जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • मुंबई- अमेरिकेमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे जगभरातील शेअर बाजारात चढ-उताराचा खेळ सुरुच असून भारतीय बाजारपेठेतही त्याचा परिणाम दिसून येत आहे. सोमवार व मंगळवारी सेन्सेक्समध्ये मोठी घट झाल्यानंतर बुधवारी बाजाराने उसळी घेतली होती. मात्र गुरुवारी सकाळी बाजार खुला होताच पुन्हा तो ९० अंकानी ढासळला. छोट्या गुंतवणूकदारांनी नफा कमविण्यासाठी शेअर विक्रीला सुरवात केल्याने बाजार खाली गेला असल्याचे तज्ञ सांगतात. मात्र त्यावर युरोपीयन पंचप्रसंगाचा प्रभाव असल्याचे जाणकार सांगत...
  August 11, 10:12 AM
 • मुंबई - पत घसरल्यानंतर आता अमेरिकेने व्याजदर शून्याच्या आसपास ठेवून अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर जगभरातील शेअर बाजारांना मोठा दिलासा मिळाला. मुंबई शेअर बाजारावरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊन आयटी, बॅँका, रिअल्टी आणि वाहन कंपन्यांच्या समभागांना मागणी आली. खरेदीच्या पाठिंब्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागून सेन्सेक्सने २७३ अंकांची उसळी घेत पुन्हा १७,००० अंकांची पातळी गाठली. गेल्या पाच सत्रांमध्ये तब्बल १४५५अंकांनी घसरत...
  August 10, 11:11 PM
 • मुंबई- भारतीय शेअर बाजाराने सुरूवातच तेजीने केली आहे. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हींमध्ये जबरदस्त तेजी आली. आज सकाळी बीएसई सेन्सेक्स सुरू होताच ३८० अंकांनी वाढला तर निफ्टीमध्ये १०० अंकाची वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये चांगलीच तेजी दिसून आली. महिंद्रा, सत्यम आणि पटनी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी होती.निफ्टी बाजार सुरू होताच ५.१७८ ने सुरू झाला तर सेन्सेक्स ३१४ अंकानी म्हणजेच १७.१९३ अंकावर उघडला. त्यामुळे सेन्सेक्स पुन्हा सतरा हजारी पोहचला. तर निप्टीही पाच हजाराच्या वर आहे....
  August 10, 09:49 AM
 • मुंबई - भारतीय अर्थव्यवस्थेत जास्तीत जास्त भांडवली निधीचा ओघ यावा या उद्देशाने विदेशी गुंतवणूकदारांना देशातील इक्विटी फंडांमध्ये सुमारे १० अब्ज रुपयांची खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पात्र विदेशी गुंतवणूकदारांना किमान पाच वर्षे मुदतीच्या पायाभूत क्षेत्राशी निगडित रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आलेल्या ३ अब्ज डॉलरच्या कर्ज निधीची खरेदी करण्याची मुभाही देण्यात आली असल्याचे सेबीने म्हटले आहे. आतापर्यंत केवळ विदेशी गुंतवणूकदार संस्था आणि विदेशस्थित...
  August 9, 11:39 PM
 • नवी दिल्ली - अमेरिकेची पत घसरल्याने जगभरात उडालेल्या घाबरगुंडीचे पडसाद जगभरातील सर्वच शेअर बाजारांत उमटले. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या घसरगुंडीने जगभरात अनेक ठिकाणी काळा सोमवार नोंदवला, तर कालचा मंगळवारही भयानक ठरला. या काळ्या दिवसांत भारतात आतापर्यंत १ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जगाचा विचार केल्यास हाच आकडा १ ट्रिलियन डॉलर इतका आहे. २००८ पासून बिकट आर्थिक परिस्थितीशी झुंजणा-या अमेरिकेची पत घसरल्याच्या बातमीने जगभरातील सर्व शेअर बाजारांत भूकंप झाला आणि सर्वांनाच...
  August 9, 11:04 PM
 • मुंबई - अमेरिकेचा पतदर्जा घसरल्यापासून मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या कपाळावर पडलेल्या आठ्या दूर होण्याची कोणतीही आशा नाही. त्यामुळे दुपारच्या सत्रातील खरेदीचे वातावरण फार काळ टिकू शकले नाही. जागतिक शेअर बाजारातील घसरण आणि चीनच्या महागाईदरात गेल्या तीन वर्षात झालेली सर्वात मोठी वाढ, याचा परिणाम बाजारावर झाला. त्यामुळे बड्या समभागांची विशेष करून माहिती तंत्रज्ञान समभागांवर विक्रीचा जबरदस्त ताण येऊन सेन्सेक्स १३२.२७ अंकांनी गडगडून १७ हजार अंकांच्या खाली गेला. सेन्सेक्स...
  August 9, 11:00 PM
 • नवी दिल्ली. जगभरात आर्थिक उलथापालथ होत असताना गुंतवणूकदार सोन्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. मंगळवारी सोन्याच्या भावात जबरदस्त वाढ झाली. राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 610 रुपयांनी वाढ झाली आणि सोने 25 हजार 840 रुपयांवर पोहोचले.जागतिक स्तरावर मंदीचे सावट पसरलेले असताना सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. स्टॉकिस्ट आणि गुंतवणूकदारांमुळे एक तोळा सोन्याचा भाव 26 हजाराच्या जवळ पोहोचला आहे. परंतु चांदीचे दर मात्र घसरले आहेत. मागणी अभावी चांदीच्या भावात घसरण पहायला मिळाली....
  August 9, 06:02 PM
 • मुंबई/नवी दिल्ली - अमेरिकेतील आर्थिक संकटाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर झाला आहे. भारतीय बाजारही यातून सुटू शकलेला नाही. सेंसेक्स सोमवारी 315.69 अंकांनी घसरून 16990.18 अंकांवर बंद झाला.गेल्या 14 महिन्यांतील हा नीचांक आहे. यापूर्वी 10 जून 2010 रोजी सेंसेक्स या पातळीवर आला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (निफ्टी) 92.75 अंकांनी घसरून 5,118.50 अंकांवर बंद झाला. या घडामोडीत सोन्याला मात्र चांगली झळाळी येत चालली आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी भारतीय गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. या स्थितीत...
  August 9, 04:25 AM
 • नवी दिल्ली- एस अॅण्ड पीच्या क्रेडिट रेटिंगमध्ये अमेरिकेचे मानांकन घटल्यामुळे जागतिक परिस्थिती बिघडली असली तरी लगेच त्याचा भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांवर दुष्परिणाम होणार नाही, असे मत आयटी इंडस्ट्री मंडळ नॅसकॉमने व्यक्त केले आहे. तथापि, या बाबतीत सावधगिरीचा दृष्टिकोन बाळगणे आवश्यक असल्याचे नॅसकॉमने म्हटले आहे.गेल्या शुक्रवारी अचानक अमेरिकेचे मानांकन घटविण्यात आल्याने ६० अब्ज डॉलर्सच्या भारतीय आयटी उद्योगावर त्याचा दुष्परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. उत्तर...
  August 9, 01:03 AM
 • नवी दिल्ली- जून महिन्यात भारतात झालेल्या थेट विदेशी गुंतवणुकीत ३१० टक्क्यांची प्रचंड वाढ होऊन ती ५.६५ अब्ज डॉलर्सवर गेली असून ही गेल्या ११ वर्षांतील सर्वात जास्त मासिक गुंतवणूक आहे, ज्यातून भारतीय अर्थव्यवस्थेवर असणारा विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास प्रतिबिंबित होतो. जून २०१० मध्ये देशात १.३८ अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली. मे २०११ मध्येही भारतात थेट विदेशी गुंतवणूक उत्तम राहून देशाला ४.६६ कोटी डॉलर्स मिळून मागील वर्षाच्या तुलनेत १११ टक्क्यांची वाढ झाली. मागील वर्षातील ५.७७...
  August 9, 12:56 AM
 • मुंबई/नवी दिल्ली- अमेरिकेवरील मंदीचा भारतीय शेअर बाजारावर फारसा परिणाम होणार नाही, हे मंगळवारच्या भारतीय शेअरबाजारामुळे स्पष्ट झाले आहे. शेअर बाजार मंगळवारी सावरताना दिसला. भारत असे धक्के सहन करण्यास सक्षम आहे कारण येथील अर्थव्यवस्था भक्कम आहे, असे उद्गार अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काढले आहेत.मंगळवारी दुपारी 12.30 वाजता निफ्टी पुन्हा एकदा 5100 अंकांच्या वर गेला आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 61.93 अंकांनी वाढ होऊन 17 हजार 52 वर पोहोचला. सर्वाधिक फायदा मारिको लिमिटेड या कंपनीस झाला....
  August 9, 12:36 AM
 • मुंबई- अमेरिकेतील अर्थिक फटक्याचा परिणाम आता आशियाई बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारामध्येही सोमवारी दिसून आला. मुंबई शेअर बाजार सकाळी खुला झाल्या-झाल्या ४५० अंकानी पडला होता. नंतर तो ५५० अंकापर्यंत खाली घसरला. त्यानंतर आरबीआय व अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून अमेरिकेमुळे फारसा फरक पडणार नसल्याचा खुलासा केला. त्यानंतर बाजार सावरला. अखेर तो १६९९० अंकावर थांबला. त्यामुळे दिवसभरात तो ३१५ अंकानी खाली राहिला. तर, निप्टी ५११८ वर थांबला. त्यामुळे ९२ अंकानी पडला....
  August 8, 07:39 PM
 • अमेरिकेवरील आर्थिक संकटाचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर मोठया प्रमाणात झाला. भारतीय शेअर बाजार तर सकाळी उघडताच ४५० अंकानी घसरला. इकडे शेअर बाजार कोसळत असताना सोन्याचे भाव मात्र गगनाला भिडताना दिसत आहेत. आज सोन्याने प्रति दहा ग्रॅम २५ हजार रूपयाचा आकडा पार केला. अमेरिकेच्या आर्थिक संकटाने हवालदिल झालेला गुंतवणूकदार आता सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत.एमसीएक्स वायदे बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ४४६ रूपयांनी वाढून २५०९७ रूपये इतका झाला...
  August 8, 02:31 PM
 • मुंबई- अमेरिकन क्रेडिट रेटिंग घसल्यानंतर तसेच युरोपीय आर्थिक संकटावर कोणताही तोडगा दिसत नसल्याने आशियाई बाजाराबरोबर जगभरातील शेअर बाजार घसरले असून त्याचा वित्तीय संस्था व कंपन्याच्या व्यवहारावर मोठा परिणाम दिसून येत आहे.सोमवारी सकाळी भारतीय बाजारपेठेत मोठी तूट दिसून आली.सोमवारी बाजार खुला होताच तो ४५० अंकानी गडगडला. जगातील इतर शेअर बाजारतही प्रचंड मंदी दिसून येत आहे.या सर्वाचा एकूण परिणाम म्हणून भारतातील टॉपच्या ३० कंपन्यांचे भागभांडवल कमाल १० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. याचा...
  August 8, 01:53 PM
 • मुंबई- अनिल धीरूभाई समूह(एडीजी) च्या कंपन्याना आज मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या दोन कंपन्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्स मधून बाहेर काढण्यात आले आहे.रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स इन्फ्रा या दोन कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांचे बाजार मूल्य कोसळल्यामुळे त्यांना ३० शेअर कंपनीच्या सूचीमधून बाहेर काढले आहे. त्यांच्याजागेवर कोल इंडिया आणि सन फार्मा या औषधी कंपनीला घेण्यात आले आहे.गेल्या पाच वर्षांपासून या दोन कंपन्या सेन्सेक्समध्ये स्थान टिकवून होत्या. पण सध्या परिस्थिती...
  August 8, 01:45 PM
 • अमेरिकेच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरात २००८प्रमाणे पुन्हा मंदीचे सावट येण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. ही मंदीची लाट किती तीव्र असेल त्याचा अंदाज लावणे कठीण आहे; परंतु शुक्रवारी सेन्सेक्सने दिलेले हेलकावे लक्षात घेता बाजारावर पुन्हा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. त्यात अमेरिकेतील अव्वल क्रमांकाची रेटिंग एजन्सी स्टँडर्ड अँड पुअरने (एस अँड पी) आर्थिक क्षेत्रातील अमेरिकेची पत घसरल्याचे जाहीर केले. अमेरिकेचे आर्थिक क्षेत्रातील सर्वाेच्च मानांकन ट्रिपल ए (एएए)...
  August 8, 07:57 AM
 • मुंबई - बाजार उघडायचा अवकाश की डोळ्याची पापणीही न लवता समोरच्या मॉनिटरवरील सेन्सेक्स, निफ्टीच्या हालचालींचा वेध घेणारे ब्रोकर्स मंडळींचे डोळे ब्लॅक फ्रायडेने पार पांढरे झाले. बाजारातील उलाढालच आटल्याने कमिशनविना ब्रोकर्सचे खिसे फाटले असून आता छोट्या ब्रोकिंग कंपन्या, फ्रँचायजी बंद कराव्या लागणार की याची चिंता आता त्यांना सतावू लागली आहे. इंडिया इन्फोेलाइन, इंडियाबुल्स, आयएल अँड एफएस, एंजल ब्रोकिंग, मोतीलाल ओस्वाल, शेरखान, कोटक सिक्युरिटीज, आनंद राठी यांसारख्या मातब्बर कंपन्यांसह...
  August 7, 03:35 AM
 • मुंबई - युरोपमधील आर्थिक पेचप्रसंगाचा ताण कायम असतानाच अमेरिकेची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू झाल्याच्या भीतीने हुडहुडी भरून जगभरातील शेअर बाजार धडाधड आपटले. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकही सुरुवातीला ७०० अंकांनी घसरल्यानंतर दिवसअखेर ३८४ अंकांनी गडगडला. त्यातच स्टॅँडर्ड अॅँड पुअर या पतमानांकन संस्थेने अमेरिकेच्या सार्वभौम कर्जाचा पतदर्जा घटवला आहे. त्यामुळे या नवीन घडामोडींचा बाजारावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन सप्ताहात बाजाराला दिलासा...
  August 7, 03:32 AM
 • आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीत सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा जबरदस्त उसळी घेतली आहे. प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 24 हजार 770 रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे सोन्याच्या भावाने रेकॉर्ड केले आहे. जगभरात सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शनिवारी दुपारपर्र्यत सोन्याच्या भावात 420 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ झाली. तसेच शनिवारी चांदीचा भाव 58600 रुपये प्रति किलो राहिला. जाणकारांचे म्हणणे आहे की जागतिक बाजारातील उलथापालथी आणि आर्थिक मंदीच्या भीतीने गुंतवणूकदार सोन्यावर जास्त भर...
  August 6, 06:57 PM
 • मुंबई - अमरिकेतील वित्तीय संकट तसेच युरोपातील बिघडलेले आर्थिक गणित यामुळे घाबरलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या तुफान विक्रीमुळे मुंबई शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील सूचकांक सेन्सेक्समध्ये दिवसभरातील सत्रात ३८७.३१ अंकांची घट येऊन निर्देशांक १७३०५.८७ या १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकातही १२० अंकांची घट येऊन तो ५२११.२५ या पातळीवर आला. शुक्रवारी दिवसभरातील सत्रात सेन्सेक्समध्ये एकवेळ ७०२ अंकांची...
  August 6, 03:31 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात