Home >> Business >> Share Market

Share Market News

 • सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले असून येत्या काळातही सोन्याच्या भावाची झळाळी कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे. सोन्याचे भाव कधी-कधी कमी झाल्याचे दिसून आले तरी ते काही काळानंतर पहिल्याच जागेवर गेल्याचे अनेकदा दिसून आले आहे. याला प्रमुख कारण आहे सतत बदलत राहणारी जागतिक अर्थव्यवस्था. शिवाय सोन्यातील प्रमुख निर्यातदार देश व या क्षेत्रातील दलाल/ बडे गुंतवणूकदार सोन्याचे भाव कधीही खाली आणू देत नाहीत.जागतिक पातळीवर सतत बदलत राहणारी अर्थव्यवस्था हे एक प्रमुख कारणे मानले जाते. यापूर्वी...
  May 29, 12:18 PM
 • मुंबई - टिंबोर होम लिमिटेड ही कंपनी ३ मे रोजी भांडवल बाजारात प्रवेश करीत आहे. गृहसजावटीसाठी लागणाऱया वस्तूंची निर्मिती आणि किरकोळ विक्री करणाऱया या कंपनीची देशभरात ८ दुकाने आहेत. ही कंपनी प्रत्येकी १० रुपये मूल्याचे ३६,९०,००० समभाग विक्रीला आणत आहे. ही समभाग विक्री शंभर टक्के बुकबिल्डिंग पद्धतीने होणार आहे. या विक्रीमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ५० टक्के तर म्युच्युअल फंडांसाठी केवळ ५ टक्के वाटा राखीव असेल, या समभाग विक्रीसाठी कंपनीने प्रति समभाग ५४ रुपये आणि ६३ रुपये असा...
  May 29, 02:16 AM
 • शिप रिसायकलिंग व्यवसायात कार्यरत असलेली व्हीएसएम इंडस्ट्रीज लिमिटेड ही भावनगर येथे कार्यरत असलेली कंपनी 30 मे रोजी भांडवल बाजारात प्रवेश करीत आहे. कंपनी या सार्वजनिक समभाग विक्रीतून 2,575 लाख रुपयांचा निधी उभारण्याचा विचार करीत आहे. समभाग विक्रीतून उभारलेल्या भांडवलाचा उपयोग शिप रिसायकलिंग प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी करण्यात येणार आहे. कामकाज भांडवलाच्या गरजांची पूर्तता त्याचप्रमाणे अहमदाबाद येथे सुरू करण्यात येत असलेल्या नवीन कॉर्पोरेट कार्यालयासाठी देखील हा निधी वापरण्यात...
  May 29, 01:47 AM
 • मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यान नऊ आठवड्याच्या नीचांकावरुन प्रथमच १९७ अंकांनी वधारत सेेन्सेक्स अठरा हजाराच्या घरात गेला. गुरुवारी तो १६४ अंशांनी गडगडला होता. जागतिक पातळीवरील प्रमुख शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे बाजारभाव वधारला. तसेच काही कंपन्यांनी चैौथ्या तिमाहीचे आर्थिक ताळेंबद जाहीर केल्यानेही गुंतवणूकदारांत उत्साह होता.
  May 27, 04:30 PM
 • शेअर बाजार गडगडले मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १६५ अंकांनी घसरला. तर निफ्टीमधेही ४६ अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स १७८४७ तर निफ्टी ५३४८ अंकांवर दोन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर बंद झाले. मे सिरीजच्या एक्सपायरीमुले तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यामुळे बाजारावर दडपण होते. तसेच अमेरिका आणि युरोपमध्ये मंदीचे सावट असल्याचा परिणामही दिसला. आज सर्वाधिक फटका बसला तो रिअलिटी, आयटी आणि बँकिंग...
  May 25, 04:16 PM
 • सेलचा एफपीओ लांबणीवर स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या फोलो ऑन पब्लिक ऑफरसाठी गुंतवणूकदारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सध्या शेअर बाजारात अस्थिरता आहे. त्यामुळे योग्य वेळ पाहून याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष सी. एस. वर्मा यांनी दिली. एफपीओ जूनमध्ये आणण्याची शक्यता आहे. पण, यासंदर्भात सेबीकडे कधी अर्ज करणार याबाबत निर्णय झाला नाही. यावर्षी सेलच्या शेअरमध्ये २४ टक्के घसरण झाली आहे....
  May 25, 11:52 AM
 • शेअर बाजार गडगडलेआंतरराष्ट्रीय बाजारांमधील दबावांमुळे आज भारतीय शेअरबाजार कोसळले.मंगळवारी शेअर बाजारांमध्ये मोठे चढउतार आले होते. आज सेन्सेक्स उघडताच 63 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्ये १५ अंकांची घसरण झाली. रिएलिटी आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स पडले.याशिवाय तेल आणि वायु, कमोडीटी गुड्स आणि बॅंकींग क्षेत्रातही घसरण झाली.अमेरिकेतील बाजार काल गडगडले होते. त्याचा परिणाम आशियातील बाजारांवरही झाला.
  May 25, 11:37 AM
 • सोने-चांदीचे दर झेपावले ! सोने आणि चांदीच्या भावात आज मोठी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतामुळे हे दर वाढले. मुंबईत १० ग्रॅम सोन्याचा दर आज २२,४०० होता. तर नवी दिल्लीमध्ये हाच दर २२.६९० एवढा होता. चांदीचे भावही आज १७०० रुपये प्रती किलोने वाढले. मुंबईत चांदीचा दर ५६,०२६ एवढा होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीचे दर चढेच होते. युरोपमधील कर्जाचे संकट आणि अस्थिर शेअर बाजारामुळे हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
  May 24, 09:15 PM
 • आयपीओवरील सवलत आता बोली लावतांनाचपब्लिक ऑफर अर्थात आपीओमध्ये गुंतवणुक करणार्यांसाठी चांगली बातमी आहे. आयपीओवर मिळणारा डिस्काऊंट आता बोली लावतांनाच मिळणार आहे. त्यामुळं गुंतणूकदारांना आता बोली लावतांना कमी रोख रक्कम द्यावी लागणार आहे. तसेच या सुविधेमुळे गुंतवणूकदारांना जास्त शेअर्सवर बोली लावता येणार आहे. सध्या ही सवलत शेअर्सचे वितरण झाल्यानंतर मिळते. जवळपास 5 टक्के सवलत देण्यात येते. नविन नियम 15 जून रोजी किंवा त्यानंतर येणार्या आयपीओवर लागू होईल.
  May 24, 04:33 PM
 • महागाई घटल्याचा शेअर बाजाराला दिलासागेल्या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण झाली. पण, महागाईचा दर कमी झाल्यामुळे अखेर शेअर बाजाराला दिलासा मिळाला. खाद्य पदार्थांचा महागाईचा दर कमी झाला. याशिवाय लार्सन अॅंड टुब्रोचा वित्तीय निकाल अपेक्षेपेक्षा चांगला राहिला. त्यामुळे बाजारात उत्साह दिसुन आला. बड्या गुंतवणूकदारांनी बाजारातील घसरणीचा लाा घेतला. दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही तेजी दिसुन...
  May 24, 04:30 PM
 • शेअर बाजारात अत्यल्प तेजीशेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रामध्ये आज तेजी होती. सेन्सेक्स 18.64 अंकांच्या तेजीने 18,011 अंकांवर बंद झाला. तर निफटी 8 अंकाच्या तेजीसह 5,394 अंकांवर बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स 54 अंकांच्या तेजीने उघडला. ही तेजी दुपारच्या सत्रापर्यंत कायम होती. अखेरच्या सत्रात काही प्रमाणात घसरण झाली. निफटीमध्येही सकाळच्या सत्रात तेजी होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये उलाढाल कमी होती. तर पीएसयु, रिएलिटी, मेटल आणि एफ एमसीजी क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली. आतरराष्ट्रीय...
  May 24, 04:27 PM
 • मुंबई - एल ऍण्ड टी या ब्ल्यू चीप कंपनीचे तिमाही आणि वार्षिक निकाल नुकतेच घोषित झाले आहे. या निकालानुसार खरेदीच्या बळावर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मजबूत स्थितीत आल्याचे चित्र होते. खाद्यान्नाच्या कमी होत असलेला दर आणि विदेशी बाजारातील वृद्धीचादेखील शेअर बाजाराला फायदा झाला आहे. गुरुवारीची वृद्धी कायम राखत मुंबई स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई) ३ शेअर्सचा निर्देशांक शुक्रवारी १८४ अंकांसह १.२ टक्क्यांनी उसळून १८,३२६.९ अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)...
  May 22, 01:24 PM
 • मुंबई - बाजारात तेजी असूनही मिडकॅप 47.62 अंकांनी घसरून 6715.23 वर तर स्मॉलकॅप 44 अंकांनी घसरून 8145.57 अंकांवर बंद झाला. बीएसईमध्ये आज एकूण 2909 कंपन्यांच्या शेअर्सचा व्यापार झाला ज्यात 1072 शेअर्समध्ये नफा तर 1683 शेअर्समध्ये तोटा झाला. इतर 154 शेअर्समध्ये कोणतीही हालचाल झाली नाही. युरोप आणि अमेरिकेतील बाजारात वृद्धी दिसून आली. आशियात चीन आणि जपान वगळता इतर सर्व बाजारांत तेजी राहिली. निर्देशांकात उसळी घेणा:या शेअर्समध्ये एल ऍण्ड टी 5.92 टक्के नफा कमावत सर्वात पुढे राहिली. कंपनीचे शेअर्स 89.15 रुपयांनी वाढून प्रती...
  May 20, 01:49 PM
 • शेअर बाजारात गुंतवणूक करताना आमच्या तज्ज्ञांनी दिलेल्या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतात. खालील पाच शेअर तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतात. वेलस्पर्न कॉर्पखरेदी - १७५ टार्गेट - २४०या कंपनीचे ऑर्डर बूक एकदम मजबूत आहे. गेल्या काही दिवसांत कंपनीला काही मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे कंपनीची स्थिती आणखी मजबूत होईल. कंपनीच्या शेअरची खरेदी तुम्हाला पुढे फायदा मिळवून देऊ शकते. आयडीएफसीखरेदी - १२५ टार्गेट - १६०पायाभूत सुविधांचे क्षेत्र पुढील काळात विशेष महत्त्वाचे राहणार आहे....
  May 20, 11:21 AM
 • मंगळवारी शेअर बाजारातील कारभारात सामसूम राहिली आणि खूप मोठ्या प्रमाणात पडझड होऊन शेअर बाजार बंद झाला. एसबीआयच्या अत्यंत वाईट कामगिरीनंतर बाजारावर त्याचे पडसाद दिसून आले. एसबीआयचा निव्वळ नफा जाहीर झाल्यानंतर बॅंकेच्या शेअर्समध्ये 7.50 टक्क्यांची प्रचंड घट झाली. मंगळवारी बीएसईचा निर्देशांक 208 अंकांच्या घसरणीनंतर 18, 137.35 वर बंद झाला. राष्ट्रीय स्टॉक एक्चेंजचा निफ्टी 60.05 घटुन 5,438.95 वर बंद झाला. बीएसईच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये अनुक्रमे 0.66 आणि 0.61 टक्क्यांची घट झाली.पडझड झालेल्या...
  May 19, 05:16 PM
 
जाहिरात

RECOMMENDED