जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • मुंबई. समाधानकारक पडणारा पाऊस, अन्नधान्याची कमी झालेली महागाई आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे युरोपला मिळालेले भक्कम आर्थिक साहाय्य या तीन प्रमुख गोष्टींमुळे बाजारातील मरगळ झटकली गेली. सप्ताहाच्या अखेरच्या सत्रात झालेल्या तुफान खरेदीमुळे १६० अंकांची उसळी घेत सेन्सेक्स १८,७२२ अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला; परंतु आता पुढील आठवड्यात असलेले रिझर्व्ह बँकेचे पतधोरण, गुरुवारी असलेला वायदे व्यवहारांचा अखेरचा दिवस यावर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असल्याचे मत...
  July 24, 04:48 AM
 • मुंबई - कर्जाच्या खाईत बुडालेल्या ग्रीसला अखेर युरोप राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेल्या भक्कम आर्थिक पाठबळामुळे जगभरातील शेअर बाजारांची चिंता दूर झाली. ग्रीस आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर पडण्याच्या आनंदात जगभरातील शेअर बाजारांत आलेल्या तेजीच्या लाटेत मुंबई शेअर बाजारात बड्या समभागांची तुफान खरेदी होऊन सेन्सेक्सने २८६ अंकांची गरुडभरारी घेतली. गेल्या काही दिवसांपासून १८ हजार अंकांच्या पुढे-मागे झुलत असलेल्या सेन्सेक्सने १८,७२२ अंकांची गेल्या दोन...
  July 23, 02:32 AM
 • मुंबई. अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रणी लार्सन अँड टुब्रो समूहातील एल. अँड टी. फायनान्शियल होल्डिंग्ज लिमिटेड ही कंपनी २७ जुलै रोजी भांडवल बाजारात प्रवेश करीत आहे. कंपनी १७ टक्के भागभांडवलाची विक्री करून प्राथमिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून १ हजार २४५ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. १९५० मध्ये पालक कंपनीची नोंदणी झाल्यापासून एल. अँड टी.कडून बाजारात होत असलेली पहिलीच भागविक्री आहे. प्रति समभाग ५१ रुपये ते ५९ रुपये दरपट्टा निश्चित करण्यात आला असून ही समभाग विक्री २९ जुलै...
  July 22, 01:01 AM
 • मुंबई. जागतिक शेअर बाजारातील नरमाई, बहुतांश कंपन्यांकडून आर्थिक कामगिरीत झालेला अपेक्षाभंग आणि व्याजदर वाढण्याची भीती या नकारात्मक गोष्टींमुळे गेल्या सत्रात १५२ अंकांनी घसरलेला शेअर बाजार आणखी ६६.१९ अंकांनी घसरला. रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या तिमाहीतील पतधोरण आढाव्याची तारीख जशी जवळ येत आहे तशी बाजारातील गुंतवणूकदारांची धडधड वाढत आहे. येत्या मंगळवारी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार असून चलनवाढीला आळा घालण्यासाठी व्याज दरवाढ अटळ असल्याची खात्री बाजाराला झाली. बुधवारी याच...
  July 22, 01:00 AM
 • मुंबई. जे. के. पेपर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान भागधारकांसाठी हक्कभाग आणण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. जे. के. पेपर्स लि. प्रति समभाग ४२ रुपये याप्रमाणे (प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य) हक्कभाग विक्रीला आणणार असून त्याची सरासरी रक्कम २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त नसेल, असे कंपनीने शेअर बाजाराला कळविले आहे. भागधारकांकडे असलेल्या प्रत्येक ४ समभागांसाठी ३ समभाग अशा प्रमाणात हे हक्कभाग आणण्यात येणार आहेत. हक्कभाग विक्रीसाठी २७ जुलै ही नोंदणी...
  July 21, 01:08 AM
 • मुंबई. रिझर्व्ह बँकेकडून करण्यात येणारी संभाव्य व्याज दरवाढ तसेच आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोच्या निकालाने केलेला अपेक्षाभंग यामुळे बाजारात ब्ल्यू चीप कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाली. त्यामुळे जागतिक बाजारात अनुकूल वातावरण असतानाही मुंबई शेअर बाजार गडगडला. मंगळवारी १४७ अंक कमावून तेजीची झुळूक दाखविणा-या मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्समध्ये बुधवारी १५२.४९ अंकांची घसरण होऊन तो १८५०२.३८ या पातळीवर बंद झाला. व्यापक असलेल्या...
  July 21, 01:05 AM
 • मुंबई: जागतिक शेअर बाजारांतील स्थिर वातावरण, युरोप शेअर बाजारात आलेली तेजी आणि त्याच्याच जोडीला एचडीएफसी बँकेने तिमाहीत केलेली अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी या सकारात्मक घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारात आलेली मरगळ झटकली गेली. दुपारच्या सत्रात रिअल्टी, आयटी आणि बँकेच्या समभागांच्या झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्सने १४६ अंकांची उसळी घेत १८६५३.८७ अंकांच्या उच्चांकी पातळीची नोंद केली. गेल्या दोन सत्रांत १११ अंकांच्या घसरणीनंतर मंगळवारीही बाजारात नरमाईचे वातावरण होते....
  July 20, 04:06 AM
 • नवी दिल्ली. सार्वजनिक मालकीची विमा कंपनी एलआयसी व खासगी निधी संस्था फ्रँकलिन टेम्पल्टनने मुकेश अंबानींच्या रिलायन्समधील वाटा संयुक्तपणे सुमारे २०० कोटींचे २३ लाख शेअर्स विकत घेऊन वाढविला आहे. रिलायन्सने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या अद्ययावत शेअर धारणा माहितीनुसार, चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एलआयसीचा रिलायन्स इंडस्ट्रीतील वाटा वाढून ७.१६ टक्के झाला आहे. याच कालावधीत फ्रँकलिन टेम्पल्टननेही स्वत:च्या वाट्यात १.०५ टक्क्यांची वाढ केली. तिमाहीत शेअर धारणा...
  July 19, 01:33 AM
 • मुंबई. इन्व्हेंचर समूहातील इन्व्हेंचर ग्रोथ अॅण्ड सिक्युरिटीज लिमिटेड ही कंपनी प्रत्येकी १० रुपये मूल्याचे ७० लाख समभाग २० जुलैला भांडवल बाजारात विक्रीला आणत आहे. ही समभाग विक्री शंभर टक्के बुक बिल्डिंग पद्धतीने करण्यात येणार आहे. या समभाग विक्रीसाठी कंपनीने प्रति समभाग १० रुपये याप्रमाणे १०० रु. ते ११७ रु. दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या समभागांची नोंदणी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात करण्यात येणार आहे. या समभाग विक्रीतून मिळालेल्या निधीचा उपयोग इन्व्हेंचर...
  July 19, 01:30 AM
 • मुंबई. युरोपबरोबरच आता अमेरिकेतील आर्थिक पेचप्रसंगामुळे जागतिक शेअर बाजारात आलेली नरमाई, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची चिंता या सगळ्या नकारात्मक वातावरणामुळे सौदापूर्ती सप्ताहाचा प्रारंभ सेन्सेक्सच्या ५५ अंकांच्या घसरणीने झाली. व्याज दरवाढीच्या धसक्याने गुंतवणूकदारांनी आयटी, फार्मा आणि रिफायनरी समभागांची जोरदार विक्री केली. त्यामुळे सकाळच्या सत्रात स्थावर मालमत्ता, धातू आणि ऊर्जा समभागांनी केलेली कमाई वाहन, तंत्रज्ञान आणि हेल्थकेअर समभागांच्या...
  July 19, 01:22 AM
 • मुंबई- गेल्या सप्ताहाचा प्रारंभच घसरणीने होऊनही बुधवारी बाजारात मोठी तेजी बघायला मिळाली; परंतु ती कायम न राहता शेवटच्या दोन दिवसांत तुटली. औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी, इन्फोसिसकडून झालेली चिंता आणि महागाईने पुन्हा वर काढलेले डोके या सगळ्या गोष्टी संपूर्ण आठवडा बाजारासाठी तापदायक ठरल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलाचाही बाजारावर कोणताही विशेष परिणाम झाला नाही; परंतु टीसीएसच्या आर्थिक निकालामुळे बाजाराचा उत्साह वाढवला. रिझर्व्ह बँक पतधोरण आढाव्यात व्याजदरात वाढ...
  July 17, 06:50 AM
 • मुंबई : जागतिक शेअर बाजारातील नरमाई आणि त्याच्याच जोडीला महागाईला आवर घालण्यासाठी पुन्हा एकदा व्याज दरवाढीचा डोस मिळण्याची भीती यातून झालेल्या विक्रीच्या मा-यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५६ अंकांनी घसरला. विशेष म्हणजे रिलायन्स, टीसीएसच्या समभागांना चांगली मागणी येऊन या घसरणीला काहीसा लगाम बसला. गेल्या दोन सत्रांमध्ये सेन्सेक्समध्ये २०६ अंकांची वाढ झाली होती; परंतु जूनअखेर महागाईच्या दरात झालेली वाढ लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅँक आपल्या येत्या पतधोरण आढाव्यामध्ये पुन्हा एकदा...
  July 16, 03:15 AM
 • मुंबई: मुंबई शेअर बाजाराच्या कामकाजाला सकाळी नेहमीप्रमाणे सुरुवात झाली. परंतु काही वेळात अचानक काही बड्या समभागांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे सेन्सेक्सनेही जवळपास १००० अंकांची उसळी घेतली. या प्रकारामुळे गुंतवणूकदारही गोंधळात पडले. परंतु हा तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानंतर सकाळच्या सत्रातील सर्व व्यवहार रद्द करण्यात आले. मग मुंबई शेअर बाजाराचे कामकाज पुन्हा सुरळीतपणे पार पडले. वास्तविक पाहता चालू बाजारात नवीन समभागांची नोंदणी करता येत नाही. परंतु बाजारात बाहेरून आलेल्या...
  July 16, 03:03 AM
 • मुंबई- मुंबईत झालेल्या तीन बॉम्ब धमाक्यांना न घाबरता तुफान खरेदी करणा-या गुंतवणूकदारांना हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाने मात्र घाबरवल्याने अखेरच्या सत्रात बाजाराचे गणित चुकले. महागाईत झालेली वाढ आणि पर्यायाने पुन्हा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि सर्वसाधारणपेक्षा कमी झालेला पाऊस या सगळ्या नकारात्मक गोष्टींमुळे दिवसभरात ३५० अंकांची उसळी घेणा-या सेन्सेक्सला दिवसअखेर केवळ २२ अंकांच्या वाढीवर समाधान मानावे लागले. जागतिक शेअर बाजारातील नरमाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर...
  July 15, 05:36 AM
 • मुंबई - जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात दोन दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गुंतवणूकदारांनी किंमत घसरलेल्या बड्या समभागांची चांगली खरेदी केल्यामुळे सेन्सेक्समध्ये १८४ अंकांची वाढ झाली. तेल आणि वायू, रिफायनरी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, रिअॅल्टी आणि आटो या सर्वच क्षेत्रांतील समभागांना चांगली मागणी आल्यामुळे सेन्सेक्सने अगोदरच्या तीन सत्रांतील ६६५ अंकांचा तोटा भरून काढला. सेन्सेक्समध्ये १८४.४० अंकांची वाढ होऊन तो...
  July 14, 06:11 AM
 • मुंबई: युरोझोनमधील पेचप्रसंग जटिल झाल्याच्या चिंतेतून घसरलेला जागतिक शेअर बाजार, औद्योगिक उत्पादनाच्या (आयआयपी) कामगिरीकडून झालेली निराशा आणि इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आर्थिक निकालाने केलेली घोर निराशा या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन सेन्सेक्स सलग तिस-या सत्रात ३१० अंकांनी गडगडला. एकामागोमाग येणा-या नकारात्मक वृत्तांमुळे हैराण झालेल्या गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारात सपाटून विक्रीचा मारा केला. सोमवारपासून अगोदरच असलेल्या घसरणीच्या वातावरणामध्ये औद्योगिक...
  July 13, 05:22 AM
 • नवी दिल्ली : बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता कंपन्यांनी आयपीओ बाजारापासून चारहात लांब राहणेच पसंत केले आहे. या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत प्रारंभिक समभागविक्री प्रस्ताव (आयपीओ) व फॉलो-ऑन प्रस्तावातून ११ हजार कोटी रुपये उभे राहिले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही रक्कम एक तृतीयांश एवढीच आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत ३४ कंपन्यांनी आयपीओ व एफपीओच्या माध्यमातून ३४१५० कोटी रुपये जमविले होते, तर यंदा जानेवारी ते जूनदरम्यान २२ कंपन्यांनी याच माध्यमातून ११४२१ कोटी रुपये उभे केले...
  July 13, 05:19 AM
 • मुंबई - आशिया तसेच युरोपातील बाजारातील कमजोर संकेत, विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्थांनी ब्ल्यू-चीप कंपन्यांच्या समभागांची सातत्याने केलेली मोठी विक्री यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील सूचकांक- सेन्सेक्स 137 अंकांनी घसरला. माहिती तंत्रज्ञान, धातू तसेच बँकांच्या समभागांना याचा मोठा फटका बसला.शुक्रवारी संपलेल्या सत्रात सेन्सेक्समध्ये 220 अंकांची घसरण झाली होती, सोमवारीही हा घटीचा डाव पुढे चालू राहिला. दिवसअखेर 136.65 अंकांची पडझड होऊन सेन्सेक्स 18721.39 अंकांवर...
  July 12, 10:34 AM
 • भारतीय शेअर बाजारासाठी या आठवड्याचा पहिला दिवस निराशाजनक राहिला. युरोपीय आणि आशियाई शेअर बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सोमवारी घसरण पाहायला मिळाली. आयटी, तंत्रज्ञान, मेटल आणि बँकिंगच्या शेअर्समध्ये मोठीच घसरण झाली.सोमवारी हिंडाल्को, सेल, अॅक्सिस बँक, डीएलएफ, विप्रोसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. दुसरीकडे ओएनजीसी, एमअँडएम, आयटीसी, ग्रासिम, रिलायन्स कम्युनिकेशन्ससारख्या कंपन्यांनी आपल्या शेअर्समध्ये तेजी राखण्यात यश मिळविले.दिवसअखेर...
  July 11, 07:02 PM
 • मुंबई- सौदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशीच्या २२० अंकांच्या आपटीचा अपवाद वगळता सलग तिसरा आठवडा बाजारातील तेजी कायम राहिली. याच आठवड्यात निफ्टीने ५७०० तर सेन्सेक्सने १९ हजारांची मानसिक पातळी गाठली, परंतु नवीन आठवड्यात कंपन्यांचे जाहीर होणारे आर्थिक निकाल, औद्योगिक उत्पादनाची जाहीर होणारी आकडेवारी आणि रिझर्व्ह बॅँकेचे धोरण या सर्व गोष्टींवर बाजाराची पुढची वाटचाल अवलंबून राहणार आहे. नवीन सौदापूर्ती सप्ताहामध्ये बाजारात चढ-उतार राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे....
  July 10, 03:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात