जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • नवी दिल्ली- LIC विम्या व्यतिरिक्त एक सहकंपनी सुध्या चालवते. LIC म्युचुअल फंड असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या अनेक योजनांनी चांगला परतावा देखील दिला आहे. एप्रिल महिन्यात अनेक जण कर वाचविण्यासाठी गुंतवणूकीचे नियोजन करत असतात. अशा व्यक्तींसाठी LIC म्युचुअल फंडाची टॅक्स सेव्हिंग स्कीम खूपच चांगली आहे. या योजनेने एका वर्षात 19.6 टक्के रिटर्न दिला आहे. या योजनेने 5 वर्षात सरासरी 18 टक्के रिटर्न दिला आहे. अशात जर कुणी 4 वर्षापुर्वी गुंतवणूक केली असेल तर ती आता दुप्पट झाली आहे. जाणून घ्या डायरेक्ट...
  May 8, 12:06 AM
 • नवी दिल्ली- जागतिक बाजारात तेजी असल्याने आणि स्थानिक बाजारपेठेत मागणी वाढल्याने सोने महागले आहे. दिल्लीत सोन्याच्या भावात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या सोन्याचा भाव 32,180 रुपये प्रती दहा ग्रॅम एवढा आहे. औद्योगिक कारणांमुळे चांदीलाही मागणी असल्याने चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. 100 रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचा प्रतिकिलो भाव 40,600 रुपयांवर पोहचला आहे. हे आहे भाववाढचे कारण व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, लग्नसराई असल्याने सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुले स्थानिक व्यापारी, रिटेलर्स...
  May 7, 07:55 PM
 • नवी दिल्ली- देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यासोबत नातेसंबंधांमुळे अजय पिरामल यांना कोट्यावधीचा फायदा झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी यांचा विवाह पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत होणार आहे. या वृत्तानंतर सोमवारी पिरामल एंटरप्रायझेसच्या शेअरचा भाव वधारला. काही वेळातच पिरामलचे मार्केट कॅप 800 कोटी रुपयांनी वाढले. भारतातील 22 व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती फोर्ब्सच्या...
  May 7, 01:08 PM
 • नवी दिल्ली- मुकेश अंबानी यांच्या मुलीचा ईशाचे लग्न अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत ठरला आहे. फोर्ब्सने 9 फेब्रुवारी 2018 रोजी जारी केलेल्या श्रीमंताच्या यादीत अजय पिरामल हे 22 व्या स्थानावर आहेत. आता त्यांची दौलत 4.9 अब्ज डॉलर आहे. 33 हजार कोटी रुपयांची आहे अजय पिरामल यांची दौलत - फोर्ब्सच्या यादीनुसार पिरामल एंटरप्रायझेसचे मालक अजय पिरामल यांची संपत्ती 33 हजार कोटी रुपये (4.9 अब्ज डॉलर) आहे. या समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल हे 62 वर्षांचे आहेत. ते फार्मा, हेल्थ केअर आणि आर्थिक...
  May 7, 12:34 PM
 • मुंबई/नवी दिल्ली- रिलायन्सच्या शेअरमध्ये 3.5% टक्क्यांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना 21325 कोटींचा फटका बसला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना रिलायन्सच्या शेअरचा दर 994.75 रुपयांवर होता. सोमवारी तो 961.10 पर्यत कोसळला. शुक्रवारी कंपनीचे 630413 कोटी रुपये बाजारमुल्य होते. ते घटल्याने 21325 कोटी रुपयांचे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. रिलायन्सच्या शेअरने 992 रुपयांवरही पोहचला होता. पण सध्या तो 2.65 टक्क्यांनी घसरला असून 968 रुपयांवर आहे. शेअर का कोसळला? कंपनीने पुढील काही महिन्यात केजी डी-6 ब्लॉकमधून तेल...
  April 30, 02:08 PM
 • नवी दिल्ली- तुम्हाला चांगला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला मोठी रक्कम गुंतवावी लागेल हा केवळ एक गैरसमज आहे. तुम्ही कमी गुंतवणूक करुनही चांगला पैसा कमावू शकता. पण तुम्हाला बाजाराचे काही मुलभूत नियम लक्षात घ्यावे लागतील. हे ते नियम आहेत जे अनेक मोठे गुंतवणूकदार शेअर बाजारात अवलंबतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही नियम सांगणार आहोत. मोठे गुंतवणूकदारही अवलंबतात हे नियम आम्ही तुम्हाला असे 8 मंत्र सांगत आहोत जे वॉरेन बफे, राजेश झुनझुनवाला आणि आर.के. दमानी यांनी अवलंबले आहेत. या सगळ्यांची...
  April 30, 10:31 AM
 • नवी दिल्ली- आर्थिक वर्ष 2018 च्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्यूलरचे नुकसान तिपटीने वाढून 930.6 कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे. ऑपरेटिंग रेव्हेन्यू 24 टक्क्यांनी कमी होऊन 6,137 कोटी रूपये इतका झाला आहे. आयडिया सेल्यूलरने आर्थिक पडझडीला गळेकापू स्पर्धा आणि कठोर नियमांना जबाबदार धरले आहे. आयडियाला आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 4,139.90 कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये कंपनीच्या नुकसानीचा आकडा 404 कोटी रूपयांपर्यंत आला होता. पुढे वाचा: जिओला झाला किती फायदा
  April 28, 08:59 PM
 • नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीजला आर्थिक वर्ष 2018 ची चौथी तिमाही अतिशय उत्तम ठरली आहे. या काळात कंपनीचे उत्पन्न पहिल्यांदाच 1 लाख कोटीच्या पलिकडे गेले आहे. चौथ्या तिमाहीत आरआयएलचा नफा 9435 कोटी रुपये राहिला आहे. तर या दरम्यान टेलिकॉम वर्टिकल जिओचा नफा 504 कोटी रुपये राहिला आहे. चौथ्या तिमाहीत आरआयएलचा जीआरएम 11 डॉलर प्रति बॅरल राहिला आहे. कंपनीने प्रति शेअर 6 रूपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. -कंपनीचा PBDIT पहिल्यादाच 10 अब्ज डॉलरच्या पलिकडे -आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान कंपनीचा नेट रेवेन्यू 4,30,731...
  April 27, 08:26 PM
 • नवी दिल्ली- एक लाखाची गुंतवणूक अवघ्या 17 दिवसात 3 लाख झाली असे कुणी तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण असे झाले आहे. तुम्ही जर 9 एप्रिल रोजी एक लाख रुपये गुंतवले असतील तर ते 17 दिवसात म्हणजे 26 एप्रिल रोजी 3 लाखापेक्षा अधिक झाले असेल. इतक्या जास्त परताव्याने मार्केट रेग्युलेटरही हैराण झाले आहेत. 17 दिवसात 1 लाखाचे झाले 3 लाख रुपये येथे आम्ही चर्चा करत आहोत जेनिथ एक्सपोर्ट्सच्या स्टॉकची. या स्टॉकची किंमत 9 एप्रिल रोजी केवळ 39 रुपये होती. त्यानंतर त्यात इतकी तेजी आली की 17...
  April 27, 01:22 PM
 • नवी दिल्ली- पैशाची गरज तुम्हाला कधीही आणि कुठल्याही वेळी पडू शकते. त्यामुळे कधीही सारा पैसा एकाच योजनेत गुंतवू नका. तुमचा काही पैसा तुम्ही निश्चितच बचत खात्यात ठेवला पाहिजे. कारण हा पैसा तुम्ही कधीही काढू शकता. तुम्ही गुंतवणूक करताना एक विचार निश्चितच करत असाल तो म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो. बॅंक असो की पोस्ट ऑफिस येथील बचत खात्यावर तुम्हाला वर्षाला केवळ 4 टक्के परतावा मिळतो. पण एक योजना अशी आहे जिथे तुम्हाला बचत खात्यासारख्या सुविधा मिळतात शिवाय तुम्हाला 9...
  April 24, 12:54 PM
 • नवी दिल्ली- प्रत्येकाला वाटते की पैसे अशा ठिकाणी गुंतवावेत जेथे ते कमीत कमी कालावधीत दुप्पट होतील. आजच्या काळात यासाठी बॅंक, पोस्ट ऑफिसपासून सरकारी बॉन्ड, म्युचअल फंडसारखे अनेक लोकप्रिय मार्ग आहेत. तुम्ही वेगवेगळ्या स्कीममधून किती रिटर्न मिळेल हे जाणून घेऊ शकता. पण हे जाणणे अवघड आहे की कोणत्या स्कीममधून पैसे वाढून दुप्पट होतील. अनेक लोक पैसे गुंतवतात पण त्यांना नेमके माहिती नसते की पैसे किती दिवसात डबल होतील. अशात आम्ही तुम्हाला एक खास फॉर्मुला सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहज...
  April 19, 11:18 AM
 • नवी दिल्ली- म्युचुअल फंडावर लावण्यात आलेला कर 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. या अनुसार म्युचुअल फंडाद्वारे मिळणाऱ्या लाभांशावर 10 टक्के डिविडंट डिस्ट्रीब्यूशन टॅक्स (DDT) आकारण्यात येणार आहे. याशिवाय 10 टक्के लॉग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (LTCG) लावण्यात आला आहे. हा टॅक्स त्या लोकांना द्यावा लागणार ज्यांना एका वित्तीय वर्षात 1 लाखापेक्षा अधिक कॅपिटल गेन झाला आहे. या कॅपिटल गेनची गणना स्टॉक मार्केट आणि म्युचुअल फंड दोन्हीद्वारे झालेल्या फायद्याला मिळून केली जाणार आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की,...
  April 17, 06:50 PM
 • नवी दिल्ली- शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदवण्यात आली. आज (सोमवार) दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 161.57 अंशांनी वधारून 33 हजार 788 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 47.75 अंशांची वाढ नोंदवण्यात आली. निफ्टी 10 हजार 379 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. येत्या आठवड्यात काही दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली इन्फोसिस येत्या आठवड्यात जानेवारी ते मार्च कालावधीचे तिमाही निकाल...
  April 16, 07:21 PM
 • नवी दिल्ली- SBI म्युचुअल फंडाच्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्कीमने मागील एका वर्षभरात 36 टक्क्याहून अधिक रिटर्न दिला आहे. तर गत तीन वर्षात या योजनेने 26 टक्के CAGR (सरासरी दरवर्षी 26 टक्के रिटर्न) दिला आहे. एसबीआयची सहयोगी कंपनी एसबीआय म्युचुअल फंड अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AMU) मध्ये देशातील टॉप 5 कंपन्या सामील आहेत. त्यांना हे स्थान मार्च 2018 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात मिळाले आहे. या फंड हाऊस जवळ इक्विटी आणि डेटच्या अनेक पध्दतीच्या योजना आहेत. जेथे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. 8 एप्रिल 2018 रोजी...
  April 16, 07:08 PM
 • मुंबई - शेअर बाजारात सोमवारी घसरण पाहायला मिळाली. आयटी कंपनी इन्फोसिसला त्याचा मोठा फटका बसला. कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 6 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी सकाळी शेअर बाजाराला सुरुवात होताच, जवळपास 1099 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी 1,171.45 रुपयांवर इन्फोसिसचे शेअर बंद झाले होते. त्याचबरोबर कंपनीच्या मार्केट कॅपमधून 15,000 कोटी कमी झाले. पण नंतर शेअर्सच्या खरेदीला पुन्हा सुरुवात झाली आणि शेअर्सचे भाव 2.5% पर्यंत रिकव्हर झाले. 6% टक्के घसरणीने सुरुवात - इन्फोसिसच्या...
  April 16, 02:54 PM
 • मुंबई-पंजाब नॅशनल बॅंकेच्या ब्रीच कँडी शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याची माहिती बँकेने पत्र लिहून मुंबई स्टॉक एक्स्चेंजला दिली आहे.काही खातेदारांच्या संगनमताने 1.77 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 11 हजार 357 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय झाल्याचे पंजाब नॅशनल बँकेचे म्हणणे आहे. काही अनधिकृत आणि संशयास्पद व्यवहार झाल्याचे बँक प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ही माहिती देण्यात आली. इतर बॅंकांकडूनही या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये परदेशात पैसा पाठवला. हा प्रकार उघड होताच...
  February 14, 04:53 PM
 • नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेमधील नकारात्मरक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह उघडला. त्यामुळे सोने 330 रुपयांनी वाढून 31,600 रुपये प्रती ग्राम झाले. ही 14 महिन्यातील सर्वात मोठी वाढ आहे. यापुर्वी 9 नोव्हेंबरला सोन्याचे भाव 31,750 रुपये प्रती ग्राम होते. तेव्हा सोन्यामध्ये 900 रुपयांची वाढ झाली होती. सोन्याचे भाव वाढीची कारण लगनसराई मानले जात आहे. गुंवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले आज सेन्सेक्स 1274 अंकांनी घसरत 33482.81 वर उघडला. तर निफ्टी 390 अंकांनी घसरून 10,276.30 अंकांवर उघडला. यामुळे...
  February 6, 06:08 PM
 • मुंबई- अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात हाहाकार उडाला. सेन्सेक्स ८३९.९१ अंक आणि निफ्टी २५६.३० अंकांनी गडगडले. अर्थसंकल्पाच्या पुढच्या दिवशी बाजाराच्या प्रतिक्रियेच्या हिशेबाने पाहता ९ वर्षांनंतर इतकी मोठी (२.३५%) घसरण आहे. यापूर्वी १५ फेब्रुवारी २००९ ला अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स २.९१% कोसळला होता. तेव्हा प्रणव मुखर्जी यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. दिवसांच्या हिशेबाने ही अडीच वर्षांतील सर्वात मोठी घसरण आहे. २४ ऑगस्ट २०१५ ला सेन्सेक्स...
  February 3, 02:51 AM
 • नवी दिल्ली :- शेअर मार्केट सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी उच्च स्तरावर गेले आहे. बाजार उघडताच सेन्सेक्सने 36,268.19 आणि निफ्टीने 11,110.10 चा टप्पा पार केला आहे. यापुर्वी मार्केटीची सुरुवात धिम्या गतीने झाली. हेवीवेटचेओएनसीजी, टिसीएस, आयटीसी, मारुती, एचडीएफसी बॅंक आणि इन्फोसिसमध्ये यांच्या मदतीने मार्केटला मोठा सपोर्ट मिळाला. काय झाले होते मंगळवारी - मंगळवारी पहिल्यादांच सेन्सेक्स 36,000 आणि निफ्टी 11,000 वर पोहचला होता. सेंन्सेक्सची ही आतापर्यंत सर्वात वेगवान उसळी होती. - नंतर संध्याकाळी सेन्सेक्स 341.97...
  January 24, 02:30 PM
 • नवी दिल्ली- सेन्सेक्सने बुधवारी ३५ हजारांचा अभूतपूर्व उच्चांक गाठला. ३० शेअर्सचा हा निर्देशांक ३१०.७७ अंकांच्या वाढीसह ३५,०८१.८२ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो ३५,११८.५१ अंकांवर पोहोचला होता. यापूर्वी १५ जानेवारीला सेन्सेक्स ३४,८४३.५१ अंकांवर बंद झाला होता. निफ्टी ८८.१९ अंकांनी वधारून १०,७५१.५५ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो १०,८०३ अंकांवर पोहोचला होता. सोबतच बीएसई लिस्टेड कंपन्या एकाच दिवसात ९१,७३४ कोटींनी श्रीमंत झाल्या. बीएसईचे मार्केट कॅपिटल आता १५४.८८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे....
  January 18, 02:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात