Home >> Business >> Share Market

Share Market News

 • नवी दिल्ली -शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी मार्च महिन्यात पाच कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. ३,८०० कोटी रुपये जमवण्याचा कंपन्यांचा मुख्य उद्देश असणार आहे. डीमार्ट रिटेल चेन चालवणारी अॅव्हॅन्यू सुपरमार्टस कंपनीचा १,८७० कोटींचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पीएबी हाऊसिंग फायनान्सच्या ३,००० कोटींच्या आयपीओनंतर हा आयपीओ सर्वात मोठा असेल. यावर्षी आतापर्यंत सध्या बीएईचा एकच आयपीओ आला आहे. या आयपीओने बाजारातून जवळपास १,२५० कोटी रुपये जमवले. याची...
  February 28, 03:00 AM
 • नवी दिल्ली -बाजारमूल्याच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टीसीएसने सोमवारी शेअर बायबॅकच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनी २८५० रुपये प्रति शेअरच्या दराने १६ हजार कोटी शेअर बायबॅॅक करणार आहे. ही किमत कंपनीच्या सध्याच्या मूल्यापेक्षा सुमारे १२ टक्के जास्त आहे. कंपनीच्या वतीने या निर्णयाची घोषणा होताच कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे कंपनीचे बाजार मूल्य सुमारे १९ हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. कंपनीच्या संचालक...
  February 21, 07:03 AM
 • नवी दिल्ली-भारतीय सुवर्ण बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सोने भावात होत असलेल्या वाढीला सोमवारी ब्रेक लागला. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी झालेल्या व्यवहारात सोने १८० रुपयांच्या घसरणीसह २९७०० रुपये प्रतिदहा ग्रॅमच्या दराने विक्री झाले. जागतिक बाजारातून मिळालेले नकारात्मक संकेत अणि भारतीय बाजारात मागणी कमी झाल्यामुळे सोमवारी सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय बाजारात सोमवारी मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले...
  February 21, 03:11 AM
 • शहरी क्षेत्रासह ग्रामीण क्षेत्रांत स्मार्टफोन उपयोग करणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२० च्या अखेरपर्यंत भारत जगातील चौथा सर्वात मोठी स्मार्टफोन बाजार असणारा देश होईल. अशात या क्षेत्रात रोजगार वाढण्याची शक्यता अधिक आहेत. यासाठी मोबाइल उत्पादन क्षेत्र युवकांसाठी उत्तम पर्याय होऊ शकते. गेल्या महिन्यात सादर झालेल्या एका अहवालानुसार इंटरनेट डेटा असलेली वाढती मागणी आणि नवे सेवा पुरवठादारांची संख्या वाढल्याने देशाच्या टेलिकॉम उद्योगात रोजगाराच्या संधी वाढतील. २०१७ च्या...
  February 20, 03:17 AM
 • मुंबई -भारतीय शेअर बाजारात नफारूपी विक्रीचा मारा झाल्यामुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८४ अंकांच्या घसरणीसह २८१५५ या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला निफ्टी ६८ अंकाच्या घसरणीसह ८७२४ या पातळीवर बंद झाला. बुधवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे १.२४ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. निफ्टी-५० मध्ये समावेश असलेल्या ३८ समभागात घसरण नोंदवण्यात आली. तिसऱ्या तिमाहीत खराब...
  February 16, 03:00 AM
 • मुंबई- अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे खुश झालेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुरुवारीही जोरदार खरेदी केली. या खरेदीमुळे सेन्सेक्स ८४.९७ अंकांनी वाढून २८२६६.६१ या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १७.८५ अंकांनी वधारून ८७३४.२५ वर स्थिरावला. वाहन, भांडवली वस्तू आणि पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची भरभरून खरेदी झाली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर शेअर बाजारात जोरदार खरेदीला...
  February 3, 06:44 AM
 • मुंबई- जागतिक पातळीवरून मिळालेले संकेत आणि अमेरिकेच्या संसदेत एच-वन-बी बिल सादर झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील स्टॉक्समध्ये दबाव दिसून आला. त्यामुळे मंगळवारी झालेल्या व्यवहारात भारतीय बाजारात जोरदार घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १९४ अंकांच्या घसरणीसह २७,६५५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ७१ अंकांच्या घसरणीसह ८५६१ च्या पातळीवर बंद झाला. मंगळवारी झालेल्या व्यवहारादरम्यान निफ्टी ८५५२ अंकापर्यंत खाली गेला होता....
  February 1, 03:02 AM
 • मुंबई- आशियाई बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे झालेल्या नफारूपी व्यवहारामुळे आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३३ अंकांच्या घसरणीसह २७,८४९ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९ अंकांच्या घसरणीसह ८६३२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. सोमवारी झालेल्या व्यवहारात निफ्टीमध्ये समाविष्ट...
  January 31, 01:20 AM
 • मुंबई -आठवड्यातील व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स २५८ अंकांच्या तेजीसह २७,३७६ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ८४ अंकांच्या वाढीसह ८४७६ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान ऑटो आणि मेटल क्षेत्रात सर्वाधिक तेजी नोंदवण्यात आली. निफ्टी ५० मध्ये समावेश असलेल्या ५१ स्टॉक्सपैकी ४४ स्टॉक्समध्ये तेजी, तर सात स्टॉक्समध्ये घसरण नोंदवण्यात...
  January 25, 03:00 AM
 • मुंबई -आशियाई बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतानंतरही सोमवारी भारतीय बाजारात तेजी नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ८३ अंकांच्या वाढीसह २७११७ अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ४२ अंकांच्या तेजीसह ८३९१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉक्सपैकी ३४ स्टॉक्स वाढीसह तर १६ स्टॉक्स घसरणीसह बंद झाले. अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती...
  January 24, 03:00 AM
 • नवी दिल्ली -आशियातील सर्वात जुना शेअर बाजार असलेला बाॅम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईचा आयपीओ सोमवारी खुला होत आहे. ९ हजारांपेक्षा जास्त समभागधारकांच्या बीएसईने आयपीओच्या माध्यमातून १२४३ कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. इश्यूचा प्राइस बँड ८०५-८०६ रुपये निश्चित केला आहे. ऑफर तीन दिवस म्हणजे २३ ते २५ जानेवारीपर्यंत खुली असेल. कमीत कमी १८ शेअर्ससाठी अर्ज करता येईल. यानंतरही अर्ज १८ च्या प्रमाणात असेल. बीएसईने १.५४ कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले आहेत. २८.२६ % होल्डिंगची विक्री...
  January 23, 04:02 AM
 • बैरूत (लेबनाॅन) - लेबनाॅनची राजधानी बैरुत बॉम्बस्फोटांमुळे कायमच चर्चेत असते. मात्र, सध्या येथील तांत्रिक घडामोडींमध्ये होणाऱ्या बदलामुळे सध्या हे शहर चर्चेत आले आहे. येथील स्टार्टअप कंपन्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. या देशातील लाखो लोकांना हुक्का पिण्याची सवय आहे. येथील लोकांच्या धूम्रपानावर नियंत्रण मिळवण्यासाठी समेर अल गरीब यांची स्टाइटर नावाची स्टार्टअप कंपनी सध्या चांगले काम करत आहे. या कंपनीने एक स्मार्ट सिगारेट लायटर अॅप बनवले आहे. या माध्यमातून युजर किती...
  January 22, 03:06 AM
 • नवी दिल्ली :नोटाबंदीनंतर देशात आलेला चलन तुटवडा लवकरच सामान्य होणार असल्याचा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी केला आहे. शुक्रवारी पटेल यांनी लोकलेखा समितीसमोर (पीएसी) हा दावा केला आहे. स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष करून ग्रामीण क्षेत्रासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी समितीच्या सदस्यांना सांगितले. आर्थिक इंटेलिजन्स युनिट आणि प्राप्तिकर विभाग अनियमित पैसे जमा झालेल्या खात्यांचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदीनंतर बाजारातील...
  January 21, 03:05 AM
 • भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांत गेल्या आठवड्यात (बुधवार ते मंगळवार) वाढ नोंदवण्यात आली. तिमाही आकडेवारी जाहीर होण्याआधी नीचांकी पातळीवर खरेदी वाढल्यामुळे ही वाढ दिसून आली. नोटाबंदीमुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामाची घसरण आता पूर्ण झाली आहे. आता बाजाराचे सर्व लक्ष कंपन्यांच्या तिमाही आकडेवारीकडे लागले आहे. कंपन्यांचे उत्पन्न तसेच भविष्यात वाढीचा अंदाज सकारात्मक नोंदवण्यात आला तर बाजारात सकारात्मक उत्साह दिसून येईल. कंपन्यांची आकडेवारी तसेच त्यांचा महसूल यावर बारीक...
  January 12, 03:12 AM
 • मुंबई - आठवड्यातील व्यवहाराच्या तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २४१ अंकांच्या वाढीसह २७,१४० च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९२ अंकांच्या वाढीसह ८३८० अंकांच्या पातळीवर बंद झाला. बुधवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात मेटल तसेच बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये समावेश असलेले ४१ स्टाॅक्स वाढीसह बंद...
  January 12, 03:10 AM
 • अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. इंडिया इंटरनॅशनल एक्स्चेंज नावाने गांधीनगरमधील गिफ्ट सिटीमध्ये रिंगिंग बेलवाजवून मोदी यांनी या बाजाराचे उदघाटन केले. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होणार असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले. यामुळे जगभरातील मोठ्या कंपन्यांना गुंतवणुकीची संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय शेअर बाजार २१ व्या...
  January 10, 03:07 AM
 • नवी दिल्ली- वर्षातील दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाले. ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४८ अंकाच्या वाढीसह २६,६४३ अंकाच्या पातळीवर बंद झाला, तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १३ अंकाच्या वाढीसह ८१९२ अंकाच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमधील २८ स्टॉक्समध्ये तेजी तर २३ स्टॉक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारात सर्वाधिक वाढ...
  January 4, 04:58 AM
 • नवी दिल्ली -राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) आयपीओसंदर्भातली कागदपत्रे सोमवारी बाजार नियामक सेबीकडे दाखल केली आहेत. आयपीओच्या माध्यमातून १०,००० कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे. हा गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा आयपीओ आहे. याआधी २०१० मध्ये कोल इंडियाने १५,००० कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. आयपीओच्या माध्यमातून एनएसईमधील सध्याचे शेअरधारक २० ते २५ टक्के भागीदारी ओपन ऑफ सेलअंतर्गत विक्री करू शकतात. या विक्रीनंतर एक्स्चेंजचे मूल्यांकन ५०,००० ते ५५,००० कोटी रुपयांपर्यंत होण्याची...
  December 30, 03:39 AM
 • मुंबई -भारतीय शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या घसरणीला मंगळवारी जोरदार ब्रेक लागला. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४०६.३४ अंकांच्या वाढीसह २६,२१३.४४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १२४.६० अंकांच्या तेजीसह ८,०३२.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये एफएमसीजी निर्देशांक आणि मेटलमध्ये अनुक्रमे २.६८ आणि २.५७ टक्क्यांची...
  December 28, 03:55 AM
 • मुंबई - शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी वर्ष २०१६ देखील खराब ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. निफ्टी ७७.५० अंकाच्या घसरणीसह ७,९०८ च्या पातळीवर बंद झाला, जी २४ मे नंतरची नीचांकी पातळी आहे. त्या वेळी निफ्टी ७,७४८.८५ च्या पातळीवर होता. सेन्सेक्स ०.९ टक्के म्हणजेच २३३.६० अंक खाली २५,८०७.१० च्या पातळीवर बंद झाला. २१ नोव्हेंबर नंतरचा हा नीचांक आहे. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सदेखील २८७ अंकांच्या घसरणीसह २४ मे च्या २५३०५.४७...
  December 27, 03:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED