जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • मुंबई - अमेरिका नुसती शिंकली तरी सा-या जगाला दुस-याच क्षणी पडसे होते, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले. जगातील सर्वात प्रगत देशच जर मंदीच्या वाटेने जाऊ लागला तर अन्य देशांचे काय होणार, या भीतीने झालेल्या जगभरात आलेल्या तुफान विक्रीच्या झंझावातात सारेच शेअर बाजार कोलमडून पडले. अमेरिकेतील रोजगार आणि औद्योगिक उत्पादनाबाबत जाहीर झालेली आकडेवारीमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये अचानक मरगळ आली. अमेरिकन अर्थव्यवस्थेला मंदीच्या लाटेचा तडाखा बसण्याच्या भीतीने गुरुवारी पहिल्यांदा वॉल स्ट्रीट...
  August 6, 12:44 AM
 • मुंबई - अमेरिकेतील शेअर बाजारातील मंदीचा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसला आहे. यामुळे निर्माण झालेल्या दबावाचा परिणाम सर्वच सेक्टर्समध्ये पहायला मिळाला.शुक्रवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराची सुरुवातच निराशाजनक झाली आणि नंतरही सेन्सेक्स गडगडतच राहिला. दुपारी पाऊण वाजेपर्यंत सेन्सक्स जवळपास 600 अंकांनी घसरला. यामुळे शेअर्स विक्रीचा दबाव वाढला आणि त्यावेळी सेन्सेक्स 591 अंकांनी घसरून 17 हजार 101 अंकांवर पोहोचला. त्यामुळे तीन तासात भारतीयांनी अडीच लाख कोटी रुपये गमावले. निफ्टीतही 180 अंकांची...
  August 5, 12:58 PM
 • मुंबई - जागतिक आर्थिक विकास मंदावण्याची आणि चलनवाढ कमी होत नसल्याने मध्यवर्ती बँकेकडून पुन्हा व्याजदरात वाढ होण्याची चांगलीच भीती बाजाराला बसली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याचे परिणाम जाणवत असताना गुरुवारी त्याच चिंतेने बाजारात पुन्हा तुफान विक्री होऊन सेन्सेक्स २४७ अंकांनी घसरला. बुधवारी १८ हजार अंकांच्या खाली घसरलेला सेन्सेक्स सकाळच्या सत्रातील थोड्याफार खरेदीमुळे सावरून पुन्हा १८ हजार अंकांच्या पातळीवर गेला; परंतु दुपारच्या सत्रात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ...
  August 5, 07:12 AM
 • नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या व्यापारात आज संमिश्र वारे दिसून आले. विक्रमी किमतीवरून आज सोने घसरले असतानाच चांदी मात्र तेजीत आली. दिल्लीमध्ये सोन्याचे भाव ५० रुपयांनी घसरून २४,२८० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले. चांदीने १६०० रुपयांची मोठी उसळी घेऊन ती ६१,७०० रुपयांवर गेली. साठेबाजांनी पाठ फिरवल्याने सोने घसरल्याचे सांगण्यात येत आहे.
  August 5, 06:56 AM
 • मुंबई - जागतिक शेअर बाजारांतील नरमाईचे वातावरण आणि आर्थिक विकासदर मंदावण्याची चिंतेने ग्रासलेल्या मुंबई शेअर बाजारात सलग दुस-या दिवशी झालेल्या सपाटून विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 169 अंकांनी गडगडला. केवळ इतकेच नाही, तर सेन्सेक्सने 18 हजार अंकांच्या खाली गटांगळी खात गेल्या सहा आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली.अगोदरच्या सत्रात 204 अंकांची घसरगुंडी झाल्यानंतर सेन्सेक्सने मधल्या सत्रात 17,859.50 अंकांची नीचांकी पातळी गाठली होती. दिवस अखेर सेन्सेक्स 169.34 अंकांनी घसरून 17,940.55 अंकांच्या पातळीवर...
  August 3, 11:14 PM
 • नवी दिल्ली - अमेरिकेतील कर्जसंकटाचा पेच, युरोपातील वित्तीय संकटाचे मळभ आणि देशातील सण-उत्सवांची नांदी या पार्श्वभूमीवर खरेदीदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे सोन्याने आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळवत विक्रम केला आहे. बुधवारी आलेल्या जोरदार मागणीमुळे सोन्याच्या भावात ६४० रुपयांची वाढ होऊन १० ग्रॅमचा भाव २४,६४८ रुपयांवर पोहोचला. सोन्यातील तेजीचा प्रभाव चांदीतही दिसून आला. औद्योगिक क्षेत्रातून आलेल्या मोठ्या मागणीमुळे चांदीत किलोमागे १५०० रुपयांची तेजी येऊन, भाव ६०,१०० वर पोहोचले....
  August 3, 11:11 PM
 • आशियायी आणि युरापीय बाजारांतून मिळालेल्या नकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजारात मेटल आणि एमएमसीजी सेक्टर वगळता सर्वच सेक्टरमध्ये घसरण सुरू होती. सर्वाधिक घसरण कंझ्युमर गुडस आणि ऑटो सेक्टरमध्ये पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारात सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये एल अँड टी, टाटा मोटर्स, डीएलएफ, बजाज ऑटो, जिंदल स्टील, आयसीआयसीआयसीआय बँक, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, भारतीय एअरटेल आणि आरआयएल या कंपन्यांचा समावेश आहे.मुंबई शेअर बाजारात...
  August 3, 06:51 PM
 • मुंबई - अमेरिका दिवाळखोरीतून बाहेर पडत असल्याचा आनंद भांडवल बाजारासाठी क्षणभंगूर ठरला. अमेरिकेच्या आर्थिक सुधारणांबाबत वाटत असलेली चिंता, त्यातच आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याबाबत अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलेला अंदाज या दोन गोष्टींमुळे पार हिरमूड झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या तुफान विक्रीच्या मायात सेन्सेक्स २०४ अंकांनी गडगडला. रिअल इस्टेट, बँका आणि आयटी समभागांवर आलेल्या विक्रीच्या ताणामुळे सेन्सेक्सने १८,१०९.८९ अंकांची गेल्या पाच आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली....
  August 3, 12:52 AM
 • नवी दिल्ली - सुरक्षित पर्याय म्हणून जागतिक बाजारात मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सराफा बाजारात झालेल्या जोरदार खरेदीमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव २३ हजार ६९० रुपयांवर गेला. सोन्याबरोबरच चांदीचीही चकाकी वाढली. एक किलो चांदीच्या भावात ६०० रुपयांनी वाढ होऊन ती ५८ हजार ६०० रुपयांवर गेली.
  August 3, 12:46 AM
 • मुंबई - अमेरिकेला आर्थिक दिवाळखोरीत जाण्यापासून वाचवण्यात अखेर अमेरिकन सरकारला आलेल्या यशामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या चांगल्या बातमीने जगभरातील शेअर बाजारात आलेल्या तेजीचा परिणाम मुंबई शेअर बाजारावरही झाला. बाजारात झालेल्या तुफान खरेदीमुळे गेल्या चार सत्रांपासून बाजारात आलेल्या घसरणीला चाप बसून सेन्सेक्सने ११७ अंकांची उसळी घेतली. बाजारातील एकूण वातावरण तसे नकारात्मक असले तरी अमेरिकेच्या बातमीमुळे बाजारात रिलायन्स, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया,...
  August 2, 01:30 AM
 • नवी दिल्ली - अमेरिका आणि युरोपातील बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असतानाही भारतीय निर्यातीने २९.२१ अब्ज डॉलर्सची निर्यात गाठून ४६.४५ टक्क्यांची उसळी घेतली आहे. वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या माहितीनुसार जून २०१० मध्ये १९.९४ अब्जांची व्यापारी निर्यात झाली. एप्रिल-जून तिमाहीत विदेशी पाठवलेल्या मालात ४५.७ टक्क्यांची वाढ होऊन निर्यातीने ७९ अब्जांचा पल्ला गाठला. पेट्रोलियम उत्पादने, तयार कपडे, अभियांत्रिकी व फार्मास्युटिकल्स या क्षेत्रात समाधानकारक वाढ झालेली असली तरी...
  August 2, 01:17 AM
 • मुंबई- रिझर्व्ह बँकेचा व्याज दरवाढीचा पचनी न पडलेला कडू डोस, अमेरिकेतला आर्थिक पेचप्रसंग या घडामोडींमुळे संपूर्ण सप्ताहामध्ये बाजारात नकारात्मक वातावरण होते. कंपन्यांच्या वृद्धीवर व्याज दरवाढीचा परिणाम होण्याची भीती बाजाराला आता वाटत असून त्यामुळे सातत्याने व्याजदर संवेदनशील समभागांवर विक्रीचा ताण होता. अमेरिकेतील कर्ज समस्येवर अजूनही कोणताच तोडगा निघालेला नसल्याने गुंतवणूकदारही मोठी खरेदी करण्याची जोखीम घेत नाहीयेत. त्यामुळे स्थानिक तसेच जागतिक पातळीवरील घडामोडी लक्षात...
  July 31, 03:44 AM
 • मुंबई- आयपीओ वाटप आणि शेअर विभौतिकीकरणातील अनियमिततांसंदर्भात अडीच वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांवर सेबी अंमलबजावणी करणार आहे. दोन वेगळ्या प्रकरणांत सेबी समितीकडून डिसेंबर २००८ मध्ये आदेश जारी करण्यात आले होते, पण सेबीच्याच मंडळाने या प्रकरणात तथ्य नसल्याचे सांगत ते रद्द केले होते. तथापि, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून सेबीला हे प्रकरण नव्याने उघडण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी झालेल्या सेबी मंडळाच्या बैठकीत आयपीओ वाटप व शेअर विभौतिकीकरणाच्या आरोपावर नव्याने...
  July 30, 04:51 AM
 • मुंबई- जागतिक शेअर बाजारातील नरमाई आणि महागाईला लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बँक आणखी एकदा व्याज दरवाढीचा कडू डोस देण्याची वाटत असलेली भीती यातून सलग चौथ्या दिवशी झालेल्या विक्रीच्या मायात सेन्सेक्स १२ अंकांनी घसरला. व्याजाचे दर वाढण्याच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी रिअॅल्टी, धातू, तेल आणि वायू तसेच ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची विक्री करण्यावर भर दिला आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक १८,१९४.१५ अंकांच्या नीचांकी पातळीवरच उघडला. दुपारच्या सत्रात मात्र तो १८,२२०.११ अंकांच्या...
  July 30, 04:42 AM
 • मुंबई-जागतिक बाजारापेठेतील नरमाई, विदेशी गुंतवणुकदारांनी बाजाराकडे फिरवलेली पाठ आणि त्यातच डेरिव्हेटिव्हज व्यवहारांचा शेवटचा दिवस या चक्रव्यूहात सापडलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या तुफान विक्रीच्या मायात सेन्सेक्स २२३ अंकांनी गडगडला. गेल्या सलग तीन सत्रांत सेन्सेक्सने एकूण ६६१.७१ अंकांची गटांगळी खाल्ली आहे.बाजार उघडतानाच नरमाईचे वातावरण होते. त्यामुळे सेन्सेक्स सकाळी नीचांकी पातळीवर उघडला आणि संपूर्ण दिवसभर याच नीचांकी पातळीवर राहत अखेर १८,२०९.५२ अंकांच्या पातळीवर बंद...
  July 29, 04:09 AM
 • मुंबई- महागाईला लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरांत केलेल्या अर्धा टक्का वाढीचा बाजाराला बसलेला झटका सलग दुसर्या दिवशीही कायम राहिला. या महिन्यातील डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची संपत असलेली मुदत आणि समभागांच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता लक्षात घेऊन बाजारात झालेल्या विक्रीमध्ये सेन्सेक्स 86 अंकांनी घसरला.सोमवारच्या 353 अंकांच्या घसरणीनंतर वास्तविक पाहता सकाळी सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडला; परंतु पातळी फार काळ तग धरू शकली नाही आणि सेन्सेक्स लगेचच 160 अंकांनी...
  July 28, 03:45 AM
 • मुंबई- व्याजदरात पाव टक्का वाढ होण्याचे सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत रेपो दरात अर्धा टक्का वाढ करून रिझर्व्ह बँकेने दिलेला धक्का बाजार पचवू शकला नाही. परिणामी, सकाळच्या सत्रात झालेली थोडीफार कमाई साफ धुऊन निघाली. बँका, वाहन आणि स्थावर मालमत्ता यांसारख्या व्याजदर संवेदनशील समभागांच्या तुफान विक्रीमध्ये सेन्सेक्स ३५० अंकांनी आपटला. रिझर्व्ह बॅँक पहिल्या तिमाही पतधोरण आढाव्यामध्ये पाव टक्क्यांनी वाढ करणार अशीच सर्वांची अटकळ होती. त्यामुळे पतधोरण जाहीर होण्याअगोदरही बाजारात चांगली...
  July 27, 03:49 AM
 • नवी दिल्ली - खासगी भांडवलाचे पाठबळ असलेल्या कंपन्यांनी एप्रिल-जून २०११ मध्ये जागतिक स्तरावर १७.२ अब्ज डॉलर्स उभारले असून त्यात भारतीय व चिनी कंपन्यांच्या २.७ अब्ज डॉलर्स एकूण भांडवलाचा वाटा आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. अर्न्स्ट अँड यंगच्या अहवालानुसार खासगी इक्विटीचे पाठबळ असणाया ४५ कंपन्यांनी १७.२ अब्जांचे भांडवल उभे केले असून ते २००७ च्या दुसया तिमाहीनंतरचे हे सर्वात मोठे भांडवल आहे. या तिमाहीतील आकडेवारी २०११ मधील भांडवलाच्या आकडेवारीपेक्षा दुप्पट तर मूल्याच्या दृष्टीने २४...
  July 27, 03:21 AM
 • मुंबई- रिलायन्स - बीपी यांच्या व्यवहाराला सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर बाजारात निर्माण झालेल्या उत्साहामध्ये रिलायन्स, भारती टेलिकॉम, रिलायन्स कम्युनिकेशन यांच्यासह अन्य बड्या समभागांची खरेदी होऊन सेन्सेक्समध्ये 149 अंकांची वाढ झाली; परंतु मंगळवारी जाहीर होणार्या पतधोरणात चलनवाढीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक काय भूमिका घेते, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.महागाईला लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदरात पाव टक्क्याने वाढ करण्याची शक्यता आहे. व्याजाचे दर वाढण्याची...
  July 26, 04:59 AM
 • कोणत्याही गुंतवणुकीच्या साधनाची निवड करण्यासाठी पुस्तकी किंवा सैद्धांतिकदृष्ट्या नेहमी चार निकष सांगितले जातात. मूळ मुद्दलाची सुरक्षितता, खरेदी - विक्रीची सुलभता, उत्पन्नाची हमी किंवा सातत्य आणि कर आकारणीचे दर असे ते चार निकष आहेत. यापैकी पहिल्या तीन निकषांच्या बाबतीत कोणताच वाद असण्याचे कारण नाही. मात्र बदलत्या अर्थकारणात चौथ्या निकषाचा मूळापासून विचार करण्याची गरज आहे. सध्याच्या प्राप्तिकराच्या तरतुदींनुसार गुंतवणुकीच्या काही साधनांतील दरवर्षी केलेली एक लाख रुपयांपर्यंतची...
  July 25, 02:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात