जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • सोन्याच्या किमती रोज नवे टप्पे गाठत आहेत. तरीही भारतीयांची सोनेखरेदीची हौस विशेषत महिलांची काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मंदीचे वारे वाहू लागल्यामुळे जगभरातील शेअर बाजार धडाधड कोसळू लागले आहेत. त्यामुळे योग्य परताव्यासाठी जगभरातील छोट्या गुंतवणूकदारांसह बडे गुंतवणुकदारही सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून महत्त्व देऊ लागले आहेत. भारताबाबतच बोलयचे झाल्यास भारत यंदा १ हजार टनांच्या आसपास सोने खरेदी करेल, असे व्यावसायिक व तज्ञ सांगत आहेत. गेल्या वर्षी भारताने साडेनऊशे...
  August 22, 05:55 PM
 • नवी दिल्ली । सोन्या-चांदीतील तेजी शनिवारी कायम राहिली. दोन्ही मौल्यवान धातूंची घौडदोड कायम असली तरी चांदीने एका दिवसातील तेजीचा नवा विक्रम केला आहे. चांदीच्या भावात शनिवारी ३५०० रुपयांची वाढ होऊन भाव ६६,३०० रुपये प्रतिकिलो झाले, तर सोन्यात तोळ्यामागे ८० रुपयांची वाढ होऊन भाव २८,२३० रुपयांवर पोहोचला आहे. औरंगाबादेत सोने २८,६००, तर चांदीचा भाव ६७,००० वर पोहोचला. औद्योगिक क्षेत्रातून आलेल्या जोरदार मागणीमुळे चांदीत जबरदस्त तेजी दिसून आल्याचे मानण्यात येत आहे. न्यूयॉर्कमध्ये...
  August 21, 02:02 AM
 • मुंबई. बाजारात मंदी येण्याच्या भीतीने शुक्रवारी झालेल्या तुफान विक्रीच्या मा-यात सेन्सेक्सने १५ महिन्यांचा नीचांक गाठत ३२८ अंकांची डुबकी मारली. या सततच्या घसरगुंडीमुळे गेल्या चार आठवड्यांमध्ये थोडेथोडके नाही, तर तब्बल ९ लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याने गुंतवणूकदार पार हवालदिल झाले आहेत. अमेरिका आणि युरोपातील आर्थिक वातावरणाच्या चिंतेचे झटके अलीकडच्या काही महिन्यांत बाजाराला जास्त बसले आहेत. याचा परिणाम मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत...
  August 21, 01:30 AM
 • मुंबई. जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा मंदीच्या गर्तेत जाण्याची सातत्याने जाणवत असलेली भीती आणि त्यातच अतिचलनवाढीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणा-या संभाव्य परिणामांची चिंता या गोष्टींमुळे संपूर्ण आठवडा बाजार घसरत राहिला. त्यातून मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात जागतिक पातळीवर मंदीची लाट येण्याची शक्यता वर्तवल्यापासून तर जगभरातील शेअर बाजारात खळबळ माजून शुक्रवारी सेन्सेक्स दाणकन ६९८ अंकांनी गडगडून १६,१४१.६७ अंकांच्या गेल्या १५ महिन्यांच्या...
  August 21, 01:27 AM
 • मुंबई. राज्य सरकारने १० वर्षे मुदतीचे १५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीला आणले आहेत. या रोख्यांची विक्री मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात या रोख्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. या रोखे विक्रीतून मिळणा-या निधीचा विनियोग राज्य सरकारच्या विकास कार्यक्रमांशी निगडित भांडवल खर्चाच्या अर्थपुरवठ्यासाठी करण्यात येणार आहे. या कर्जरोख्यांतील १० टक्के रक्कम पात्र, वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वितरित करण्यात येईल. मात्र...
  August 20, 03:29 AM
 • नवी दिल्ली । स्टॉक बाजार गंटागळ्या खात असल्याने सार्वजनिक उद्योगांतील वाटा विकण्यासाठी ही अनुकूल वेळ नसल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. बाजारातील तरलतेबद्दल मला पूर्ण कल्पना आहे आणि अशा वेळी कुठलाही शहाणा अर्थमंत्री मौल्यवान संपत्ती विकायला काढणार नाही असे मुखर्जी यांनी लोकसभेला सांगितले. ते निर्गंुतवणूक धोरणावरील प्रश्नाला उत्तर देत होते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांतील वाटा विकून ४०००० कोटी रुपये कमावण्याचे सरकारचे नियोजन आहे.युरोपातील कर्जसंकट व त्यामुळे...
  August 20, 03:20 AM
 • मुंबई. जागतिक शेअरबाजारातील अशांत वातावरण, मंदीचे मळभ गडद होण्याची भीती तसेच विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी निधी काढून घेण्याचा लावलेला सपाटा यामुळे दलाल स्ट्रीटवरील मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी विक्रीचा बार धडाडधूम करीत उडाला आणि सेन्सेक्समध्ये ३२८ अंकांची घसरण होऊन तो १६,१४२.६७ या पातळीवर बंद झाला. व्यापक आधार असणा-या निफ्टीतही ९८.५० अंकांची घट होऊन तो ४८४५.६५ वर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात दिवसभराच्या सत्रात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. गेल्या दोन दिवसांतील घसरणीमुळे...
  August 20, 03:11 AM
 • नवी दिल्ली. कडधान्यांच्या किमती उतरल्याने ६ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात अन्नधान्य महागाई निर्देशांक कमी होऊन ९.०३ टक्के झाला आहे. घाऊक किंमत निर्देशांक म्हणून मोजण्यात येणारा हा निर्देशांक त्याआधीच्या आठवड्यात ९.९० टक्के होता, तर ऑगस्ट २०१० च्या पहिल्या आठवड्यात तो १४.५१ टक्के होता. सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ६ आॅगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत कडधान्याच्या किमती ५.६३ टक्क्यांनी उतरल्या आहेत. मात्र, इतर सर्व वस्तूंच्या...
  August 19, 07:16 AM
 • मुंबई. महागाईच्या उच्चांकामुळे व्याजदरात वाढ होण्याची भीती कायम असतानाच जागतिक आर्थिक विकासाचा वेग मंदावल्याचा धसका घेऊन जागतिक शेअर बाजारात झालेली घसरण या दोन महत्त्वाच्या नकारात्मक घटनांमुळे सेन्सेक्स ३७१ अंकांनी गडगडला. बाजारात झालेल्या चौफेर विक्रीच्या मा-यामध्ये सेन्सेक्सने गेल्या १५ महिन्यांची १६,५०० अंकांची नीचांकी पातळी गाठली.बुधवारी आलेल्या तेजीत झालेला लाभ त्यामुळे गुंतवणूकदाराना गमवावा लागला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स चांगल्या पातळीवर उघडला होता; परंतु...
  August 19, 07:15 AM
 • नवी दिल्ली. संशोधन कंपनी डन अँड ब्रॅडशीटनुसार, सन २०२० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५.६ हजार अब्ज डॉलर्सची होणार असून कंपनीने वाढती गुंतवणूक आणि ग्राहक खर्च लक्षात घेता भारतीय अर्थव्यवस्था १.७ हजार अब्जांवरून तिप्पट उसळी घेईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्याचा बाजारभाव लक्षात घेता २०२० या वित्तीय वर्षात भारतीय अर्र्थव्यवस्था ५.६ हजार अब्ज डॉलर्सची झालेली असेल, असे डन अँड ब्रॅडशीट इंडियाचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ अरुण सिंग यांनी म्हटले आहे. पुढील दहा वर्षांत...
  August 18, 03:34 AM
 • मुंबई . देशभरात पाऊस चांगला पडलेला असल्यामुळे महागाई आणखी कमी होण्याचे संकेत केंद्र सरकारकडून मिळाल्यामुळे जागतिक बाजारातील मंदीकडे कानाडोळा करीत बाजारात काही निवडक बड्या समभागांची चांगली खरेदी झाली. परिणामी, गेल्या तीन सत्रांतील घसरणीला ब्रेक लागून सेन्सेक्समध्ये ११० अंकांची वाढ झाली. गेल्या तीन सत्रांमध्ये ४०० अंकांची घसरण सोसल्यानंतर बुधवारी बाजारात मिळालेल्या खरेदीच्या पाठिंब्यामुळे सेन्सेक्सने दिवसभरात १७,०००.३८ अंकांची उच्चांकी पातळीही...
  August 18, 03:29 AM
 • मुंबई. सर्वाधिक चलनवाढ आणि व्याज दरवाढीची भितीने बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 109 अंकांनी गडगडला. त्यामुळे सकाळच्या सत्रातील तेजीच्या वातावरणात केलेली कमाई धुवून निघाली आणि मुख्य महागाई निर्देशांकात घट होऊनही त्याचा अपेक्षित परिणाम बाजारावर होऊ शकला नाही. मोटोरोला मोबिलिटी होल्डिंग्ज ही कंपनी गुगल रोख 12.5 अब्ज डॉलरला खरेदी करणार असल्याच्या वृत्तामुळे अमेरिकन शेअर बाजारात तेजी आली. त्याचा परिणाम आशियाई शेअर बाजाराही वधारून निक्की,...
  August 17, 01:48 AM
 • नवी दिल्ली. जागतिक परिस्थिती अनिश्चित असतानाही भारतातील थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) या कॅलेंडर वर्षाच्या सहा महिन्यांत ५३.८ टक्क्यांपर्यंत जाऊन ७५,०५०६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जानेवारी-जून २०१० दरम्यान थेट विदेशी गुंतवणूक ४९,०९९ कोटी होती, अशी माहिती अर्थराज्यमंत्री नमो नारायण मीणा यांनी राज्यसभेत सादर केली.
  August 17, 01:38 AM
 • सोन्याचे भाव ज्या वेगाने कडाडत आहेत तेवढीच त्याची शक्तीही वाढत आहे. चाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा जगात गोल्ड स्टँडर्ड व्यवस्था सुरू होण्याची शक्यता बळावत आहे. म्हणजेच ज्या देशाकडे जेवढे सोने असेल त्याला तेवढ्याच नोटा छापता येतील. १५ ऑगस्ट 1971 पूर्वी हीच यंत्रणा राबवली जात असे. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी अमेरिकेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी गोर्ल्ड स्टँडर्ड मोडीत काढले होते. त्यामुळे त्यांना जास्त डॉलर्स छापण्याचे स्वातंत्र्य मिळाले. अमेरिका आता पुन्हा...
  August 15, 05:56 AM
 • २008 नंतरच्या काळात मॉनेटरी/फिस्कल धोरणांचे क्वांटिटेटिव्ह ईजिंग अपुरे होते. या आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी आणखी क्वांटिटेटिव्ह ईजिंग हाती घ्यावे लागणार आहे. कमी वा स्थिर वाढीच्या दरातून बाहेर येण्यासाठी नोटा छापणे हा उपाय पुरा पडणार असेल तर विकसनशील देशांवर तडजोडीचा कठीण मार्ग का थोपवला गेला. जागतिक आर्थिक बाजारात प्रचंड रक्तपात झाला असून उदयोन्मुख मार्केट इकॉनॉमीवर (बाजार अर्थव्यवस्थांवर) त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. रशियाचे अध्यक्ष...
  August 15, 02:34 AM
 • ज्यावेळी अस्थिरता निर्माण होते त्यावेळी गुंतवणूकदार आपल्या आयुष्यात स्थिरता यावी यासाठी निश्चित लाभ देणारे गुंतवणुकीचे मार्ग शोधत असतो. कमी लाभ मिळाले तरी चालतील परंतु आपली गुंतवणूक शाबूत राहिली पाहिजे, अशी त्याची मन:स्थिती असते. अशा स्थितीत सोन्यातील गुंतवणूक स्वाभाविकरीत्या वाढते. कारण सोने हे निश्चित लाभ देणारे तसेच त्याचे कधीही पैशात रूपांतर करता येईल असे एक साधन आहे. आपल्याकडे पूर्वापार सोन्यातल्या गुंतवणुकीकडे अशाच नजरेतून पाहिले जाते. त्यात तथ्यही...
  August 15, 02:29 AM
 • मुंबई - अमेरिका आणि युरोपमध्ये मंदी येण्याची भीती, अन्नधान्याच्या चलनवाढीने गाठलेला उच्चांक आणि रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची दाट शक्यता या सर्व चित्रविचित्र वातावरणात संपूर्ण आठवडा भांडवल बाजारासाठी सी-सॉ ठरला. सातत्याने झालेल्या विक्रीच्या मायात सेन्सेक्समध्ये साप्ताहिक ४६६.२४ अंकांची घसरण होऊन तो १६,८३९.६३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. येणाया आठवड्यामध्ये जागतिक घडामोडींबरोबरच परकीय चलन गंगाजळीची जाहीर होणारी आकडेवारी, दुसया तिमाहीतील जीडीपीचा अहवाल आणि फ्युचर...
  August 14, 12:36 AM
 • मुंबई - भांडवल बाजारातील गुंतवणूकदारांना आता अन्नधान्याच्या चलनवाढीची चिंता चांगलीच सतावू लागली आहे. अन्नधान्याच्या महागाईचा कहर झाल्यामुळे रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करण्याची जबरदस्त भीती बाजाराला वाटत आहे. त्यातून व्याजदर संवेदनशील समभागांची जोरदार विक्री होऊन सेन्सेक्स २२० अंकांनी गडगडून पुन्हा १७ हजार अंकांच्या खाली गेला. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात झालेली चांगली वाढ, औद्योगिक उत्पादनाने अपेक्षेपेक्षा केलेली चांगली कामगिरी होऊनही त्याचा कोणताही फायदा बाजाराला होऊ शकला...
  August 13, 12:14 AM
 • नवी दिल्ली - अमेरिकेतील श्रेणीकरणाच्या मुद्द्यावरून जगभरातील बाजारात हाहाकार माजल्यानंतर सेबीनेही रेटिंग एजन्सीज च्या भूमिकेबद्दल सावध पवित्रा घेतला आहे. या एजन्सीजसाठी असणा-या नियमांमध्ये सेबी आवश्यक ते बदल करणार आहे. याबाबतीतील घरगुती आणि जागतिक घडामोडींवर नजर ठेवल्यानंतर क्रेडिट रेटिंग एजन्सीज (सीआरए)साठी असणा-या अधिनियमांचे पुनरीक्षण केले जाणार आहे, असे सेबीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. सेबीच्या मागील बैठकीत या विषयावर चर्चा झाली असून सेबी आवश्यक त्या बदलांचा प्रस्ताव...
  August 12, 02:26 AM
 • मुंबई - बँकिंग क्षेत्रातील अग्रणी सिटीग्रुपने सेन्सेक्सच्या यादीतील कंपन्यांचे उत्पन्न घसरण्याबाबत केलेले भाकीत आणि दुस-या बाजूला अन्नधान्याच्या महागाई दराने गाठलेला चार महिन्यांचा उच्चांक यामुळे पुन्हा एकदा बाजार थंड पडला. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याच्या भीतीने वाहन, रिअल्टी कंपन्यांच्या समभागांची तुफान विक्री होऊन सेन्सेक्स ७१ अंकांनी घसरला.चढ-उताराच्या वातावरणात सेन्सेक्सने दिवसभरात १७,२०७.८२ अंकांची कमाल पातळी गाठली होती; परंतु दिवसअखेर सपाटून झालेल्या...
  August 12, 02:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात