Home >> Business >> Share Market

Share Market News

 • मुंबई- जागतिक शेअर बाजारातील संमिश्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात झालेल्या नफारूपी विक्रीच्या मायात सेन्सेक्स ७० अंकांनी घसरला. बाजारात झालेल्या विक्रीचा जास्त फटका रिलायन्स आणि भ्ोल या समभागांना बसला. तेलंगणासाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या मागणीसाठी आंध्र प्रदेशातील नऊ खासदारांनी दिलेल्या राजीनाम्याच्या वृत्ताचा बाजारावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे बाजारात सकाळपासूनच नकारात्मक वातावरण होते आणि दिवसभ्ार तसेच कायम राहिले. गेल्या दोन आठवड्यांपासून...
  July 6, 01:09 AM
 • नवी दिल्ली- तेल उत्खननप्रकरणी तेल उत्पादक कंपन्यांवर मेहेरबानी केल्याच्या आरोपावरून हायड्रोकार्बन संचालनालयाचे माजी संचालक व्ही. के. सिब्बल यांच्या घरावर सीबीआयचा छापा पडल्याच्या बातमीने शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात मोठी घसरण झाली आणि सलग सहा सत्रांत तेजी दाखविणार्या बाजारात सातव्या दिवशी (शुक्रवारी) घसरण झाली.मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील सूचकांक सेन्सेक्सने शुक्रवारी सकाळच्या सत्रात 3 मे नंतर प्रथमच 19000 हजारांचा टप्पा पार पाडला होता. मात्र, सीबीआयच्या छाप्याची...
  July 3, 10:43 AM
 • मुंबई - खाद्यान्नाच्या चलनवाढीमध्ये झालेली घट आणि ग्रीकवरील आर्थिक संकटाचे काळे ढग दूर होण्याची निर्माण झालेली आशा या दोन महत्त्वाच्या घडामोडींनी अगोदरच तेजाळलेल्या बाजारात सेन्सेक्सने सिक्सर मारला. उशिरा झालेल्या खरेदीमध्ये सेन्सेक्सने १५२ अंकांची आणखी एक उसळी घेत सलग सहाव्या दिवशी तेजी कायम ठेवली. काही दिवसांपासून बाजारात सुरू असलेल्या खरेदी महोत्सवामुळे गेल्या पाच दिवसांत १,१४५ अंकांची भरारी घेतलेल्या सेन्सेक्समध्ये आणखी १५२.०१ अंकांची वाढ होऊन तो १८,८४५.८७ अंकांच्या...
  July 1, 02:49 AM
 • मुंबई - विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सातत्याने होत असलेली गुंतवणूक आणि आर्थिक विकास दर ८.५ टक्क्यांपर्यंत जाण्याबाबत केंद्र सरकारने व्यक्त केलेला ठाम विश्वास यामुळे उत्साह दुणावलेल्या गुंतवणूकदारांनी दणकून केलेल्या खरेदीत सेन्सेक्सने २०१ अंकांची उसळी घेतली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या खरेदीच्या झंझावातात सेन्सेक्समध्ये तब्बल १,१०० अंकांनी वाढ झाली आहे. वास्तविक पाहता जून महिन्यातील डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत गुरुवारी संपत असल्याने गुंतवणूकदारांनी आपले...
  June 30, 03:28 AM
 • मुंबई - विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भांडवल बाजारात झालेल्या चांगल्या गुंतवणुकीमुळे खुश होऊन झालेल्या खरेदीमध्ये सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात १८,५२७ अंकांची कमाल पातळी गाठली होती; परंतु नंतर तेल आणि वायू तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभाग विक्रीमुळे मधल्या सत्रात सेन्सेक्स घसरून १८,३२३ अंकांच्या पातळीवर आला. मात्र, दिवसअखेर सुधारणा होऊन सेन्सेक्समध्ये ८० अंकांची वाढ झाली. त्यामुळे तेजी सलग चौथ्या दिवशी कायम राहिली. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी २३ जूनपासून भांडवल बाजारात...
  June 29, 03:08 AM
 • मुंबई - डिझेल, केरोसीन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीमुळे महागाईचा ताण आणखी वाढण्याची शक्यता असून देखील गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. उलट या निर्णयामुळे तेल आणि वायू कंपन्यांची आर्थिक प्रकृती सुधारण्यास मदत होऊन क्षेत्रनिहाय कामगिरीत सुधारणा होण्याची बाजाराला आशा वाटत आहे. याच आनंदात तेल कंपन्यांच्या समभागांच्या झालेल्या जोरदार खरेदीमध्ये सेन्सेक्स १७२ अंकांची भरारी घेत गेल्या दोन आठवड्यांतील उच्चांकी पातळीवर बंद झाला. आशियाई शेअर बाजारातील नरमाईमुळे सकाळच्या...
  June 28, 02:43 AM
 • नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादक कंपनी ओएनजीसी व केर्न इंडिया यांच्यातील वादामुळे ओएनजीसीचा ११,५०० कोटी रुपयांचा फॉलोआॅन आयपीओ पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. या आॅफरद्वारे विक्रीसंबंधी असलेल्या ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये (डीआरएचपी) केर्न इंडियाबरोबर सुरू असलेल्या वादाचा उल्लेख ओएनजीसीला करावा लागणार आहे. या वादासह सरकारच्या भूमिकेचाही त्यात उल्लेख करणे आवश्यक आहे. पुढील महिन्यात कंपनी डीआरएचपी सादर करण्याची शक्यता आहे.  सूत्रांनी सांगितले की, ओएनजीसी...
  June 26, 04:24 AM
 • मुंबई: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी सकाळी 17,804.94 अंकांच्या पातळीवर उघडला. परंतु जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती बॅरलमागे 4.6 टक्क्यांनी घसरून 91.02 डॉलरवर आल्यामुळे बाजाराला मोठा दिलासा मिळाला. दुपारच्या सत्रातच सेन्सेक्सने 18000 अंकांच्या पातळीला स्पर्श केला. या सत्रात 356 अंकांची भर पडल्यामुळे पातळीने 18229.58 अकांचा उच्चांक गाठला. दिवसअखेर तो 18240.68 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकही 151.25 अंकांनी वाढून 5471.25 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ग्रीस...
  June 25, 06:37 AM
 • मुंबई- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीच्या आनंदात किरकोळ गुंतवणूकदारांबरोबरच निधी संस्थांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे सेन्सेक्सने ५०० अंकांची उसळी घेतली. अनेक तेल कंपन्यांचे समभाग वधारले. सेन्सेक्सच्या उसळीत नेहमीच मोठा वाटा उचलणाया रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात मात्र खास वाढ दिसली नाही.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी १७,८०४.९४ अंकांच्या पातळीवर उघडला; परंतु जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती बॅरलमागे ४.६ टक्क्यांनी घसरून ९१.०२ डॉलरवर...
  June 25, 04:54 AM
 • मुंबई- जागतिक शेअर बाजारातील नरमाई आणि खाद्यान्नाच्या महागाईत झालेली वाढ याचा कोणताही परिणाम बाजारावर न होता उलट रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस यांसारख्या बड्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी होऊन सेन्सेक्समध्ये १७६ अंकांची वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी कमी पातळीवर उघडला. युरोप आणि आशियाई शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण, तसेच अन्नधान्याच्या महागाईदरात झालेली वाढ याचा विपरीत परिणाम बाजारावर होईल, असा अंदाज होता; परंतु गुंतवणूकदारांनी विद्यमान खालच्या पातळीला...
  June 24, 04:10 AM
 • मुंबई - यंदाच्या वर्षी मान्सून सरासरीपेक्षा कमी होऊन शेती उत्पादन घटण्याबाबत हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आणि भांडवल बाजारातील विदेशी गुंतवणूकदार संस्थांचा कमी झालेला सहभाग लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी सावध होऊन केलेल्या व्यवहारात सेन्सेक्स १० अंकांनी घसरला. वास्तविक पाहता युरोपमधील आर्थिक संकटामुळे गेल्या काही आठवड्यांपासून बाजार तणावाखाली होता. परंतु ग्रीसचे पंतप्रधान जॉर्ज पापेंद्रू यांनी बुधवारी संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यामुळे ग्रीस कर्जाच्या सापळ्यातून...
  June 23, 03:52 AM
 • मुंबई- म्युच्युअल फंड वितरकांचे नियंत्रण करण्याबरोबरच त्यांना काही सवलती देण्याचा विचार भांडवल बाजार नियंत्रक करीत असल्याची माहिती सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीजच्या सातव्या म्युच्युअल फंड परिषदेत दिली. लहान शहरांमधील म्युच्युअल फंडांच्या विक्रीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी वितरकांना सवलती देण्याची नितांत गरज आहे. त्याचप्रमाणे या वितरकांच्या व्यवसायात अडथळा येणार नाही अशा प्रकारे त्यांचे नियंत्रण करण्याचा...
  June 23, 03:47 AM
 • मुंबई - भारत आणि मॉरिशस यांच्यातील विद्यमान दुहेरी करप्रणाली कराराची फेररचना होण्याच्या शक्यतेमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी केलेल्या तुफान विक्रीमुळे घसरलेल्या मुंबई शेअर बाजाराला आशिया आणि युरोप शेअर बाजारातील स्थिर वातावरणामुळे मोठा दिलासा मिळाला. गुंतवणूकदारांनी कमी किमतीला केलेल्या समभाग खरेदीमुळे सेन्सेक्समध्ये ५४ अंकांची वाढ झाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये १०८ अंकांची वाढ झाली होती. परंतु नंतर काही प्रमाणात झालेल्या नफारूपी विक्रीमुळे बाजार घसरला...
  June 22, 06:51 AM
 • नवी दिल्ली- मॉरिशसमधून झालेल्या गुंतवणुकीवर मिळालेल्या भांडवली नफ्यावर अविवेकी कर लादणार नसल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले. या गुंतवणुकीवर दोन वेळा कर द्यावा लागणार या बातमीने सोमवारी सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात प्रचंड घबराट उडाली आणि सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी गडगडला. त्यावर सरकारच्या वतीने हा खुलासा करण्यात आला.असे कसे होऊ शकते? अशी प्रतिक्रिया वित्त सचिव सुनील मित्रा यांनी या सर्व प्रकारावर व्यक्त केली. ते म्हणाले की, यासंदर्भात असा अविवेकीपणा दाखवता येणार नाही....
  June 21, 03:35 AM
 • भारत आणि मॉरिशसमधील विद्यमान दुहेरी करप्रणालीची फेररचना करण्याबाबत उभय देशांमध्ये लवकरच बैठक होण्याच्या वृत्तामुळे भांबावलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात केलेल्या तुफान विक्रीच्या मार्यात सेन्सेक्स 363 अंकांनी गडगडला. या कराराची फेररचना झाल्यास मॉरिशसमधून येणार्या विदेशी थेट गुंतवणुकीवर कर लागण्याची शक्यता असून त्याचा बाजारावर विपरीत परिणाम झाला.वास्तविक पाहता सकाळच्या सत्रात खरेदीचे वातावरण होते; परंतु दुहेरी करप्रणाली कराराची फेररचना होण्याची धास्ती आणि त्यातच जागतिक...
  June 21, 03:31 AM
 • शेअर बाजार कोणाला थोड्या वेळेत लखपती करत नसतो. शेअर बाजाराच्या मोठ्या गप्पा मारणारे फक्त फायद्याच्या गोष्टी सांगतात. तोट्याच्या गोष्टी मात्र लपवून ठेवतात. त्यांचे कपाट उघडून पाहा, गाळात गेलेल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या थप्प्या अंगावर कोसळतील. त्यांच्या डिमॅटच्या स्टेटमेंटमध्ये कधी न ऐकलेल्या शेअर्सची गर्दी दिसेल; परंतु याचा अर्थ असा नाही की, शेअर बाजारामधून मिळणाया उत्पन्नाचा विचारच करू नये. प्रत्येक गोष्टीला नियम असतात. नियमानुसार वागले तर यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते....
  June 20, 03:28 AM
 • मुंबई: बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)चा निर्देशांक ज्या ३० कंपन्यांच्या समभागावर आधारित आहे, त्या यादीत कोल इंडिया आणि सन फार्मा यांचा समावेश होणार आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व रिलायन्स कम्युनिकेशन यांची जागा या कंपन्या घेणार आहेत. हा बदल ८ आॅगस्टपासून लागू होणार असल्याचे बीएसईच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. बीएसईच्या निर्देशांक व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे.कोल इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी असून, तिचे भागभांडवल २.५ लाख कोटी रुपये आहे. कोल...
  June 19, 04:17 AM
 • मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरून सातत्याने मिळणारे प्रतिकूल संकेत देशातील शेअर बाजारावर दबाव टाकत आहेत. युरोपातील ग्रीसचे कर्ज संकट अधिकच वाढत चालल्याने आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा उत्साह कमी होत चालला आहे. याचा विपरीत परिणाम आशियातील तसेच भारतीय शेअर बाजारावर स्पष्ट दिसत आहे. या आठवड्यात बुधवार ते शुक्रवार या तीन सत्रांत उभारी घेण्यात शेअर बाजार अयशस्वी ठरला. ३० कंपन्यांच्या समभागावर आधारित मुंबई स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई) संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारी ११५.३५ अंकांनी...
  June 19, 04:14 AM
 • मुंबई ब्युरो: युरोपातील आर्थिक पेचप्रसंगामुळे जागतिक पातळीवरील आर्थिक सुधारणांना खीळ बसण्याची भीती आणि रिझर्व्ह बॅँकेच्या व्याज दरवाढीमुळे चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सलग दुसर्या दिवशी केलेल्या विक्रीच्या मार्यात सेन्सेक्स 115 अंकांनी गडगडला. गेल्या तीन सत्रात सेन्सेक्स 323 अंकांनी घसरला आहे.वास्तविक पाहता बाजार उघडल्यानंतर सकाळच्या सत्रात खरेदीला प्रारंभ झाला होता. या सत्रात सेन्सेक्समध्ये 78.88 अंकांची चांगली वाढ झाली होती. परंतु युरोपातील आर्थिक पेचप्रसंग आणि आशियाई...
  June 18, 04:05 AM
 • मुंबई- आठवड्यातील शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मंदी दिसली. शुक्रवारी सेंसेक्स ११५ अंकानी खाली पडला. तर, निफ्टी ३० अंकानी ढासळला.बीएसईच्या पहिल्या टॉपच्या ३० बड्या कंपन्याच्या सेंसेक्स ११५.३५ ने पडून तो १७, ८७० अंकावर बंद झाला. दिवसभरात सेंसेक्स १८.०६४ इतका उच्चांकी गेला तर, तो १७.८४४ पर्यंत खाली आला होता. अखेर तो १७.८७० वर बंद झाला.
  June 17, 08:26 PM
 
जाहिरात

RECOMMENDED