Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • भगवान श्रीकृष्णला योगेश्वर किंवा कर्मयोगी म्हणून देखील ओळखले जाते, कारण श्रीकृष्णाचे जीवन लीलावांमध्ये कर्म आहे, योग आहे, विज्ञान आहे, जे युग- युगांतरापासून माणसाच्या जीवनाला उपयोगी ठरत आहे. श्रीकृष्णाच्या कर्माच्या पाठीमागे पुरूषार्थ आणि मेहनत, योगाच्या पाठीमागे तन, मन यांना संयमाने साधुन जीवनाला अनुशाशित आणि संतुलित करण्याचा भाव आणि संदेश लपलेला आहे. आजच्या युगात जर तुम्हाला कमी कालावधीत यश प्राप्त करायचे असेल तर श्रीकृष्णाने सांगितलेला धडा लक्षात ठेवा...
  August 8, 12:57 PM
 • माझा जन्मदिन जन्माष्टमी म्हणून साजरा व्हावा,असे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितल्याचा भविष्य पुराणात उल्लेख आहे. हे व्रत केल्याने सुखशांती प्राप्त होईल असे कृष्णाने सांगितले. मथुरेत सुरू झालेले हे व्रत हळूहळू सगळीकडे केले जाऊ लागले. या वर्षी जन्माष्टमीचे हे व्रत 10 ऑगस्ट रोजी आहे. श्रीकृष्णाचे हे जीवनसिद्धांत अंगीकारून सर्वश्रेष्ठ व्हा संरक्षण - भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर विश्वास ठेवणा-यांचे उत्तम संरक्षक होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगातून याची प्रचिती येते. गोधन व...
  August 5, 01:50 AM
 • महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा शिवमंदिर संस्कृतीच्या आध्यात्मिक सेतूने जोडल्या गेल्या आहेत. यामुळे लोकपरंपरेच्या सामाजिक ऐक्याचा एकोपा शिवालयातील शिवलिंग दर्शनाने जमलेल्या भाविकांमध्ये पाहावयास मिळतो. भाषेची भिन्नता असली तरीही श्रद्धास्थान मात्र एकच असतात याची अनुभूती कुडल संगम गावातील हरिहरेश्वर मंदिरातून होते.सोलापूरपासून 30 किलोमीटरवर भीमा व सीना नदीवरील संगमालगत असलेल्या या मंदिरातील शिवलिंगाला 365 शिवमुद्रा आहेत.मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत व सोलापूरपासून केवळ 30...
  August 3, 12:25 PM
 • मनुष्याला दोन गोष्टींची काळजी नेहमी लागलेली असते. एक काळजी मृत्युची व दुसरी काळजी संसाराची. मृत्युची काळजी करणे व्यर्थ असते. कारण ज्या पुर्वकर्माने देह जन्मास येतो ते जोपर्यंत भोगायचे असते तोपर्यंत मृत्यू येत नाही. ज्याक्षणी पूर्वकर्म संपते त्याच क्षणी देह कालवश होत असल्याने तेव्हां मृत्यू नको म्हणून चालत नाही. विवेकी माणसाने व्यवहारदृष्ट्या देह सांभाळून वागावे पण अध्यात्मदृष्ट्या मनाने मृत्यूला तोंड देण्यास तयार असावे. संसाराच्या काळजीची गम्मत अशी आहे की, आपण काळजी केली वा न केली...
  August 1, 07:26 PM
 • प्रत्येक कर्माच्या वेळी प्रत्यक्ष सान्निध्याने आचार, विचार आणि आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एखाद्या प्रतीकाची आवश्यकता असते. त्याशिवाय धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ साधता येत नाहीत .संस्काराचा पाया घडवणारा श्रावणी उत्सव आज आहे. श्रावणी पौर्णिमेस सर्व ब्रह्मवृंद उपनयन संस्कारानंतर यज्ञोपवीत (जानवे) धारण करतात. ब्राह्मणांचे काही गुण दया, क्षमा, शांती, त्याग आदी सांगितले गेले आहेत. हिंदू धर्मात, परंपरेत, विचार प्रणालीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतीक म्हणून यज्ञोपवीत धारण...
  August 1, 01:44 PM
 • राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. हा सण बहिण-भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. श्रावण शुध्द पौर्णिमेस राखी बांधावी असे शास्त्रात सांगितले गेले आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? सर्वात पहिल्यांदा राखी कोणी बांधली होती? या सणाबाबत खूप कथा प्रचलित आहेत. त्यापैकी एक निवडक कथा खालील प्रमाणे आहे...एकदा देव आणि राक्षसांमध्ये बारा वर्षापर्यंत युद्ध सुरु होते. त्या युद्धात देवतांना विजय प्राप्त करणे अशक्य दिसू लागले. त्यामुळे घाबरलेले इंद्रदेव देवगुरु बृहस्पतीकडे मदत मागण्यासाठी...
  August 1, 01:16 PM
 • जीवनात मनुष्याला सुख आणी दुःख यांचे मिश्रण अनुभवावे लागते. त्यात सुखाचे प्रमाण अधिक का दुःखाचे हा प्रश्न ठ्दावेल बाजूला ठेवू. पण अत्यंत थोर माणसापासून ते लहानापर्यंत सर्वांना म्हणजे अवतारी माणसांनासुद्धा सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख या क्रमानेच जीवन जगावे लागते. त्यामध्ये घोटाळा असा होतो की, सुखाचा काळ सुरु असताना सामान्य माणूस अगदी हुरळून जातो. पण त्याला हे माहित नसते की, तो काळ तसाच राहत नाही. तो पालटला की, सुखमय परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. मग मात्र माणूस दुःखाने होरपळून जातो....
  July 30, 03:04 PM
 • श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महादेवाला समर्पित आहे. धर्मशास्त्रानुसार श्रावण शुक्ल एकादशी आज ( २९ जुलै रविवार) आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हणतात यामागे एक प्राचीन कथा आहे. द्वापार युगाच्या प्रारंभीचा काळ होता. महिष्मतीपुरच्या महिजीत राजास संतती नसल्याने त्याचे राज्य त्यांला सुखद वाटत नव्हते. स्वतःची बिकट अवस्था पाहून त्यांना खूप चिंता वाटू लागली. एकदा ते प्रेजेला म्हणाले...प्रजाजनहो! या जन्मात माझ्याकडून कोणतेही पापकर्म झालेले नाही. मी...
  July 29, 01:53 PM
 • भाषा म्हणजे बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य मानले जाते. मानवी जीवनातील व्यवहारांमध्ये शब्दाचे सामर्थ्य पुनः पुनः प्रत्ययास येते. पण समान माणूस देवाने दिलेली ही शक्ती उगीचच वाया घालवतो. भगवंतासाठी जगणाऱ्या माणसाने प्रथम आपले बोलणे ताब्यात ठेवले पाहिजे. मौन पाळले तर बोलणे आवरले जाईल. पण व्यवहार अडेल म्हणून मौनाऐवजी वाणी देवाच्या नामस्मरणात गुंतवून ठेवावी. आपल्या वाणीला देवाच्या नामस्मरणाची सवय लागली तर बोलणे प्रमाणशीर होईल आणि व्यवहार नीट पार पडेल.अहंकार म्हणजे मीपणा आणि मीपणा म्हणजे...
  July 27, 07:13 PM
 • मनुष्याला जीवनात अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. प्रत्येक अडचणीवर मात करून मनुष्य आपले आयुष्य जगात असतो. परंतु जीवनात पैश्याची कमतरता असेल तर आयुष्य जगणे फार कठीण जाते. पैश्याच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी श्रावण महिन्यात महादेवाची उपसणे करणे हाच एक उत्तम मार्ग आहे. धन प्राप्तीसाठी खाली दिलेला उपाय करा.- श्रावण महिन्यात सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन खाली दिलेल्या मंत्राचा जप करा आणि महादेवाला (बिल्वपत्र) बेलाचे सात पाने अर्पण करा मंत्र ओम ह्रीं...
  July 27, 02:48 PM
 • हिंदू धर्मात रुद्राक्षाचे विशेष महत्व आहे. कारण रुद्राक्ष महादेवाच्या स्वरूपाशी निगडीत आहे. महादेवाचे उपासक रुद्राक्षाच्या माळा धारण करतात, रुद्राक्षाच्या माळेने जप केला जातो. रुद्राक्षाचा अर्थ असा आहे की, महादेवाच्या डोळ्यातून निघालेला अक्ष म्हणजे अश्रू. शिवमहापुराणातील विद्येश्वरसंहिता या भागात रुद्राक्षाचे १४ प्रकार सांगितले गेले आहेत. प्रत्येकाचे महत्व आणि धारण करण्याचा मंत्र वेगवेगळा आहे. यांना धारण केल्याचे फळही विभिन्न आहेत. श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण केल्याने...
  July 26, 03:49 PM
 • आपण सारेच उत्तमतेच्या दिशेने निघालेले यांत्रिक आहोत. मानवी जीवनाला उत्तम बनवण्याची धडपडच सर्व क्षेत्रात सुरू आहे. या धडपडीत जे सहभागी असतात तेच खरे आस्तिक! आस्तिक शब्दाचा देव मानण्याशी वा न मानण्याशी काही संबंध नाही. जीवन उत्तम बनवण्याच्या सर्वत्र सुरू असलेल्या पद्धतीत वेगळेपण असू शकते. काहींना सुखाच्या, भोगाच्या वस्तू निर्मिण्यात अथवा कमविण्यात आनंद वाटतो. काही साधेपणाचे जगणे समाधानाचे मानतात. काहींना पूर्ण वैराग्याचे आकर्षण वाटते. काहींना वैभवाचे वेड असते. हे सारेच मानवी जीवन...
  July 26, 06:45 AM
 • माणसाचा अंतःकाळ ही त्याच्या परीक्षेची खरी वेळ असते. अध्यात्माच्या दृष्टीने वरच्या पायरीवर जाण्याची संधी मरणकाळी मिळते. परंतु जन्मभर जी उपासन घडली असेल तिचाच त्यावेळी उपयोग होतो. इतर साऱ्या गोष्टी जागच्या जागी राहतात. खरा हिशेबी माणूस आपला वेळ वाया जाऊ देत नाही. भगवंताचा भक्तच केवळ वेळेच्या बाबतीत हिशेबी असतो.कोणतेही उत्तम ध्येय पदरात पाडण्यासाठी त्यास ध्यास लागणे अवश्य असते. बोलताचालता, उठता बसता आपल्या ध्येयाचे चिंतन घडणे म्हणजे त्याचा ध्यास लागणे होय. भगवंताचा असा ध्यास...
  July 25, 02:29 PM
 • भगवान श्रीरामचंद्र श्रीसमर्थांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या भाषेत श्रीरामाचे नाव पुनः पुनः येते. त्यांना भगवंत श्रीरामाबद्दल भक्तांना काहीतरी सांगायचे असते.भगवंताला अंतःकरणात घट्ट धरून ठेवणे हा परमार्थाचा प्राण आहे. या वस्तूवरून त्या वस्तूवर सतत भ्रमण करण्याची सवय लागलेल्या मनाला एका देवावर स्थिर राहणे अवघड जाते. ही सवय मोडण्यास भक्ताला मोठे मानसिक कष्ट पडतात. ती सवय क्षीण होईपर्यंत भक्ताला चिकटे आभास करावा लागतो. मन एकाग्र करून ध्यान करावे लागते. मन स्थिर झाले तरच भक्त एक...
  July 23, 12:13 PM
 • न्यायाचे देवता शनी देव अनेक कारणांमुळे अनोखे देवता मानले जातात. जिथे शनीची चाल मंद किंवा संथ गतीची मानली गेली आहे, तिथे शनीची दृष्टी वक्रदृष्टी मानली गेली आहे. परंतु शनिदेवाची न्याय करण्याची पद्धत एकदम सरळ आणि सोपी आहे. सत्याने व चांगले आचरण करणाऱ्या लोकांवर कृपा करणे. वाईट आणि अशुद्ध आचरण करणाऱ्या लोकांवर वक्रदृष्टी टाकणे. याच कारणामुळे शुध्द मनाच्या आणि कर्माच्या लोकांना शनिदेव सुखी करतात. शनीच्या महादशेत, साडेसातीत शनिदेवाच्या कृपेने सुख-समृद्धी, सौभाग्य, यश प्राप्त करण्यासाठी...
  July 21, 12:32 PM
 • देहबुद्धीच्या भूमिकेवर स्त्री समागमासारखे उत्कट सुख नाही. आणि बाकीच्या इंद्रियांची सुखे भोगण्यास पैसा उपयोगी पडतो. म्हणून पैसा व कामवासना यामध्ये माणसाचे मन गुंतून पडते. पैसा काय किंवा काम काय, व्यवहाराला दोन्हींची जरुरी असते. पण त्याच्या नादी किती लागावे याचे भान मनुष्याला उरत नाही. म्हणून या गोष्टींची वासना सोडण्यास समर्थ सांगतात. दृश्यामध्ये सुखाचा शोध करणारे मन जीवाला खाली खेचते. त्यामुळे समर्थ रामदास आपल्या श्लोकातून सांगतात की....मना वासना चूकवी येरझारा |मना कामना सांडि रे...
  July 20, 02:37 PM
 • महादेवाच्या महिमांचे वर्णन अनेक धर्मग्रंथात केले गेले आहे. सर्व धर्मग्रंथात एक गोष्ट वारंवार सांगितली गेली आहे की, महादेव आपल्या भक्ताचे कल्याण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळे महादेवाला कल्याणकारी असेही संबोधले जाते. महदेव एवढे दयाळू आहेत की, दररोज एक तांब्याभर पाणी शिवलिंगावर अर्पण केले तर महादेव आपल्या भक्तावर प्रसन्न होतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात शिवाष्टक स्तोत्राचे पाठ केले तर विशेष फळ प्राप्त होते.शिवाष्टक स्तोत्र...जय शिवशंकर, जय गंगाधर, करुणा-कर...
  July 19, 07:48 PM
 • महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे स्तोत्र, मंत्र स्तुती, आरत्या यांच्या रचना केल्या गेल्या आहेत. महादेव या स्तोत्रांमुळे आणि आरत्यांमुळे लवकर प्रसन्न होतात, तसेच भक्तांना मनोवांछित असे फळ प्रदान करतात. महादेवाची पूजा केल्यानंतर आरती आवश्य केली पाहिजे. खाली महादेवाची आरती आरती दिली आहे. ही आरती केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात.आरतीजय शिव ओंकारा भज शिव ओंकारा । ब्रह्मा विष्णु सदाशिव अद्र्धागी धारा ।। हर हर महादेव ।। 1 ।।एकानन चतुरानन पंचानन राजै । हंसासन गरुड़ासन वृषवाहन...
  July 19, 07:32 PM
 • देवांचे देव महादेव हे अद्भुत व अविनाशी आहेत. महादेव जेवढे सरळ आहेत तेवढेच ते रहस्यमयसुध्दा आहेत. त्यांचे राहणीमान, निवासस्थान सर्वकाही इतर देवांपेक्षा वेगळे आहे.आपल्या धर्मशास्त्रात सर्व देवी-देवता अलंकार, वस्त्र, दागीने यांनी सुसज्जित असे दाखवले गेलेले आहेत. तर, महादेव फक्त मृगचर्म(हरणाचे कातडे)गुंडाळलेले आणि भस्म लावलेले असतात. भस्म महादेवाचे प्रमुख वस्त्र आहे, कारण महादेवाचे संपूर्ण शरीर भस्माने झाकलेले असते.संतांचे सुद्धा भस्म हेच एकमात्र वस्त्र आहे. अघोरी, संन्यासी आणि इतर साधू...
  July 19, 07:09 PM
 • हिंदू धर्म शास्त्रात चंद्राला मन आणि जल तत्वाला नियंत्रित करणारा देवता मानले जाते. व्यावहारिक दृष्टीनेसुद्धा मन आणि बुद्धी यांचे संतुलन जीवनातील सर्व कामात यश प्राप्त करून देतात. परंतु १९ जुलैच्या अमावास्येला चंद्र आपल्याला दिसत नसल्याने मनाचे असंतुलन आणि चंचलता वाढत जाणारी अमावस्या मानले गेले आहे. याच कारणामुळे अमावास्येला मन आणि मेंदू शांत ठेवण्यासाठी चंद्राची पूजा आणि मंत्र स्तुती करण्याचे महत्व सांगितले गेले आहे. जाणून घ्या चंद्राची मंत्र स्तुती आणि पूजा विधी....संध्याकाळी...
  July 19, 04:40 PM
 
जाहिरात

RECOMMENDED