Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • मनुष्य देह सोडल्यानंतर मागे काय सोडतो? पैसा, सत्ता, मुलं - बाळ या सर्व गोष्टी मनुष्य मागे सोडतो. घर, कुटुंब, बायका - मुलं, आई - वडिल, हे निसर्गतः आपोआप मिळतात. परंतु मनुष्य त्याच्या कीर्तीमुळे श्रेष्ठ ठरतो. पण कीर्ति जर मिळवायची असेल तर खूप गोष्टी सोडाव्या लागतात. कीर्ति म्हणजे लोकांनी तुम्हांला नांवाजणं, चांगलं म्हणणं. असं म्हणणं कीं, याच्या सारखा माणूसच नाही! याच्या सारखा माणूस नाही,असं कोणाबद्दल लोक म्हणतात ? कीं जो आपमान गिळतो आणि दुस-याचा सन्मान करतो. जो स्वतः कष्ट करतो, पण दुस-याला फळ देतो. जो...
  June 21, 12:27 PM
 • शास्त्रानुसार जीवनात मनुष्याकडून काळत, नकळतपणे केलेल्या कामातून पाप घडते, ज्याचे फळ आपल्याला दुःखाच्या स्वरुपात भोगावे लागते. हे दोष दूर करण्यासाठी देवाचे नामस्मरण करणे आवश्यक आहे. शास्त्रात नकळतपणे आणि अदृश्य स्वरुपात होणारे पाप आणि त्याशिवाय १४ असे कारणे आहेत ज्यामुळे व्यक्ती स्वतः जाणूनबुजून या पापांचा भागीदार होतो.असे मानले जाते की, हे पाप कोणत्याही क्षणी व्यक्तीला आपल्या विळख्यात घेऊ शकतात. या पापामुळे मनुष्य राक्षसासारखे आचरण करतो. त्यामुळे सुखी जीवनात खाली सांगितलेल्या १४...
  June 19, 12:38 PM
 • प्रत्येक माणूस आपल्या विचारशक्तीने ब-यावाईट विचारप्रतिमा निर्माण करतो. माणूस ज्या प्रकारची भाषा वापरतो त्या त-हेचा आकार प्रतिमांना येतो.चांगल्या विचारप्रतिमांना गोड व नम्र भाषा वापरली तर त्या प्रतिमा अतिशय सुंदर आकार घेतात. अशा सुंदर सुविचारप्रतिमा माणसांच्या मनास मोठे समाधान देतात.शिवाय त्या प्रतिमा बर्याच काळ टिकतात. या कारणांमुळे संतांच्या विचारांचा प्रभाव शतकानुशतके जशास तसाच टिकून राहतो. भक्त होण्याची आकांक्षा बाळगणा-याने श्रेष्ठ धारिष्ट (धीर) जोपासून आपल्या भोवती...
  June 18, 03:45 PM
 • क्रोध आपल्याला नव्हे आपल्या व्यक्तिमत्त्वाला जाळतो. क्षणिक आवेगात येऊन माणूस अशा चुका करतो की त्यासाठी त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. क्रोध एका क्षणात उफाळून येतो आणि दुस-याच क्षणाला नष्टही होतो. परंतु कधी कधी हा क्षणभरासाठी आलेला क्रोध आयुष्याचे नुकसान करून जातो. आपल्यात सहनशीलता वाढावी आणि गांभीर्य यावे यासाठी काय करावे ? आपल्या पौराणिक व्यक्तिमत्त्वांकडे पाहा. त्यांनी स्वताच्या व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष केले नाही. श्रीसमर्थांनी खालील श्लोकात काम, क्रोध , लोभ, मत्सर व दंभ...
  June 17, 02:52 PM
 • समाजामध्ये मनुष्याला ताठ मानेने जगण्यासाठी शुध्द आचरणाने वागावे लागते. पापचरणाला प्रवृत्त करणाऱ्या पापबुद्धीपासून दूर राहावे लागते. क्षणभर सुखासाठी इतरांना खोटे बोलून आपला स्वार्थ सिद्ध करू नये. कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाले तरी, सत्याचा आधार घेऊनच जीवन व्यतीत करावे. आयुष्यात काही दृढ संकल्प करावेत ज्यामुळे आपल्याला सुखी जीवनाचा मार्ग सापडेल. समर्थांनी त्यांच्या श्लोकात कोणते संकल्प मनुष्याने आयुष्यात केले पाहिजेत हे सांगितले आहे.मना पापसंकल्प सोडोनी द्यावा |मना सत्य...
  June 14, 05:06 PM
 • आपल्या जवळपास अनेक लोक असतात आणि आपण त्यांच्यासोबत अनेक कार्य करतो. प्रत्येक कामासाठी लोकांची वेगवेगळी संख्या श्रेष्ठ राहते. कोणते कार्य किती लोकांसोबत करावे, यासंबंधी आचार्य चाणक्य सांगतात...एकाकिना तपो द्वाभ्यां पठनं गायनं त्रिभि।चतुर्थिर्गमनं क्षेत्रं पञ्चभिर्बहुभी रणम्।।या श्लोकाचा अर्थ असा आहे की, व्यक्तीने एकांतात धन, तपस्या करावी. दोन लोकांनी एकत्रितपणे अभ्यास करावा. गायनासाठी तीन लोक योग्य आहेत. जर एखाद्या यात्रेवर जाण्यासाठी निघाला आहात तर चार लोक सोबत असावेत. शेतीचे काम...
  June 12, 02:29 PM
 • आपले जीवन ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या नवग्रहांच्या स्थितीवर आवलंबून आहे. कुंडली १२ स्थानात विभागलेली आहे. या १२ स्थानात नवग्रहांची वेगवेगळी स्थिती असते. सर्व ग्रह शुभ-अशुभ फळ देणारे असतात. आपल्या कुंडलीत जो ग्रह चांगल्या स्थितीत असेल तो शुभ आणि वाईट स्थितीत अशुभ फळ देतो. नवग्रह आणि त्यांचे शुभ-अशुभ फळ जाणून घेण्यासाठी, नवग्रहांच्या फोटोवर क्लिक करा....या सर्व ग्रहांचा प्रभाव अन्य ग्रहांच्या युतीसोबत कुंडलीत वेगवेगळ्या स्थानात बदलत जातो
  June 11, 07:24 AM
 • आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण एकमेकाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्न करत आहे. पण असे करताना तो आपला धर्म , नीती यांचे पालन करत नाही. स्वतःचा स्वार्थ साधावा म्हणून किंवा विनाकारण दुस-याचा घातपात करणे किंवा दुस-यास दुःख देणे किंवा दुस-याचे नुकसान करणे किंवा सज्जनास छळणे यावरून माणसाची दुष्ट वासना किंवा पापबुद्धी ओळखता येते. त्यामुळे श्रीसमर्थ सांगतात मनामधून त्यांची हकालपट्टी झाल्याशिवाय भगवंताचे दर्शन होत नाही.मना वासना दुष्ट कामा नये रे |मना सर्वथा पापबुद्धि नको रे |मना धर्मात...
  June 10, 11:33 AM
 • मनुष्याचे मन अशांत आणि तणावग्रस्त असेल तर त्याचे कामात आणि कुटुंबामध्ये मन रमत नाही. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याचे वाईट पाउल पडू शकते. त्यामुळे मनुष्याने स्वतःचे काय चुकले याचा शांत मनाने विचार करावा. धार्मिक दृष्टीनुसार तन, मन, धन किंवा ग्रहदोषामुळे निर्माण होणारी भीती, कुटुंबावर आलेले संकट दूर करण्यासाठी देवीची उपासना करणे हा एक उत्तम मार्ग आहे. त्यासाठी शुक्रवारी किंवा देवी उपासनेच्या शुभ मुहूर्तावर दुर्गासप्तशतीच्या मंत्राचा जप करावा.खाली दिलेल्या दुर्गासप्तशती...
  June 8, 02:17 PM
 • सध्याच्या धावपळीच्या काळात मनुष्याला देवाचे नामस्मरण करण्यसाठी वेळ मिळत नाही. समर्थांनी त्यांच्या श्लोकातून मनुष्याला देवाचे नामस्मरण करण्यासाठी एक वेळ सांगितली आहे. ती वेळ कोणती आहे, हे समर्थांनी त्यांच्या श्लोकात सांगितले आहे.प्रभातें मनीं राम चिंतीत जावा | पुढें वैखरीं राम आधीं वदावा |सदाचार हा थोर सांडूं नये तो |जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ||पहाटे मनाने भगवंताचे चिंतन करावे. नंतर वाणीने त्यांचे नाम घ्यावे, भजन करावे. सदाचरण फार श्रेष्ठ असते. माणसाने ते सोडू नये. असे वागणारा माणूसच...
  June 7, 12:45 PM
 • महाराष्ट्र ही जशी शूरवीरांची भूमी आहे तशी ती संत-महंतांचीही भूमी आहे. या महाराष्ट्रात संत नामदेव, संत रोहिदास, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार अशी परंपरा आहे. या संतमंडळींप्रमाणे माळी समाजात सावताबांनी जन्म घेऊन लोकांना खरा परमार्थ आणि भक्तिमार्ग दाखवून आपल्या जीवनाचे सार्थक कशात आहे, याचे मार्गदश्रन त्यांनी केले.अरण या गावी संत सावता माळी यांचा शके 1172 म्हणजेच इ.स. 1250 साली जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव परसुबा आणि आईचे नाव नगिताबाई....
  June 7, 09:09 AM
 • एक युवक तावातावाने बोलत होता. त्याची कसलीशी योजना वडिलांनी नाकारली होती. वडिलांच्या नकाराचा त्याला संताप आला होता. 'अहो, माझ्याकडे एक नव्हे तर तीन डिग्य्रा आहेत. घरी भरपूर पैसा आहे. माझ्यासाठी काहीही करायला मित्र तयार आहेत. मला हजार टक्के यशाची खात्री आहे. पण, माझे वडील म्हणजे..' तो खूप बोलला. त्याला वाटत होते की, मी त्याची बाजू घ्यावी. त्याच अपेक्षेने तो माझ्याकडे बघत होता. मी विचारले, 'गीता कधी वाचली आहेस का?' प्रश्न त्याला अनपेक्षित होता. 'गीता? माझा नाही देवावर विश्वास!' तो म्हणाला. मी हसून...
  June 7, 09:04 AM
 • जीवनात काही गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत, ज्यापासून आपल्याला नुकसान होऊ शकते. काही जीव(प्राणी) असे आहेत ज्यांच्यापासून आपण नेहमी सावध राहिले पाहिजे. आपल्याला कोणत्या जीवांपासून आणि मनुष्यापासून सावध राहिले पाहिजे हे आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे...अहिं नृपं च शार्दूलं बरटि बालकं तथा।परश्वानं च मूर्खं च सप्त सुप्तान्न बोधयेत्।।या संस्कृत श्लोकात आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, साप, राजा, लहान बाळ, डुक्कर, वाघ, दुस-याचा कुत्रा, आणि मूर्ख हे सात जीव झोपलेले असतील तर त्यांना...
  June 6, 12:42 PM
 • न्यायाचा देवता शनी देव, त्यांच्या अनेक कारणांमुळे त्यांना विलक्षण देवता असे मानले गेले आहे. शनीची गती मंद म्हणजे संथ आहे असे मानले जाते, तर दृष्टी वक्र म्हणजे वाकडी असे सांगितले जाते. शनी देवाची न्याय करण्याची पद्धत एकदम सरळ आहे. ज्यांचे कर्म चांगले आहेत त्यांच्यावर कृपा करणे आणि ज्यांचे कर्म वाईट आहेत त्यांना दंडित करणे. याच कारणांमुळे शनिदेवाची शुभ दृष्टी भाग्यकारक असते असे मानले जाते. मनुष्यावर जर त्यांची वक्र दृष्टी पडली तर फार वाईट गोष्टी आयुष्यात घडतात. शनीची महादशा, साडेसाती चालू...
  June 5, 03:35 PM
 • समर्थ आपल्या श्लोकात सांगतात की ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी भक्तीमार्गाचा वापर प्रत्येक मनुष्याने करावा. मुळांत जीव हा खरा ईश्वराचाच आहे. पण दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने जीव ईश्वरास विसरला. भक्ती हा दुरावा नाहीसा करते, जीवाला ती भगवंताच्या समीप नेते, त्यांचे दर्शन करून देते. त्या दर्शनातून जीवाला आत्मज्ञान प्राप्त होते. मना सज्जना भक्तिपंथेची जावें |तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें |जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावें |जनीं वंद्य ते सर्वभावें करावें ||हे सज्जन मना;( सत्स्वरूप जो...
  June 4, 03:44 PM
 • वटपौर्णिमा हा सण आला की, आपल्या डोळ्यांसमोर वटवृक्षाची पूजा करणारी सुवासिनी, 108 प्रदक्षिणा घालून माझे सौभाग्य अखंड ठेव, असे म्हणून व्रतवैकल्ये करणारी भारतीय स्त्री उभी राहते. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे.या संदर्भात पुराणात पुढीलप्रमाणे कथा आहे. अश्वपती या राजाची एकुलती लाडकी कन्या सावित्री उपवर झाली तेव्हा त्याने तिला पती निवडण्याचा अधिकार दिला. यावरून त्या काळात स्त्री स्वातंत्र्य आणि सन्मान होता, ही बाब लक्षात येते. सावित्रीने एका देखण्या, निर्धन, गरीब अशा सत्यवान...
  June 4, 02:10 PM
 • श्री समर्थ रामदास स्वामी यांचे वाड.मय एखाद्या विशाल महासागराप्रमाणे आहे.या महासागराची एक जबरदस्त लाट म्हणजे त्यांचे मनाचे श्लोक. समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाड.मय निर्मिति केली. दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या कृति प्रसिध्द आहेत. समर्थांचे मनाचे श्लोक अर्थासहित जाणून घ्या आणि आपले आत्मपरीक्षण व आयुष्य सुखकर करण्याचा...
  June 1, 12:05 PM
 • भारतीय जीवनशास्त्र कर्मयोगाच्या पायावर उभे आहे. या कर्मयोगाचे संतुलित व परिपक्व विचार-विवेचन भगवद्गीतेत केलेले आहे. महर्षी व्यासांनी वेद, पुराणांचा, सकल शास्त्रांचा गहन परामर्श घेऊन गीतेचे नवनीत काढले आहे. व्यास निर्माते, चिंतक, विचारक, द्रष्टा ऋषी होते. मानव अस्तित्वाचा, मानव समाजाचा, मानव जीवनाचा सर्वंकष अभ्यास चढत्या-उतरत्या श्रेणींच्या प्रवृत्तींसह अर्थात उत्कर्षकारी-पतनगामी प्रवृतींसह व्यासांनी स्पष्टपणे, विशालबुद्धीने, ज्ञानदीप प्रज्वलित करून महाकाव्य व वेदांत गं्रथात...
  May 30, 11:37 PM
 • समर्थांच्या विविध विचारशलाका या नावावरूनच पुस्तकाचे विषय लक्षात येतात. लेखक यशवंत जोगळेकर यांनी आधुनिक काळातील अनेक घटनांचे दाखले देऊन समर्थांच्या विविध विचारांतील परिणामकारकता दर्शविली आहे. सर्वसामान्य माणसाने समाजात कसे वागावे हे सांगत असताना व्यक्ती आणि समाजजीवन यातील संबंध लेखकांनी उलगडून दाखवले आहेत. समर्थांच्या आचारविचारातील सामाजिकता या प्रकरणात सांगितले आहे की, आपले दोष व्यक्तीने घालवून विवेकाची कास धरावी म्हणजे सहजच सामाजिक वातावरण शुद्ध राहील. समर्थांनी...
  May 30, 11:22 PM
 • अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या गुरू अर्जुनदेवजी यांच्या मनावर बालपणापासूनच उदारमतवादाचा पगडा होता. या उदारमतवादामुळेच त्यांनी जेव्हा गुरू ग्रंथसाहिब या आद्यग्रंथाच्या संकलनास प्रारंभ केला, त्यावेळी त्यांनी या ग्रंथात त्यांच्या आधीच्या चार धर्मगुरूंसह 15 संत आणि 14 रचनाकरांच्या रचनांचा त्यात अंतर्भाव केला. अंतभरूत करण्यात आलेल्या सर्व रचना या विविध जाती, धर्माच्या महान विभूतींच्या असून, त्या सर्व रचनांमधून सर्वत्र एकच ईश्वर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या धर्मग्रंथाचे...
  May 29, 12:52 PM
 
जाहिरात

RECOMMENDED