Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • वटपौर्णिमा हा सण आला की, आपल्या डोळ्यांसमोर वटवृक्षाची पूजा करणारी सुवासिनी, 108 प्रदक्षिणा घालून माझे सौभाग्य अखंड ठेव, असे म्हणून व्रतवैकल्ये करणारी भारतीय स्त्री उभी राहते. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे.या संदर्भात पुराणात पुढीलप्रमाणे कथा आहे. अश्वपती या राजाची एकुलती लाडकी कन्या सावित्री उपवर झाली तेव्हा त्याने तिला पती निवडण्याचा अधिकार दिला. यावरून त्या काळात स्त्री स्वातंत्र्य आणि सन्मान होता, ही बाब लक्षात येते. सावित्रीने एका देखण्या, निर्धन, गरीब अशा सत्यवान...
  June 4, 02:10 PM
 • श्री समर्थ रामदास स्वामी यांचे वाड.मय एखाद्या विशाल महासागराप्रमाणे आहे.या महासागराची एक जबरदस्त लाट म्हणजे त्यांचे मनाचे श्लोक. समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाड.मय निर्मिति केली. दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या कृति प्रसिध्द आहेत. समर्थांचे मनाचे श्लोक अर्थासहित जाणून घ्या आणि आपले आत्मपरीक्षण व आयुष्य सुखकर करण्याचा...
  June 1, 12:05 PM
 • भारतीय जीवनशास्त्र कर्मयोगाच्या पायावर उभे आहे. या कर्मयोगाचे संतुलित व परिपक्व विचार-विवेचन भगवद्गीतेत केलेले आहे. महर्षी व्यासांनी वेद, पुराणांचा, सकल शास्त्रांचा गहन परामर्श घेऊन गीतेचे नवनीत काढले आहे. व्यास निर्माते, चिंतक, विचारक, द्रष्टा ऋषी होते. मानव अस्तित्वाचा, मानव समाजाचा, मानव जीवनाचा सर्वंकष अभ्यास चढत्या-उतरत्या श्रेणींच्या प्रवृत्तींसह अर्थात उत्कर्षकारी-पतनगामी प्रवृतींसह व्यासांनी स्पष्टपणे, विशालबुद्धीने, ज्ञानदीप प्रज्वलित करून महाकाव्य व वेदांत गं्रथात...
  May 30, 11:37 PM
 • समर्थांच्या विविध विचारशलाका या नावावरूनच पुस्तकाचे विषय लक्षात येतात. लेखक यशवंत जोगळेकर यांनी आधुनिक काळातील अनेक घटनांचे दाखले देऊन समर्थांच्या विविध विचारांतील परिणामकारकता दर्शविली आहे. सर्वसामान्य माणसाने समाजात कसे वागावे हे सांगत असताना व्यक्ती आणि समाजजीवन यातील संबंध लेखकांनी उलगडून दाखवले आहेत. समर्थांच्या आचारविचारातील सामाजिकता या प्रकरणात सांगितले आहे की, आपले दोष व्यक्तीने घालवून विवेकाची कास धरावी म्हणजे सहजच सामाजिक वातावरण शुद्ध राहील. समर्थांनी...
  May 30, 11:22 PM
 • अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या गुरू अर्जुनदेवजी यांच्या मनावर बालपणापासूनच उदारमतवादाचा पगडा होता. या उदारमतवादामुळेच त्यांनी जेव्हा गुरू ग्रंथसाहिब या आद्यग्रंथाच्या संकलनास प्रारंभ केला, त्यावेळी त्यांनी या ग्रंथात त्यांच्या आधीच्या चार धर्मगुरूंसह 15 संत आणि 14 रचनाकरांच्या रचनांचा त्यात अंतर्भाव केला. अंतभरूत करण्यात आलेल्या सर्व रचना या विविध जाती, धर्माच्या महान विभूतींच्या असून, त्या सर्व रचनांमधून सर्वत्र एकच ईश्वर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या धर्मग्रंथाचे...
  May 29, 12:52 PM
 • हिंदू धर्मात शनीच्या दृष्टीला वक्रदृष्टी मानले जाते. असे मानण्यात येते की शनीची दृष्टी ज्या व्यक्तीवर पडेल त्या व्यक्तीचे वाईट दिवस सुरु झाले. का शनीची दृष्टी अशुभ मानली जाते? ब्रह्मवैवर्तपुराणत या संबंधी एक कथा सांगितली गेली आहे.सूर्य पुत्र शनीचे लग्न चित्ररथ नावाच्या गंधर्वाच्या कन्येशी झाले होते. जी स्वभावाने खूप रागीट होती. एकदा शनिदेव श्रीकृष्णाची उपासना करण्यात मग्न होते, तेंव्हा शनिदेवाची पत्नी ऋतू स्नान झाल्यानंतर मिलनाच्या इच्छेने शानिदेवाकडे गेली. परंतु शनिदेव...
  May 28, 12:44 PM
 • दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या श्रीक्षेत्र पुणतांबा, (जि. अहमदनगर)ची ओळख संपूर्ण देशातील लाखो भाविक-भक्तांना असून, 1400 वर्षे योग सार्मथ्याच्या जोरावर जीवन जगलेल्या योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधीने पुणतांबा हे तीर्थक्षेत्र ओळखले जात आहे. दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणार्या गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या धार्मिक स्थळाच्या विकासाकडे तसे दुर्लक्षच झाले. परंतु, अलीकडच्या काळात महाराष्ट्र सरकार आणि शिर्डीचे साईबाबा संस्थान यांच्या आर्थिक सहकार्याने इथल्या विकासाने गती...
  May 24, 05:58 AM
 • विहंगम योगाची वाणी सांगते की योग, भक्ती आणि उपासना एकाच अर्थाचे पर्याय आहे. त्याच्या प्राप्तीचा आधार काय सांगितला आहे? प्रेम निरंतर सांच ख-या प्रेमाची जेथे निरंतरता आहे, तेव्हाच योग, भक्ती आणि उपासनेची प्राप्ती होते. हे रहस्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. एक प्रेम भौतिक असते. ते क्षणिक असते, विनाशी असते. प्रेम आत्म्याचा सुगंध आहे. वासनेत स्वार्थ असतो, मोह असतो, आसक्ती असते. प्रेमात समर्पण असते, त्याग असते. त्याग कशाचा? अभिमानाचा, जडतेचा त्याग करायचा असतो. जो अहंकारी असतो तो प्रेमाच्या आंतरिक...
  May 21, 01:52 PM
 • श्री संत जनार्दन स्वामी यांच्या अगाध चमत्कारांची ख्याती दूरदूरपर्यंत पसरली होती. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरणा-या अशाच एका कुंभमेळ्यासाठी साधुंचा जथ्था नांदगावमार्गे नाशिकला चालला होता. त्या जथ्थ्यामधील साधुंनी स्वामीजींचा सिध्दासनातील फोटो बघितल्यावर हा महात्मा कोण असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे सर्वांनी स्वामीजींची भेट घ्यायचे ठरविले. सर्व साधूमंडळी जातेगावी पोहोचली. स्वामीजींनी मोठ्या प्रेमाने त्यांचे आदरातिथ्य केले. साधू जे जे मागतील ते ते स्वामीजी पुरवायचे. कधी...
  May 19, 04:18 PM
 • संतकवींमध्ये जे स्थान तुकाराम महाराजांचे आहे तेच स्थान स्त्री संतांमध्ये जनाबार्इंचे आहे. निर्मळ स्वभावाच्या जनाबार्इंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गोदावरी किनारी असलेल्या गावी झाला. या गावात दमा आणि करुंडा हे परम विठ्ठलभक्त दांपत्य राहत होते. लग्न होऊन कित्येक वर्षे झाली तरी त्यांना संततीसुख नव्हते. असे असतानाही त्यांचा विठ्ठलावरील श्रद्धा-विश्वास कमी झालेला नव्हता.एकदा ठरल्याप्रमाणे दमा पत्नीला घेऊन पंढरीच्या वारीला निघाले. पंढरपूरला आल्यावर कधी एकदा पांडुरंगाचे...
  May 18, 01:25 PM
 • भुवरीं प्रगट होत। अक्कलकोटी वास केला।।जे जे झाले त्यांचे भक्त। त्यात श्रेष्ठ स्वामीसुत।ऐकता त्यांचे चरित्र। महादोष जातील।।महादोष, महापापांचे निर्मूलन करण्याची क्षमता ज्यांच्या चरित्रात आहे, असे श्रेष्ठ स्वामीसुत म्हणजे हरिभाऊ खोत. परब्रह्म श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटला अवतार समाप्तीच्या पूर्वी स्वामीसुतांना आपल्या कृपाप्रसादाची शक्ती देऊन मुंबईला पहिले सेवा केंद्र सुरू करण्याचा आदेश दिला. कोकणातील राजापूर तालुक्यात संपन्न खोत घराण्यात हरिभाऊ जन्माला आले. वडिलांचे...
  May 16, 10:55 PM
 • प्राचीन मराठी संतांपैकी सर्वांत अधिक प्रगल्भ व्यक्तिमत्व लाभलेल्यांमध्ये मुक्ताबाइंची गणना केली जाते. संतांमध्ये सर्वात लहान, त्यातही त्यांचा एकूण जीवनपट अवघ्या 13 वर्षांचा. भारतीय संत परंपरेत कदाचित एवढ्या अल्पवयात समाधी घेण्याचा अधिकार लाभलेली संत मुक्ताबाई हीच एक स्त्रीविभूती असावी. आपले आध्यात्मिक व काव्यविषयक कर्तृत्व प्रकट करण्यास अत्यल्प काळ त्यांच्या वाट्यास आला. मुक्ताबार्इंचे जीवन अल्पकाळ व काव्य अल्पसंख्य असले तरी त्याची उंची अद्भूत व अलौकिक वाटते. तेराव्या शतकातील...
  May 10, 06:41 AM
 • नगर जिल्ह्यातील पारनेर येथे दरवर्षी एक आनंदसोहळा आयोजित केला जातो. हा उत्सव डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी सुरू केला. महाराजांनी पूर्णवाद लिहून तत्त्वज्ञानात मोलाची भर घातली. जीव-जगत आणि जगदीश्वर यांच्यात स्वरूपसंबंध आहे. असा विषय प्रतिपादन करणारे तत्त्वज्ञान म्हणजे पूर्णवाद. त्यांच्या घराण्यात पारनेर येथील दत्ताच्या उत्सवाचा कुळाचार चालत आलेला आहे. महाराजांच्या काकांनी हा कुळाचार-उत्सव साजरा करण्याची सूचना त्यांना केली होती. काकांच्या शब्दाला मान देऊन डॉ. पारनेरकर...
  May 10, 06:36 AM
 • निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चतुष्यांच्या नामघोषाशिवाय वारकरी पंथाला चैतन्यच येत नाही. योगिनी मुक्ताबाईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेचे सिद्ध जीवन होते. मुक्ताबाईच्या लौकिक जीवनाला अलौकिक स्पर्श सहजपणे मिळाला आहे. योगसिद्ध मुक्ताबाई आदिमायेचा अवतार होती. मुंगी उडाली आकाशी।तिने गिळिले सूर्याशी।।हे वचन मुक्ताबाईच्या बाबतीत सार्थ ठरले आहे. सर्व भावंडांपेक्षा लहान असूनही पोरके झाल्यानंतर मुक्ताईने परिपक्वतेने, जबाबदारीने तिन्ही भावंडांना सांभाळले,...
  May 10, 06:32 AM
 • नामस्मरण करताना आपण ते वाणीने म्हणजे मुखाने करतो. या तोंडाने म्हटल्या जाणा-या नामाविषयी रामचरित मानसमध्ये संत तुलसीदासांनी एक सुंदर दोहा दिलेला आहे. ते म्हणतात-राम नाम मनिदीप धरू जीह देहरी द्वार।तुलसी भीतर बाहिरेहुं जौं चाहसि उजिआर।।राम नाम रूपी मणिदीपक वाणीच्या द्वारातील जीभरूपी उंबरठ्यावर ठेवले तर आत आणि बाहेर दोन्हीकडे प्रकाश पडेल. नामस्मरणाचा आत-बाहेर होणारा परिणाम तुलसीदासांनी या दोह्यात मांडलेला आहे. दोन खोल्यांच्या मध्यावर आपण ट्युबलाईट लावली तर एकाच ट्युबलाईटचा प्रकाश...
  May 10, 05:56 AM
 • संसारिक आयुष्यात महादेवाचे स्वरूप आणि चरित्र संतुलन आणि ताळमेळाची आदर्श प्रेरणा आहे. महादेव सृष्टीचे रचनाकार ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू या सर्व देवांचे प्रिय आणि पूजनीय आहेत. महादेवाचे संहारक रूप जगाचे रचनाकार आणि पालनकर्ते यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा नाश करून जगामध्ये संतुलन कायम ठेवतात. याच कारणामुळे व्यवहारिक आयुष्यात सर्व दु:ख, कलह, दरिद्रता हे दोष दूर करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी महादेवाच्या छोट्या-छोट्या मंत्रांचा जप करावा. या मंत्रांमुळे...
  May 7, 03:14 PM
 • आपल्या महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत लक्ष्मीनृसिंह आहे. माझ्या मुलाने मला विचारले, आपलेही कुलदैवत नृसिंह आहे आणि तुम्ही मला ज्या फोटोला नमस्कार करायला सांगता, मी ज्या मूर्तीला रोज पाहतो ती मूर्ती आणि फोटो एकट्या नृसिंहाचा नसून लक्ष्मीनृसिंहाचा कसा काय आहे? त्याचे हे साधे विचारणे मला एकदम अस्वस्थ करून गेले. मला माहीत असलेली नृसिंहाची अवतारकथा, त्या अवतारावेळी लक्ष्मीचे अस्तित्व कोठेही उल्लेखित करत नव्हती. नृसिंहावताराच्या वेळी तेथे लक्ष्मी प्रगट झालेली आख्यायिका नसतानाही अनेक...
  May 3, 04:39 AM
 • वयाच्या 29व्या वर्षी घरदार सोडून सहा वर्षे अरण्यात तपस्या करणार्या सिद्धार्थ गौतमाला जो बोध झाला तो आजवरचा सर्वर्शेष्ठ शोध आहे. जेव्हा सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला तेव्हा दोन विचारधारा प्रमुख होत्या- एक म्हणजे खा, प्या, मजा करा असा टोकाचा भोगवाद आणि दुसरा प्रकार म्हणजे शरीराला आत्यंतिक त्रास होईल अशी तपस्या सांगणारा वैराग्य मार्ग. गौतम बुद्धांनी या दोन्ही मार्गांना त्यागून मध्यम मार्ग शोधला. ज्याला सम्यक संबोधी असे म्हटले गेले. सिद्धार्थ गौतमाला मानवी दु:खाचे मूळ कारण सापडले,...
  May 3, 04:34 AM
 • व्यवहारीक आयुष्यात धनवान असणे हे वरदान मानले जाते तर त्याच्या विरुद्ध स्थितीत पैशांचा आभाव हा अभिशाप मानला जातो. कराण सुख, शांती आणि पुरुषार्थ प्राप्तीसाठी आर्थिक संपन्नतेचे महत्त्व धर्मशास्त्रात देखील सांगितले गेले आहे. तर दुसरीकडे, दारिद्रयामुळे व्यक्तिच्या जीवनात अशांती निर्माण होते, सहाजिकच कलह वाढतात, निराशावादी मनोवृत्ती निर्माण होते. त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या कुटूंबाला सुखी ठेवण्यासाठी धन संचय करीत असेत. मात्र काही कारणांमुळे कठोर मेहनत करुनही धन प्राप्ती...
  May 1, 02:51 PM
 • हिंदू धर्मात अतिथी देवो भवं मानले जातात, आणि त्यामुळेच घरी आलेल्या पाहुण्यांचे आगत-स्वागत केले जाते. त्यांची सेवा केली जाते. केवळ पाहुण्यांचा सन्मान म्हणून या गोष्टी केल्या जात नाहीत तर त्यामागे धार्मिक परंपरा आहेत. त्यात व्यवहारिक दृष्टीकोण देखील आहे. समाज जीवनात समाजाकडून काही आपेक्षा करत असतांना निःस्वार्थ भावनेने समाजाला काही देण्याची देखील आपण तयारी दाखवली पाहिजे. तसा संकल्प केला पाहिजे. मनुष्यजीवन कृतार्थ - सार्थकी लावायचे असेल तर, प्रेम, शांती, बंधुभाव, मदत आणि परोपकार याशिवाय...
  April 29, 02:22 PM
 
जाहिरात

RECOMMENDED