जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • मुंबई - आठवड्यातील व्यवहाराच्या तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २४१ अंकांच्या वाढीसह २७,१४० च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९२ अंकांच्या वाढीसह ८३८० अंकांच्या पातळीवर बंद झाला. बुधवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात मेटल तसेच बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये समावेश असलेले ४१ स्टाॅक्स वाढीसह बंद...
  January 12, 03:10 AM
 • अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. इंडिया इंटरनॅशनल एक्स्चेंज नावाने गांधीनगरमधील गिफ्ट सिटीमध्ये रिंगिंग बेलवाजवून मोदी यांनी या बाजाराचे उदघाटन केले. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होणार असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले. यामुळे जगभरातील मोठ्या कंपन्यांना गुंतवणुकीची संधी मिळणार असल्याचे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय शेअर बाजार २१ व्या...
  January 10, 03:07 AM
 • नवी दिल्ली- वर्षातील दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाले. ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४८ अंकाच्या वाढीसह २६,६४३ अंकाच्या पातळीवर बंद झाला, तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १३ अंकाच्या वाढीसह ८१९२ अंकाच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमधील २८ स्टॉक्समध्ये तेजी तर २३ स्टॉक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारात सर्वाधिक वाढ...
  January 4, 04:58 AM
 • नवी दिल्ली -राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) आयपीओसंदर्भातली कागदपत्रे सोमवारी बाजार नियामक सेबीकडे दाखल केली आहेत. आयपीओच्या माध्यमातून १०,००० कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे. हा गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा आयपीओ आहे. याआधी २०१० मध्ये कोल इंडियाने १५,००० कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. आयपीओच्या माध्यमातून एनएसईमधील सध्याचे शेअरधारक २० ते २५ टक्के भागीदारी ओपन ऑफ सेलअंतर्गत विक्री करू शकतात. या विक्रीनंतर एक्स्चेंजचे मूल्यांकन ५०,००० ते ५५,००० कोटी रुपयांपर्यंत होण्याची...
  December 30, 03:39 AM
 • मुंबई -भारतीय शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या घसरणीला मंगळवारी जोरदार ब्रेक लागला. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४०६.३४ अंकांच्या वाढीसह २६,२१३.४४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १२४.६० अंकांच्या तेजीसह ८,०३२.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये एफएमसीजी निर्देशांक आणि मेटलमध्ये अनुक्रमे २.६८ आणि २.५७ टक्क्यांची...
  December 28, 03:55 AM
 • मुंबई - शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी वर्ष २०१६ देखील खराब ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. निफ्टी ७७.५० अंकाच्या घसरणीसह ७,९०८ च्या पातळीवर बंद झाला, जी २४ मे नंतरची नीचांकी पातळी आहे. त्या वेळी निफ्टी ७,७४८.८५ च्या पातळीवर होता. सेन्सेक्स ०.९ टक्के म्हणजेच २३३.६० अंक खाली २५,८०७.१० च्या पातळीवर बंद झाला. २१ नोव्हेंबर नंतरचा हा नीचांक आहे. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सदेखील २८७ अंकांच्या घसरणीसह २४ मे च्या २५३०५.४७...
  December 27, 03:00 AM
 • लातूर : बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच गेल्या दहा-बारा दिवसांत दरात कमालीची घसरण होऊन सरकारने निश्चित केलेल्या हमी भावापेक्षा खाली तिचा दर आला आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने जिल्ह्यात पाच ठिकाणी आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात तुरीच्या राशीला काहीसा वेळ असला तरी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्नाटकातून नवीन तूर विक्रीला येत आहे. सोमवारी तीन हजार क्विंटल नव्या तुरीची आवक झाली होती. तिला कमाल ५२००, तर किमान ४७०० प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या...
  December 21, 04:22 AM
 • नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीमध्ये ग्राहकांनी सोन्याचा मोह टाळला असल्याचे दिसून आले. एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान आयातीची आकडेवारी पाहिल्यास ही बाब स्पष्ट होते. या दरम्यान सोन्याची आयात ३०.५ टक्क्यांनी कमी होऊन १५.७ अब्ज डॉलरवर आली आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ च्या पहिल्या सहामाहीमध्ये हाच आयातीचा आकडा २२.६४ अब्ज डॉलरवर होता. आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होत असून आयात कमी होण्यामागे हेच सर्वात मोठे कारण असल्याचे समोर आले अाहे. असे असले...
  December 21, 04:17 AM
 • मुंबई : यंदाच्या हंगामात देशात साखरेचे एकूण ५३.२९ लाख टन उत्पादन झाले अाहे. मागील वर्षातल्या साखर हंगामातील ४७.९३ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत त्यात ५.३६ लाख टन उत्पादन झाले अाहे. उत्पादनात चांगली वाढ झालेली असली तरी साखरेच्या विक्रीला मात्र नाेटाबंदीची झळ बसली अाहे. नाेटाबंदीनंतर निर्माण झालेल्या राेखीच्या चणचणीमुळे मिठाई बनवणाऱ्यांबराेबरच अन्य ग्राहकांकडून साखरेची मागणी माेठ्या प्रमाणावर घटली. परिणामी देशातील साखरेच्या किमतीत प्रति क्विंटल १५० ते २०० रुपयांनी घट झाली. साखर...
  December 18, 05:03 AM
 • मुंबई / पुणे: दाेन वर्षांपासून स्वाइप मशीन वापराविना पडून हाेते; पण नाेटाबंदीनंतर पुन्हा ते मशीन वापरण्यास सुरुवात केल्यानंतर विक्रीचे प्रमाण तर वाढलेच; पण ग्राहकांना ते साेयीचे ठरले. विक्रीवर दहा टक्के सवलत देत असल्यामुळे व्यवसाय वाढताेय... मैत्री किचन काॅर्नर पोळीभाजी केंद्राचा सागर बाेबडे सांगत हाेता. अनघा सारंग यांनी चार महिन्यांपूर्वी कुकी केक्स दुकान सुरू केले. पण नाेटबंदीनंतर राेखीचा ग्राहक अचानक राेडावला. अखेर त्यांनी स्वाइप मशीनचा पर्याय स्वीकारला. अाता त्यांच्या...
  December 16, 05:35 AM
 • लातूर : बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच दरात दोन हजारांची घसरण झाल्याने सरकारने आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले असून, ती लवकरच कार्यान्वित होणार आहेत. मागच्या काळात तूरडाळीचा भाव दोनशे रुपयांपर्यंत गेल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत हाहाकार उडाला होता. त्यामुळे सरकारने यंदा वेळीच पावले उचलली आहेत. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्नाटकातून नवीन तूर विक्रीला येत आहे. बुधवारी दोन हजार क्विंटल नव्या तुरीची आवक झाली होती. तिला कमाल ५५००, तर किमान ५२००...
  December 15, 04:04 AM
 • मुंबई - जागतिक पातळीवरून मिळालेल्या मजबूत संकेतामुळे भारतीय बाजारात मजबुती दिसून आली. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स ५३ अंकाच्या वाढीसह २६७४७ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १५ अंकाच्या वाढीसह ८२६१ अंकाच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये ०.२० टक्के तर निफ्टीमध्ये ०.१८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. बँकिंग आणि रिअल्टी क्षेत्रात सर्वाधिक तेजी दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजारातील ११ इंडेक्समधील ८ इंडेक्स...
  December 10, 03:20 AM
 • मुंबई - आशियाई आणि अमेरिकी बाजारातील घसरणीचा सरळ परिणाम शुक्रवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बाजार घसरणीसह उघडले आणि घसरणीतच बंदही झाले. बाजारात सकाळपासूनच मंदीचे सावट राहिले. व्यवहाराच्या शेवटी ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३२९ अंकांच्या घसरणीसह २६,२३० च्या पातळीवर बंद झाला. तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १०६ अंकांच्या घसरणीसह ८०८६ च्या पातळीवर...
  December 3, 03:00 AM
 • अर्थव्यवस्थेत असलेल्या नगदीच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीतही भारतीय शेअर बाजार आणि निर्देशांकात वाढ दिसून आली आहे. यामध्ये फंड आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या खरेदीचे प्रामुख्याने योगदान आहे. गेल्या वेळेच्या कॉलममध्ये मी निफ्टी ८०२२ अंकाच्या पातळीवर गेल्यास यामध्ये ७० ते १०० अंकाची वाढ दिसण्याची शक्यता वर्तवली होती. या अंदाजानुसारच निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. मंगळवारी झालेल्या व्यवहारादरम्यान निफ्टी ८,१९७.३५ च्या पातळीवर पोहोचल्यानंतर ८,१४२.१५ अंकावर बंद...
  December 1, 03:00 AM
 • नवी दिल्ली - जागतिक पातळीवर मिळालेल्या मजबूत संकेतांनंतर तसेच जीडीपी विकास दराचे आकडे जाहीर झाल्यानंतर बुधवारी शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली. शेअर बाजारातील सुरुवातीच्या व्यवहारात बाजार हिरव्या निशाणीवर राहिला. सकाळच्या सत्रात झालेल्या किरकोळ वाढीनंतर दुपारी मात्र तेजी नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स २५९ अंकांच्या वाढीसह २६,६५३ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ८२ अंकांच्या वाढीसह ८२२४ च्या पातळीवर बंद झाला. ११ नोव्हेंबरनंतर...
  November 30, 11:58 PM
 • नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गुणांकन संस्था फिचने भारताच्या जीडीपी विकास दराच्या अंदाजात घट केल्यामुळे भारतीय शेअर बाजारात त्याचा परिणाम दिसून आला. दिवसभराच्या व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स २०० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत हाेता. नंतर मात्र फिचने अंदाजात घट केल्याची बातमी येताच शेअर बाजारात जोरदार विक्रीचा मारा दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४४ अंकांच्या वाढीसह २६,३९४ अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर ५०...
  November 30, 03:25 AM
 • नवी दिल्ली - आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात बँकिंग स्टॉक्समध्ये सर्वाधिक विक्री नोंदवण्यात आली. त्यामुळे बाजारात किरकोळ वाढ दिसून आली. ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३३.८३ अंकांच्या वाढीसह २६,३५०.१७ अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १२.६० अंकांच्या वाढीसह ८१२६.९० अंकाच्या पातळीवर बंद झाला. सोमवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात चढ-उतार...
  November 29, 05:08 AM
 • नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या मोठ्या नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या वाढीमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स ४५६ अंकांच्या वाढीसह २६,३१६ च्या पातळीवर बंद झाला. या वाढीमुळे सेन्सेक्स पुन्हा एकदा १५ नोव्हेंबरच्या त्याच्या आधीच्या पातळीवर, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक निफ्टी १४९ अंकांच्या वाढीसह ८११४ च्या पातळीवर...
  November 26, 03:32 AM
 • नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. गुरुवारी झालेल्या इन्ट्राडे व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया ६८.८६ च्या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. व्यवहाराच्या सुरुवातीलाच रुपया १८ पैशाच्या कमजोरीसह ६८.३६ च्या पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर व्यवहारादरम्यान रुपयांमधील कमजोरी वाढत गेली. शेवटी रुपया डॉलरच्या तुलनेत ६८.७३ च्या पातळीवर बंद झाला. याआधी २८ ऑगस्ट २०१३ रोजी रुपया ६८.८५ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. जागतिक बाजारात डॉलर...
  November 25, 03:37 AM
 • मुंबई - नोटबंदीमुळे देशाचा जीडीपी विकास दर कमी होण्याची शक्यता असल्याने बाजार दबावात आहे. सेन्सेक्सने या वर्षी आठ नोव्हेंबरपर्यंत मिळवलेली वाढ फक्त आठ दिवसांच्या व्यवहारात पूर्ण वाढ सपाटीवर आली आहे. अर्थव्यवस्थेत नगदी पैशांची कमतरता, विदेशी गुंतवणूकदारांच्या वतीने सुरू असलेला विक्रीचा मारा सुरू राहण्याची शक्यता आणि याच दरम्यान ब्रोकरेज हाउसेजने बाजाराच्या आधीच्या अंदाजात केलेली कपात यामुळे ही परिस्थिती आली आहे. याचा परिणाम सोमवारी सलग सहाव्या दिवशीदेखील दिसून आला. सेन्सेक्स...
  November 22, 03:12 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात