जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Share Market

Share Market News

 • मुंबई - भारतीय शेअर बाजारात मंगळवारी तेजीची लाट आली. सेन्सेक्स ४८१.५६ अंकांनी उसळून ३७५३५.६६ अंकांवर तर निफ्टी १३३.१५ ने वाढून ११,३०१.२० अंकांवर पोहोचले. हा सहा महिन्यांचा उच्चांक आहे. मागील वर्षी १७ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स ३७,५८५ या पातळीवर बंद झाला होता. तज्ज्ञांच्या मते, विदेशी गुंतवणुकीतील वाढ, रुपयाची मजबूत स्थिती आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे ही तेजी दिसून आली. आगामी निवडणुकीत एनडीएच्या विजयाच्या कलामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याचे दिसते. सोमवारी...
  March 13, 08:53 AM
 • नवी दिल्ली - ब्रोकर्ससाठीचे शुल्क कमी करण्याचा निर्णय बाजार नियामक सेबीने घेतला आहे. ब्रोकरच्या दृष्टीने एक कोटी रुपयांच्या व्यवहारावर शुल्क १५ रुपयांवरून ३३.३ टक्क्यांनी कमी करून १० रुपये करण्यात आले आहे. कृषी कमोडिटी डेरिव्हेटिव्हजसाठी आता शुल्क १५ रुपयांऐवजी केवळ एक रुपया लागेल. जर ब्रोकर्सने याचा फायदा गुंतवणूकदाराला दिला तर त्यांच्यासाठीही गुंतवणूक करणे स्वस्त होणार आहे. वास्तविक शुल्कातील अंतर अत्यंत कमी आहे. सेबीने शुक्रवारी हा निर्णय घेतला. हा बदल एक एप्रिल २०१९ पासून लागू...
  March 2, 11:53 AM
 • नवी दिल्ली - सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी मोदी सरकारसाठी नकारात्मक बातमी आली आहे. भारताचा विकास दर ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ दरम्यान ६.६ टक्के नोंदवण्यात आला. हा मागील सहा तिमाहींतील सर्वात कमी आहे. या आधी एप्रिल ते जून २०१७ मध्ये ६.९ टक्के विकास दर नोंदवण्यात आला होता. वर्षभरापूर्वी समान तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था ७.७ टक्क्यांनी वाढली हाेती. देशांतर्गत आणि निर्यातीसाठीची मागणी कमी झाल्याने ही घसरण नोंदवण्यात आली आहे. ग्राहकी खर्च जीडीपीच्या जवळपास ५७ टक्के आहे. यातील वाढ कमी होऊन ८.४...
  March 1, 11:23 AM
 • नवी दिल्ली - अनिल अंबानी यांच्यासमोर नवीन संकट उभे राहिले आहे. त्यांच्या समूहाच्या कंपन्यांना कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनी ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान सुमारे ४०० कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत. संचालकांनी हे शेअर गहाण ठेवून या संस्थांकडून कर्ज घेतले होते. या शेअरची विक्री करण्यात आल्यानंतर कंपनीमध्ये संचालकांची भागीदारी तीन ते आठ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. या विक्रीमुळे चार दिवसांत समूहाच्या कंपन्यांचे मूल्य ५५ टक्के म्हणजेच १३,००० कोटी रुपयांनी घटले आहे. ज्या कंपन्यांचे शेअर...
  February 9, 10:09 AM
 • नवी दिल्ली : पैसे कमविण्यासाठी मोठ्या रकमेपासून सुरुवात करणे गरजेचे नाही. तुम्ही छोट्या रकमेपासून सुरुवात करून श्रीमंत होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला स्टॉक मार्केट (Stock Market)चे काही बेसिक नियम लक्षात घ्यावे लागतील. अनेक मोठे गुंतवणूकदार या नियमांचे पालन करून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे. आज श्रीमंत लोकांमध्ये त्यांचे नाव समाविष्ट आहे. तुम्हाला पण शेअर बाजारातून (Share Bazaar) कमाई करायची असेल तर तुम्हाला हे आठ गोल्डन टीप्सवर लक्ष द्यायला हवे. याद्वारे तुमची छोटी रक्कम लाखो किंवा कोटीमध्ये...
  December 29, 10:54 AM
 • शेअरमधील गुंतवणुकीत अस्थिरतेचे वातावरण कायम येतच राहते. अनेकदा अस्थिरता इतकी जास्त असते की, जुन्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वासदेखील कमी होतो. मात्र, समजदार गुंतवणूकदारांना गडबडीत शेअर बाजारातून बाहेर पडण्याचा परिणाम माहिती आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याजवळील शेअरची विक्री केल्यास बाजाराची परिस्थिती चांगली असताना नुकसान भरपाई मिळत नाही हे त्यांना माहिती असते. बाजारातील ही घसरण काही कालावधीसाठीच असते कालांतराने शेअर बाजार पुन्हा तेजीने वर जातोच हे या गुंतवणूकदारांना...
  December 14, 10:27 AM
 • बिझनेस डेस्क - शेअर बाजार (Share Bazar)मधून प्रत्येकाला कमाई करण्याची इच्छा आहे. पण, यात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट (Demat) अकाउंट शिवाय आवश्यक आहे. डीमॅट खाते बनवने खूप सोपे आहे. घरबसल्या तुम्ही डीमॅट अकाउंट उघडू शकता. हे अकांउट उघडायला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. वाढते ब्रोकरेज हाउस पाहता झिरो फीस अकाउंट उघडले जात आहेत. यासाठी महत्त्वाचे आहे डिमॅट अकांउट डीमॅट अकाउंट एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक लॉकर आहे. जेथे गुंतवणुकदार आपल्या सिक्यॉरिटीज ठेऊ शकतात. सिक्यॉरिटीजमध्ये स्टॉक, म्युचुअल फंड...
  November 20, 06:24 PM
 • नवी दिल्ली- पैसा कमवण्याचातुमचा निर्धार पक्का असेल तर शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक करणे आवश्यक नाही. अल्प गुंतवणुकीतही तुम्ही मोठा लाभ मिळवून अल्पावधी कोट्यधीश होऊ शकतात. तुम्हाला फक्त शेअर मार्केटच्या काही बेसिक नियमांवर लक्ष द्यावे लागेल. शेअर मार्केटच्या नियमांचे अनेक मोठे गुंतवणुकदार पालन करतात. त्यात देशातीलच नव्हेत विदेशातील उद्योगपतींचा समावेश आहे. तुम्हालाही शेअर मार्केटमधून चांगली कमाई करायची असेल तर आम्ही आपल्यासाठी 5 महत्त्वाच्या मनी टिप्स घेऊन आलो आहोत....
  October 31, 02:58 PM
 • मुंबई - जागतिक बाजारपेठेतील घसरणीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर पाहायला मिळाला. गुरुवारी सेन्सेक्क 1037.36 अंकांनी घसरून 33,723.53 वर पोहोचला तर निफ्टी 321.5 अंकांनी घसरत 10150 च्या खाली सरकला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2.55 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. बाजारामध्ये सगळीकडे विक्रीचा मारा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मिडकॅप-स्मॉलकॅप शेअरही घसरले मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा मारा पाहायला मिळत आहे. बीएसईचे मिडकॅप इंडेक्स 3.3 टक्क्यांनी घसरले आहे. तर निफ्टीचे मिडकॅपमधील 100...
  October 11, 10:15 AM
 • मुंबई- शेअर बाजारात साेमवारी माेठी घसरण झाली. बीएसईचा ३० शेअर्सचा इंडेक्स ५०५.१३ अंकांनी गडगडला. तो दिवसअखेर ३७,५८५.५१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १३७.४५ अंकांच्या घसरणीसह ११,३७७.७५ अंकांवर आला. अमेरिका आणि चीनमधील वाद आणखी तीव्र होण्याच्या शंकेने बहुतांश आशियाई शेअर बाजारात घसरण झाली. बहुतांश विदेशी बाजारांतील कमकुवत संकेत व रुपयातील माेठ्या घसरणीचाही सेन्सेक्समधील घसरणीला हातभार लागला. रुपया पुन्हा गडगडला : इंट्रा डे व्यवहारात रुपया ८३ पैशांच्या घसरणीसह...
  September 18, 08:48 AM
 • सेन्सेक्सने 12 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत 19 व्यावसायिक सत्रांत 13 नवे उच्चांक प्रस्थापित केले. निफ्टीने 26 जुलै ते 9 ऑगस्टउरम्यान 9 व्यावसायिक सत्रांमध्ये 9 नवे हाय बनवले. मुंबई - शेअर बाजाराने गुरुवारीही नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सेन्सेक्स 37,994.51 अंकांवर उघडून काही वेळातच 38,000 च्या पार निघून गेला. सेन्सेक्सने 38,050.12च्या उच्चस्तराला स्पर्श केला. निफ्टीने 11,493.25 पासून सुरुवात करून 11,495.20 अंकांचा रेकॉर्ड बनवला. एनएसईवर सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. बँक निफ्टीही 28,216 च्या आतापर्यंतच्या...
  August 9, 10:52 AM
 • - सेन्सेक्स मंगळवारी 37,606.58 च्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता. - गेल्या 7 सत्रांमध्ये सेन्सेक्स 1,110.21 अंकांनी वधारला आहे. मुंबई - शेयर बाजार गेल्या आठवड्यापासून दररोज नवी उंची गाठत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सेन्सेक्स 37,643.87 वर सुरू झाला आणि 37711.87 चा एक नवा विक्रम रचला. निफ्टीही आतापर्यंतच्या सर्वात उच्च स्तरावर 11,390.55 पोहोचला. निफ्टीची सुरुवात 11,359.80 ने झाली. बीएसईमध्ये सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. ऑइल अँड गॅस, एफएमसीजी, पीएसयू, मेटल आणि बँकिंग सेअर सुमारे 1% पर्यंत वधारले. बजाज...
  August 1, 12:32 PM
 • मुंबई - सेन्सेक्सने या आठवड्यात आणखी एक विक्रमी आणि ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गुरुवारी सेन्सेक्सने प्रथमच 37 हजारांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीनेही विक्रमी 11,171 ची पातळी गाठत सुरुवात केली. शेअर मार्केटमधील तेजीचे वातावरण गुरुवारीही कामय राहण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट बुधवारीही विक्रमी पातळीवर बंद झाले होते. या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी टप्प्यावर सेन्सेक्स पोहोचला. निफ्टीमध्ये फार तेजी पाहायला मिळाली नव्हती. मात्र गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी अशा दोन्ही शेअर मार्केटची...
  July 26, 10:58 AM
 • मुंबई - शेअर बाजाराने गुरुवारी विक्रमी उंची गाठली. सेन्सेक्स 36424.23 वर सुरू झाला तर व्यवसायादरम्यान 36540.39 पर्यंतची पातळी गाठली. यापूर्वीची सेन्सेक्सची विक्रमी पातळी 36,443.98 आहे. 29 जानेवारीला ही पातळी गाठली होती. निफ्टीने 11,006.95 पासून सुरुवात करत 11,030.85 ची विक्रमी पातळी गाठली. 1 फेब्रुवारी 2018 नंतर प्रथमच निफ्टीने 11 हजारची पातळी ओलांडली आहे. एका रिपोर्टनुसार कच्च्या तेलाचे दर घसरल्याने शेअर बाजारात तेजी आली आहे. निफ्टी यावर्षी जास्तीत जास्त 11,200-11,300 दरम्यान तर कमीत कमी 9,500-10,000 दरम्यान राहू शकतो. बँकिंग...
  July 12, 11:32 AM
 • मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 69 रुपयांच्याही खाली तो घसरला आहे. गुरुवारी रुपयाची सुरुवात 28 पैशांनी घसरुन 68.89 वर झाली. त्यानंतर तो 69.10 पर्यंत घसरला. बुधवारी 37 पैशांनी घसरून रुपया डॉलरच्या तुलनेत 68.61 वर पोहोचला होता. तो 19 महिन्यांचा नीचांक होता. यापूर्वी 24 नोव्हेंबर 2016 ला रुपयाचे मूल्य 68.86 पर्यंत घसरले होते. क्रूड ऑइल महागल्याने तोटा आणि महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे रुपयावर वाढला दबाव. बँक आणि इंपोर्टर्सच्या वतीने डॉलरची माघणी वाढल्यानेही रुपयाचे...
  June 28, 11:49 AM
 • नवी दिल्ली- तुमचा बँकेत ठेवलेला पैसा किती सुरक्षित आहे असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल. तुमचा बँकेत ठेवलेला पैसा हा काही प्रमाणातच सुरक्षित असतो. तुम्ही बँकेत ठेवलेल्या एक लाख रुपयांची तुम्हाला गॅरंटी मिळते. तर पोस्टात ठेवलेला पैसा हा बॅंकेपेक्षा अधिक सुरक्षित असतो. का बँकेपेक्षा सुरक्षित आहे पोस्टातील गुंतवणूक 1. बॅंकेत घोटाळा झाल्यास समजा बँकत घोटाळा झाला तर अशा वेळी खातेदारांच्या पैशाचे काय होईल अशी मोठी चिंता असते. अशा वेळी तुमच्या केवळ एक लाख रुपयांच्या गुंतवणूकीच्या...
  June 26, 07:46 PM
 • नवी दिल्ली- आपल्या मुलीचे आयुष्य सुखात जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. जर ती वयाच्या 18 व्या वर्षी करोडपती झाली तर असा विचारही अनेकांना कठीण वाटतो. पण तुम्ही जर योग्य रितीने गुंतवणूक केली तर हे शक्य आहे. जाणकार याला स्टेपअप गुंतवणूक योजना असे म्हणतात. काय आहे स्टेपअप गुंतवणूक योजना स्टेपअप गुंतवणूक योजनेत दरवर्षी एका ठराविक टक्क्याने गुंतवणूक वाढविण्यात येते. जर 10 टक्क्यांची स्टेपअप गुंतवणूक योजना आहे तर यात तुम्हाला दरवर्षी 10 टक्के वाढ करावी लागते. समजा तुम्ही पहिल्या...
  June 24, 07:45 PM
 • नवी दिल्ली- DSK म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी हे नाव माहिती नाही असा मराठी माणूस कदाचित एकही नसेल. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ इंडियाच्या (BoM) सीईओ आणि एमडी रविंद्र मराठे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर डीएसकेंबाबतच्या अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. डीएसकेंचा प्रवास डीएसके म्हणजेच दीपक सखाराम कुलकर्णी यांनी 1970 मध्ये एक छोट्या फर्मची टेली स्मेलची स्थापना केली. कंपनी टेलिफोन रिसिव्हरच्या स्वच्छतेचे आणि परफ्यूमिंगचे काम करत होती. पण डीएसकेंची नजर...
  June 23, 05:26 PM
 • नवी दिल्ली- सोन्याच्या भावात 330 रुपयांनी वाढ झाली असून प्रति 10 ग्रॅमसाठी 32,190 रुपये मोजावे लागत आहेत. तर चांदीतही तेजी कायम असून भाव 450 रुपयांनी वाढून 42,400 हजार रुपयांवर पोहचला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असणाऱ्या ट्रेड वॉरमुळे डॉलर कुमकुवत झाला आहे. तर स्थानिक पातळीवर व्यापारी आणि खरेदीदारांकडून मागणी वाढली आहे. वैश्विक स्तरावर किंमतीत वाढ वैश्विक स्तरावर सोन्याच्या किंमतीत 0.24 टक्के वाढ झाली आहे. न्यूयॉर्क ट्रेड मार्केटमध्ये सोन्याचा भाव 1,301.90 अमेरिकी डॉलर प्रति ऑन्स तर चांदीचा भाव 0.74...
  June 16, 10:43 AM
 • नवी दिल्ली- तुम्ही अनेकदा चित्रपट पाहिला गेल्यावर 150-200 रुपये सहज खर्च करता. तुम्हाला ही रक्कम कदाचित जास्तही वाटत नसेल पण तुम्ही हीच रक्कम आपल्या भविष्यासाठी गुंतवल्यास तुम्हाला आजीवन उत्पन्नाचे साधन मिळू शकते. केवळ 84 रुपयांची मासिक बचत करुन तुम्ही वार्षिक 24000 रुपये मिळवू शकता. आम्ही तुम्हाला अटल पेन्शन योजनेची माहिती देत आहोत. या योजनेत आतापर्यंत एक कोटी लोकांनी गुंतवणूक केली आहे. ही योजना 18 ते 40 वर्षाच्या व्यक्तींसाठी आहे. या योजनेत प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे बॅंकेच बचत खाते आणि...
  June 15, 05:13 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात