तिकराच्या रिफंडसाठी अनेक महिने वाट पाहावी लागत होती. दरम्यान लोकांना आता या समस्येतून सुटकारा मिळेल. अभ्यासकांच्या मते, या नव्या...
  May 19, 08:42 PM
 • विमा पॉलिसीचा प्रिमियम कमी कसा करता येईल, याचे काही उपाय आम्ही इथे देत आहोत. तरुण वयातच घ्यावी पॉलिसीविम्याची पॉलिसी खरेदी करण्यास वेळ लागू देऊ नये. जस जसे तुमचे वय वाढेल. त्याप्रमाणे विम्याचा हप्तादेखील वाढत जातो. अनेक तरुण आर्थिक बोजामुळे विम्याला गंभीरपणे घेत नाहीत. जसे जसे वय वाढू लागते, तस तसे कळते की विमा खूप आवश्यक आहे. जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षांनंतर विमा पॉलिसी घेतली आणि तुम्हाला कोणता आजार असेल, तर तुमच्या प्रिमियमची रक्कम वाढू शकते. त्यामुळे तरुण वयात लवकरात लवकर पॉलिसी...
  May 19, 08:34 PM
 • सध्याच्या महागाईच्या जमान्यात दोन आणि चार लाखांत घरं मिळणे, केवळ अवघड आहे. या भावात जमीन मिळणेही अवघड आहे. दिल्ली एनसीआरच्या गाझियाबाद भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बनविण्यात येत आहेत. जीडीएचे उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी ही योजना अंमलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. जी लोकं महागडी घरे विकत घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ही स्वस्तातील घरे लाभदायक ठरतील, असा त्यांना विश्वास आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींसाठी घरे हे सध्याच्या काळात केवळ स्वप्नच बनून...
  May 19, 08:31 PM
 • सिबिल स्कोअर ग्राहकांना ४५० रुपयांच्या मोबदल्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्कोअरच्या आधारावरच सगळ्या बॅंका किंवा वित्तसंस्था ग्राहकांना कर्ज देतात, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तरीही हा स्कोअर जाणून घेण्यासाठी ४५० रुपये देणे योग्य आहे का, हे समजून घ्यावे लागेल. क्रेडिट इन्फोर्मेशन ब्यूरो ऑफ इंडिया लिमिटेड ही ग्राहकांच्या क्रेडिटसंदर्भातील माहिती देणारी एक कंपनी आहे. बॅंका आणि अन्य वित्तसंस्थाकडून कर्ज घेणाऱया ग्राहकांची माहिती सिबिल आपल्याकडे जमा करते. ग्राहकांनी...
  May 19, 08:29 PM
 
जाहिरात

RECOMMENDED