Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • वासना सोड म्हटल्याने काही सुटत नाही. मग वासना ठेवायची तर तो कोणाची ठेवाही हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. वासना भगवंताची ठेवावी. इतर वासना माणसाला दुःख देतात तर भगवंताची वासना मनुष्याला आनंद दिल्यावाचून राहत नाही. एखादा माणूस व्यवहारात कितीही मोठा झाला तरी तो अखेर माणूसच असतो. त्याच्या मानवतेच्या-माणूसपणाच्या मर्यादा काही सुटत नाहीत. म्हणून आशा ठेवून त्यांच्या आधीन होण्यात अर्थ नाही.भारतीय संस्कृती मूलतः अध्यात्मप्रधान आहे. ईश्वरदर्शन हे जीवनाचे उत्तम ध्येय अध्यात्मात मानले जाते....
  July 18, 01:05 PM
 • श्रावण हा पूर्णपणे महादेवाची उपासन करण्याचा महिना आहे. या महिन्यात महादेवाला प्रस्सन करण्यात भक्ताला यश मिळाले तर, प्रत्येक काम सोपे होईल. शिवपुराणानुसार विभिन्न पदार्थांनी महादेवाचा अभिषेक केला तर, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अडकलेली कामे पूर्ण होतात.
  July 17, 05:46 PM
 • मानवी जीवनाकडे विशाल दृष्टीकोनातून पहिले तर असे अनुभवास येते की, माणसावर पाच शक्ती अंमल गाजवतात.१) निसर्गातील अचेतन शक्ती, प्रकाश, उष्णता, वीज इ. शक्ती आपल्यावर सत्ता गाजवतात.२) जीवनशक्ती : आपले जिवंतपण व देहातील पिंडपोषक क्रिया जीवनशक्तीच्या पुरवठ्यावर अवलंबून असतात.३) मानसिक शक्ती : जीवनातील सुखदुःखांचा परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्या मनोबलावर अवलंबून राहतो.४) संस्कृतीची शक्ती : माणसाच्या कल्पना, भावना, नीतीचा आदर्श, उच्च मुल्ये इ. गोष्टी त्याला संस्कृती प्रदान करते.५) आध्यात्मिक शक्ती :...
  July 16, 02:04 PM
 • शब्द तसे साधेच असतात. लहानसे असतात. तरीही आपल्या ओंजळीत अर्थाचे अथांग आकाश ते सांभाळत असतात. अंघोळ आपल्या सवयीची बाब आहे. स्वच्छतेसाठी ती आपण रोज करतो. काहीजण रोज दोनदाही अंघोळ करतात. पण केवळ शरीर स्वच्छ झाले की सारे भागते का? एवढय़ाने खरेच भागत नाही. शरीरासोबत मन, चित्त, स्वच्छ कसे करायचे? शुचिभरूत होण्यात आणि स्वच्छ होण्यात काय फरक आहे? स्वच्छता ही वरची गोष्ट झाली. शुचिता म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता! स्वच्छतेपासून शुचितेपर्यंत जाणे म्हणजे परमार्थ साधणे. शब्द अगदी लहान पण अर्थात किती फरक आहे,...
  July 14, 02:23 PM
 • लहान असो थोर असो, जन्मास आलेला प्रत्येक जीव आज न उद्या मृत्युच्या तोंडात जाऊन पडतो. जो गेला म्हणून शोक करावा त्याच्या मागोमाग शोक करणा-याचा नंबर लागतो. असा मृत्युलोकाचा व्यवहार आहे. बरें, जो येथून अकस्मात जातो तो पुनः परत येत नाहीच का ? श्रीसमर्थांचे सांगणे असे की, तो पुनः नवा देह घेऊन जन्मतो. त्याचे असे होते की, माणूस देह सोडतो खरा. पण त्याचे मन अनेक व्यक्तींमध्ये व वस्तूंमध्ये अडकलेले असते. त्या आसक्तीने खेचल्यामुळे तो मृत्युनंतरच्या अवस्थेत फार काळ राहत नाही. त्याचे मन जेथे अडकलेले असते...
  July 13, 12:36 PM
 • कौटुंबिक जीवनाचा आनंद, भरभराट, आरोग्यासाठी भारतीय गृहिणींनी सणवार, व्रतवैकल्ये, कुलाचार यांचे पिढय़ानपिढय़ा मनोभावे आचरण केले आहे. परंपरेनुसार भगवान महाविष्णू आणि महालक्ष्मीची आराधना घराघरांत केली जाते. भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक गृहिणी कुळलक्ष्मी असते, भगवती शक्ती असते, म्हणून कुटुंबात पत्नीला सन्मान, आदर, स्नेह मिळत असेल तर घरात वैभव नांदते असे म्हटले जाते.आनंदीआनंद नित्य टिकून राहतो, संतती सद्गुणी, बुद्धिमान, निरोगी जन्माला येते. प्रत्येक गृहिणी अन्नपूर्णा आहे. हा संस्कार...
  July 12, 02:35 PM
 • जन्मास येण्यापूर्वी मनुष्याचा जीव कोठे असतो? मेल्यानंतर त्याचे काय होते? हे सर्व प्रश मनुष्याला पडत असतात. परंतु जन्मलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यूला सामोरे जावेच लागते. मृत्यू आल्यावर कोणाचे काहीही चालत नाही. पण सगळ्यात गूढ असे आहे की, आपल्याला एक दिवस हे जग सोडून जायचे आहे याची सर्वांना खात्री असूनसुद्धा केंव्हा, कोठे व कसे जायचे आहे हे मोठमोठ्यांना कळत नाही. मानवी जीवनात सर्व घटना असंभवनीय असतात. मृत्यूची घटना मात्र शंभर टक्के निश्चित असते. म्हणून या जगास मृत्युभूमी म्हणतात. त्यामुळे...
  July 11, 01:33 PM
 • आपल्या जीवनात गुरुमंत्र खूप महत्त्वाचा असतो. जीवनाची वाटचाल व यशप्राप्तीमध्ये तो वेळोवेळी उपयोगी पडत असतो. जीवनात गुरू जेव्हा मंत्र देत असतो तेव्हा मोठा शक्तिपात होत असतो. हा शक्तिपात आपल्याला सद्गुण जीवनामध्ये उतरवण्यामध्ये मदत करत असतो. आपण मंत्र आणि शक्तिपाताची संकल्पनाही समजून घेणे आवश्यक आहे.शक्तिपात झाल्यानंतर जागृती, सर्मपण, पुरुषार्थ व कर्तव्याची जाण होते. आंतरिक तसेच बाह्य शक्तीचे अवलोकन हे साधनेमध्ये होत असते. भाव, संस्कार, वृत्ती तसेच वासना आदींना क्रियांमध्ये शक्तिपात...
  July 10, 02:49 PM
 • पूर्वकर्माचा जसा संबंध असेल त्याप्रमाणे प्रत्येक जीव जगात जन्म घेतो. त्याच पूर्वकर्मानुसार तो आयुष्य जगतो आणि अखेर मृत्युच्या मुखात विराम पावतो. या जगात अमर कोणीच नाही. प्रत्येकाला मृत्युच्या मार्गाने जावेच लागते. आजवर अगणित माणसे जन्माला आली आणि अखेर मारून गेली. जगामधील आपले नित्याचे जीवन जगण्यासाठी किमान स्वार्थाची आवश्यकता आहे, यात वाद नाही. पण त्या स्वार्थाची अमर्याद वाढ झाली तर जीवनाचा विचका होतो. अतिस्वार्थाने समाजात संघर्ष निर्माण होतो. आणि एक माणूस श्रीमंत तर हजार माणसे...
  July 9, 01:49 PM
 • विज्ञानाच्या मदतीने सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य उलगडू लागले आहेत, परंतु आजही अनेक अंतरिक्षातील अनेक रहस्य कायम आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या गर्भातही अनेक रहस्य दडलेली आहेत. पृथ्वीच्या संदर्भात पाताळ लोक या गोष्टीचा वारंवार उल्लेख केला जातो. पुराणानुसार मृत्युनंतर काही लोक देवाकडे स्वर्गात तर काही पाताळात जातात. पृथ्वीच्या खाली जो आहे तो पाताळ लोक आहे.धर्मशास्त्रानुसार वामन रुपातील भगवंताने बळीराजाला यज्ञप्रसंगी तीन पावलं भूमी मागीतली. भगवंताने पहिल्या पावलात पृथ्वी, आकाश आणि...
  July 8, 11:42 AM
 • जगातील सर्व दृश्य वस्तूंवर काळाची सत्ता चालते. आज आपण श्रीमंतीचा उपभोग घेत असलो तर उद्या ती श्रीमंती तशीच टिकेल असे नाही. काळाच्या मर्जीनेच सर्व घडामोडी घडून येतात. अखेर काळ सर्वांना खाऊन टाकतो.असे जर आहे तर माणसाच्या हातात काय आहे? काळ कसाही आला तरी आपली वासना चांगली ठेवणे हे माणसाच्या हातात आहे. पूर्वसंचीत जसे असेल तसे मानून वैभव भोगील किंवा विपत्ती भोगील. ज्या अंतःकरणात भगवंताचे स्मरण स्थिरावते तेच शुध्द होय. भक्त असाच असतो. उलट दुष्ट वसन पोसणारा माणूस वैभवाने उन्मत्त बनतो. आपण फार...
  July 6, 01:43 PM
 • संतांच्या शिकवणुकीत मोठी शक्ती आहे. ही शक्ती कुठल्या चमत्काराची नाही. चमत्कार वाटावा अशी मात्र ती आहे. कारण शेकडो वर्षांपूर्वी संतांनी जे सांगून ठेवले, ते आजच्या आधुनिकतेतही जसेच्या तसे लागू पडते. थोडा विचार केला की याचेही कारण सहज कळून येते. काळ नावाची गोष्ट प्रत्येक गोष्टीतला रस पिऊन टाकते. त्यामुळे प्रत्येक बाब शिळी होते. कालचे आज नकोसे वाटते. पण, ज्ञान मात्र शिळे होत नाही. त्यातही अंत:स्फूर्तीतून मिळालेले ज्ञान कधीच टाकाऊ होत नाही. उलट अशा शुद्ध ज्ञानाला, नवनव्या काळात, संदर्भाचे...
  July 4, 10:26 PM
 • जैन धर्मात दररोज दान करणे आणि पूजा करणे या दोन बाबींना विशेष महत्त्व आहे. दिगंबर जैन परंपरेतील सर्वप्रधान आचार्यांपैकी एक असलेल्या आचार्य कुंदकुंदांनी रयणसार ग्रंथात हाच उपदेश देत म्हटले आहे की, दाणं पूया मुक्खो, सावयधम्मे ण सावया तेण विणा।।11।। अर्थात धार्मिक गृहस्थ दररोज दान आणि पूजा करण्याचा पुरुषार्थ केल्याशिवाय राहात नाही. जैन धर्मात दानाचे चार प्रकार आहेत. आहारदान, औषधदान, ज्ञानदान किंवा उपकरणदान आणि अभयदान. ही दाने देण्यासाठी निर्ग्रंथ मुनींना उत्तम पात्र म्हटले असून,...
  July 4, 10:16 PM
 • प्राण्यांना आणि माणसांना काळाचे भान असते. पण प्राण्यांना फक्त वर्तमानाचे भान असते तर माणसांना भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांचे भान असते. भूतकाळाचा विचार केला तर शोक निर्माण करतो. भविष्याचे चिंतन काळजी निर्माण करते. वर्तमानाचे चिंतन दुःख निर्माण करते. जे होऊनच गेले आहे त्याबद्दल शोक करणे व्यर्थ आहे. जे होणारच आहे, पण काय होणार ते निश्चितपणे माहित नाही त्याबद्दल काळजी करणे व्यर्थ आहे. आणि जे प्रत्यक्षात घडत आहे. बहुधा आपल्याला न विचरता घडते त्याबद्दल दुःख करणे व्यर्थ आहे. आपणच...
  July 4, 03:49 PM
 • श्रावण महिन्यात महादेवाची अनेक पद्धतीने पूजा केली जाते. या सर्व पूजांमध्ये पंचामृत पूजेचे महत्व अधिक आहे. पंचामृत पूजेमध्ये पाच गोष्टी, ज्यांना धार्मिक दृष्टीकोनातून अमृत मानले जाते. त्या पाच गोष्टी - दुध, दही, तूप, साखर आणि मध या आहेत. पंचामृत स्नान झाल्यानंतर, इतर पूजेच्या सामग्रीने महादेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, पंचामृत स्नानाने आणि पूजेने महादेव भक्तावर लवकर प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. जीवनातील दुःख, भीती, अडचणी दूर करतात. जाणून घ्या श्रावण...
  July 4, 12:35 PM
 • धर्म ग्रंथानुसार श्रावण महिन्यात महादेवाची विधिवत पूजा केली तर, मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हालाही असे वाटत असेल की, आपल्या आयुष्यात नेहमी सुख-समृद्धी राहावी तर, श्रावण महिन्यात आपल्या राशीनुसार खाली दिलेले उपाय करा.
  July 3, 03:49 PM
 • सामान्य माणसावर जेंव्हा एखाद्या दुःखाचा प्रसंग येतो तेंव्हा " माझ्या वाट्यास हे दुःख का?" असे प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर उभे राहते. म्हणून वरील प्रश्नाचे उत्तर एकाच की, आपण जसे कर्म करतो तसे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. प्रत्यक्ष जीवनात आपल्याला जे अनुभव येतात त्यावर शांतपणे विचार करून जीवन समजून घेणे मनुष्याला आवश्यक आहे. एक आहे तर एक नाही असा जीवनाचा घाट आयुष्यात दिसून येतो. हे सत्य एकदा विचाराने पटले की मग आपल्या जीवनातील उनिवांचे दुःख हलके झाल्याखेरीज राहात नाही. जो मनुष्य स्वतःला...
  July 1, 07:34 AM
 • मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धींचे कारण ।मोक्ष अथवा बंधनासुख । समाधान इच्छा ते ।।1।।मन प्रतिमा स्थापिली । मने मन पूजा केली।मने इच्छा पुरविली । मन माऊली सकळांची ।।2।।मन गुरु आणि शिष्य । मन आपलेची दास्य ।प्रसन्न आप आपणास । गती अथवा अधोगती ।।3।।साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात।नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे।।4।।या अभंगात साधक, वाचक, पंडित, श्रोते, वक्ते इत्यादी सर्वांना तुकाराम महाराज सांगताहेत, की मनाला सोडलं तर आणखी दुसरी कुठलीही देवता नाहीये. म्हणून महाराजांनी मनोजय महत्त्वाचा...
  June 30, 11:25 AM
 • एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदीवर अथवा समुद्रावर जाऊन स्नान करून आपल्या कुलदैवताची व विष्णूची पूजा करावी. उपवास करावा. पूजेला एक हजार किंवा एकशेआठ तुळशी वाहाव्यात. उपवास तुळशीपत्र घेऊन सोडवा. या दिवशी रात्र ईश्वरभजन-चिंतनात घालवावी. हरिकथा श्रवण करावी व दुस-या दिवशी सूर्योदयानंतर पारणे सोडावे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या निर्जला एकादशीला भाविक पाण्याचा थेंबदेखील घेत नाहीत. एकादशी व्रतामुळे दुहेरी फायदा मिळत आसतो. पुण्यप्राप्ती होते. मन व चित्त प्रसन्न राहते. पंधरा...
  June 30, 04:34 AM
 • वक्ता, प्रवचनकार, कीर्तनकार हा सकलज्ञान संपन्न आहे, अशी भाबडी समजूत, बर्याचदा र्शोत्यांच्या मनात असते. बरेचसे वाचन, मुबलक पाठांतर, अभिव्यक्तीचे कौशल्य, खरेतर एवढेच वक्ता-प्रवचनकार-कीर्तनकारांचे भांडवल असते. पण र्शोत्यांना मात्र सारे बोलणारे आत्मप्रचितीचे धनी वाटतात. अशा बोलणार्यामागे एखादी गादी, पीठ, परंपरा असेल, तर तो बोलणारा स्वयंभू गुरुपणाला प्राप्तच होतो. अशीमंडळी मग धर्माला, र्शद्धेला भयाची बैठक बेमालूमपणे देतात. कार्पोरेट संताचे राहोच, पण परंपरेच्या पालखीत बसून पारमार्थिक...
  June 29, 06:17 AM
 
जाहिरात

RECOMMENDED