Home >> Business >> Share Market

Share Market News

 • नवी दिल्ली -अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात वाढ करण्याच्या वृत्तामुळे सोने तसेच चांदीच्या किमतीत जोरदार घसरण नोंदवण्यात आली. भारतीय सराफा बाजारात सोने ७३० रुपयांच्या घसरणीसह ३०५२० रुपये प्रती दहा ग्रॅमच्या दरावर आले. एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत झालेली ही या वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. चांदीचे दरदेखील १७५० रुपयांच्या घसरणीसह ४३,२५० रुपये प्रतिकिलोवर आले. भारतीय सराफा बाजाराचा विचार केल्यास गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वात नीचांकी पातळी आहे....
  October 6, 03:00 AM
 • नव्याने तयार करण्यात आलेल्या रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने (एमपीसी) रेपो दरात ०.२५ टक्के कपात करून सर्वांना आश्चर्यचकित केले. यंदाच्या मान्सूनमध्ये चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशात खाण्या-पिण्याच्या वस्तूंची महागाई नियंत्रणात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमपीसीने रेपो दरात ०.२५ टक्के घट करून ६.२५ टक्के दर निश्चित केला. २०१० नंतर हा दर सर्वात कमी स्तरावर आहे. जानेवारी २०१५ पासून आजपर्यंत यात १.७५ टक्के कपात करण्यात...
  October 6, 03:00 AM
 • भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांवर २९ सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राइक केल्याची बातमी येताच मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स अचानक ४६५ अंकांनी घसरला. रुपयादेखील एक डॉलरच्या तुलनेत ३९ पैशाच्या घसरणीसह ६६.८६ वर आला होता. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झाले तर त्याचा गुंतवणुकीवर काय परिणाम होईल, असा प्रश्न उपस्थित करणे स्वाभाविकच आहे. शेअरमधील ही घसरण पुढील काळातही सुरूच राहील का? शक्यतो नाही. जोपर्यंत पाकसोबतचा तणाव एखाद्या युद्धात परावर्तित होत...
  October 4, 04:10 AM
 • नवी दिल्ली -उद्योगजगताने भारतीय सैनिकांच्या वतीने करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे समर्थन केले आहे. ही वेळ कडक कारवाई करण्याची आहे, असे मत उद्योग जगताने व्यक्त केले आहे. या घटनेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर तसेच व्यापारावर कोणताच परिणाम होणार नसल्याचे मतही उद्योग संघटनांनी व्यक्त केले आहे. भारताच्या एकूण निर्यातीत पाकिस्तानची भागीदारी केवळ ०.८३ टक्के, तर अायातीत ०.१३ टक्के आहे. सैनिकांवर मला पूर्ण विश्वास असून बदला घेताना कशी कारवाई करायची हे त्यांना माहिती आहे, असे मत प्रसिद्ध...
  September 30, 07:48 AM
 • बीजिंग - चीनच्या अर्थव्यवस्थेत मंदी वाढत असून त्यामुळे जागतिक पातळीवरील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेसमाेर मोठे संकट उभे आहे. चीनच्या वतीने अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात येत असली तरी मंदी त्यापेक्षा मोठी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय मुद्रा कोश म्हणजेच आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ केन रोगोफ यांनी व्यक्त केले आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला हा देश खराब परिस्थितीत असून यामुळे जागतिक आर्थिक वाढीवर त्याचा परिणाम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चिनी अर्थव्यवस्थेत सलग...
  September 28, 08:07 AM
 • मुंबई -नकारात्मक धारणेमुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारादरम्यान घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १११.३ अंकांच्या घसरणीसह २८५२३ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये ०.३९ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ३२.५० अंकांच्या घसरणीसह ८,७७५ च्या पातळीवर बंद झाला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक ०.१ टक्क्याच्या किरकोळ घसरणीसह बंद झाला, तर...
  September 21, 01:50 AM
 • मुंबई- देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी मानल्या जाणाऱ्या टीसीएसच्या इशाऱ्याचा परिणाम गुरुवारी आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळाला. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. टीसीएसचे शेअर्स टक्क्यांनी, तर अन्य कंपन्यांचे शेअर्सही चांगलेच घसरले. या क्षेत्रातील अव्वल कंपन्यांच्या बाजार भांडवलात ३३, ८०० कोटींची घसरण झाली. अमेरिकेतील वित्तीय क्षेत्रातील ग्राहक आयटीवर खर्च वाढवत नसून त्यामुळे कंपनीच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा टीसीएसने दिला...
  September 9, 06:29 AM
 • नवी दिल्ली- विदेशी बाजारातून तसेच देशांतर्गत अर्थव्यवस्थेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीवर बंद झाले. मंगळवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४४६ अंकांनी वाढून २८९७८ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १३३ अंकांनी वाढून ८९४३ च्या पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे भांडवली मूल्य...
  September 7, 02:48 AM
 • मुंबई- चालू वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठ्या प्रमाणात नफा देणारे ठरले आहे. चालू वर्षाचा विचार करता आतार्यंत म्हणजेच पहिल्या आठ महिन्यांत गुंतवणूकदारांनी १०.७० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा नफा मिळवला आहे. म्हणजे दरमहा सरासरी १.३४ लाख कोटी रुपये आणि दररोज सरासरी ४,४६० कोटी रुपये. इतकेच नाही, तर आठ महिन्यांत बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅपदेखील सुमारे ११ टक्के वाढला आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी झालेल्या...
  September 7, 02:36 AM
 • नवी दिल्ली-जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार वर्षभरातील विक्रमी पातळीवर बंद झाले. दुपारनंतर झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारातील प्रमुख निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारातील ३० अंकांचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १०९ अंकांच्या वाढीसह २८,५३२ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ३५ अंकांच्या वाढीसह ८८०९ च्या पातळीवर बंद झाला....
  September 3, 06:11 AM
 • नवी दिल्ली - भारतीय बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १०९ अंकाच्या वाढीसह २८,४५२ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ४२ अंकाच्या तेजीसह ८७८६ च्या पातळीवर बंद झाला. मंगळवारप्रमाणे बुधवारी झालेल्या व्यवहारात देखील अनेक शेअरने नवा विक्रम प्रस्थापित केला. यामध्ये वोल्ट्स, बजाज ऑटो,...
  September 1, 08:23 AM
 • नवी दिल्ली-मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची गुंतवणूक एकाच दिवसात सुमारे लाख ४० हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. गुंतवणुकीची किंमत सध्याच्या शेअर बाजारातील किमतीच्या आधारावर निश्चित केली जाते. तांत्रिक भाषेत यालाच मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतात. भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात प्रमुख निर्देशांकात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४४० अंकांनी वाढून २८,३४३ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय...
  August 31, 07:49 AM
 • मुंबई - जागतिक अर्थव्यवस्थेत सातत्याने संकट येत असून जगात सोन्या-चांदीची मागणी वाढता राहण्याची आशा व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे भारतात सणांचा हंगाम सुरू झाला आहे व सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याने या वर्षी दुसऱ्या सहामाहीदरम्यान सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. दागिने निर्मिती उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, २०१६च्या पहिल्या सहामाहीत मागणी कमी राहिली असली तरी दुसऱ्या सहामाहीत चांगली मागणी असेल. पहिल्या सहामाहीत सोन्याची तस्करीद्वारे आवक झाली तसेच किमतीही...
  August 20, 05:58 AM
 • भारतीय शेअर बाजार गेल्या आठवड्यातील अंदाजानुसार मर्यादेत कन्सॉलिडेट झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेल्या कमजोर संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाला. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीमुळे जागतिक बाजारात मजबुती दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजी मंगळवारीदेखील कायम दिसली. ब्रेंट क्रूड वाढून ४९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. उत्पादक देशांमध्ये झालेल्या चर्चेमुळे दरात जास्त वाढ नोंदवण्यात आली. अमेरिकेमध्ये आठवड्याच्या शेवटी महत्त्वाची आर्थिक...
  August 18, 03:00 AM
 • नवी दिल्ली - पावसाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मंजुरीची अपेक्षा वाढल्यामुळे भारतीय शेअर बाजारात आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी तेजी नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २९२ अंकांनी वाढून २८०९५ च्या वरती बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला निफ्टी ८७ अंकांनी वाढून ८६२८ च्या पातळीवर बंद झाला. सोमवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ५२ आठवड्यांतील...
  July 26, 07:10 AM
 • मुंबई - क्रेस्टर या औषधाचे जेनरिक रूप अमेरिकेच्या बाजारात विक्रीस हिरवा कंदील मिळाल्याने शेअर बाजारात बुधवारी तेजी आली. औषध निर्माण कंपन्यांच्या समभागावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक १२८.२७ अंकांनी उसळून २७,९१५.८९ वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. निफ्टी ३७.३० अंकांनी वधारून ८५६५.८५ वर स्थिरावला. देशभरातील मान्सूनची चांगली प्रगती, खरिपात चांगले कृषी उत्पादन होण्याची उंचावलेली अपेक्षा आणि वस्तू...
  July 21, 02:39 AM
 • गेल्या आठवड्यात (बुधवार ते मंगळवार) भारतीय शेअर बाजारात मर्यादेत व्यवहार झाले. वरच्या पातळीवर कन्सॉलिडेशन तसेच नफारूपी विक्रीचा मारा सुरूच होता. असे असले तरी, जास्त घसरण नोंदवण्यात आली नसल्याने दिलासा मिळाला. पुढील काळात मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींचा विचार करता संमिश्र स्थिती राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यात औद्योगिक उत्पादनात काही प्रमाणात सुधारणा दिसून आली मात्र, महागाई वाढल्याने चिंता देखील वाढली आहे. यामुळे जवळच्या काळात भारतीय...
  July 21, 02:08 AM
 • मुंबई-सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. मंगळवारीही बाजारात तेजी कायम होती. बीएसईच्या लार्जकॅपमध्ये ०.६ टक्के वाढ तर मिडकॅप शेअर्समध्ये ०.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्स १८१.४५ अंकांनी वाढून २७, ८०८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ५३.१५ अंकांची वाढ झाली. निफ्टी ८, ५२१ अंकांवर बंद झाला. फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) आणि फार्मा कंपनीच्या शेअर्समधील घसरण वगळता इतर क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाल्याचे चित्र होते. जागतिक संकेत आणि आशियाई बाजारात तेजी...
  July 13, 03:20 AM
 • नवी दिल्ली -जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ७५ अंकाच्या घसरणीसह २७१२६ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १५ अंकाच्या घसरणीसह ८३२३ च्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी झालेल्या व्यवहारात सर्वात जास्त घसरण इन्फ्रा क्षेत्रात नोंदवण्यात आली आहे....
  July 8, 11:52 PM
 • नवी दिल्ली-जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १४५ अंकांच्या वाढीसह २७,१४४ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ४१ अंकांच्या वाढीसह ८,३२८ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने गेल्या अाठ महिन्यांतील उच्चांकी पातळी गाढली आहे. एफएमसीजी, इन्फ्रा आणि ऑटो...
  July 2, 09:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED