जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Dharm

Dharm

 • जीवन मंत्र डेस्क - मंदिरात गेलेल्या लोकांना तेथील पुजारी प्रसादासोबत देवावर चढवलेले फूल देतात. देवाचा आशीर्वाद म्हणून लोक ते फूलं घरी आणतात. पण ते फुलं आणि हार सुकल्यानंतर त्याचे काय करावे याबाबत चिंता होत असते. काहीतरी अशुभ घडण्याच्या भीतीपोटी लोक ते फुलं आणि हार फेकुन देत नाहीत. आपल्या शास्त्रांमध्ये याचे समाधान दिले आहे. उज्जैनचे पंडित आर.एस. पंड्या यांच्या मते, देवावर चढवलेले फुलं आणि हार यांना दोन-तीन प्रकारे ठेवता येते. घरात ठेवण्यासाठी किंवा विसर्जित करण्यासाठी ग्रंथांमध्य...
  May 1, 04:16 PM
 • वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया किंवा आखा तीज म्हटले जाते. सुख-समृद्धी आणि संपन्नता देणारी ही पवित्र तिथी या वेळेस 7 मे 2019 मंगळवारी आहे. सनातन परंपरेमध्ये अक्षय्य तृतीयेला खूप महत्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी केलेले स्नान-दान, यज्ञ, जप-तप इ. कर्माचे अक्षय्य पुण्य पाप्त होते. या दिवशी विधीने साधना आराधना करणाऱ्या साधकाला माता लक्ष्मीची कृपा होते. पण या दिवशी अजाणतेपणामुळे व्यक्तीकडून काही अशा चुका होतात, ज्यामुळे शुभ गोष्टीऐवजी अशुभ फळ मिळते. 1. अक्षय्य तृतीये दिवशी दानाला विशेष महत्व...
  April 30, 12:10 AM
 • मंगलकार्य आणि शुभ खरेदीसाठी अक्षय्य तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या वेळेस 7 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीया तिथीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. अक्षय्य तृतीयेचा सार्वभौमिक अकालनीय मुहूर्तांच्या तिथीमध्ये समावेश होतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. जाणून घेऊया अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्यामागील चार मान्यता आणि फायदे. - अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीसाठी कोणत्याही...
  April 30, 12:05 AM
 • आयुष्यात मान-सन्मानाचे खूप महत्त्व आहे. असेही म्हटले जाते की, ज्या व्यक्तीला घर-कुटुंब, समाजात कोणताही मान-सन्मान नसेल त्याला जिवंतपणीच मृत्युसामान त्रास सहन करावा लागतो. इतिहसात असे अनेक उदाहरण आढळून येतात, ज्यांनी मान-सन्मानासाठी स्वतःच्या जीवाचीसुद्धा आहुती दिली. याउलट काही लोक असेही असतात, ज्यांना त्यांनी केलेल्या कामांमुळे आयुष्यात कधी न कधी अपयश म्हणजे अपमानाचा सामना करावा लागतो. या कामांमुळे त्यांना मान खाली घालून जगावे लागते. गरुड पुराणामध्ये अशाच काही खास कामांबद्दल...
  April 28, 12:05 AM
 • वैवाहिक जीवन अशाच लोकांचे सर्वात सुखी असते, ज्यांच्याकडे 1. प्रेम, 2. त्याग, 3. समर्पण, 4. संतुष्टी आणि 5. संस्कार, या पाच गोष्टी असतात. या पाच गोष्टींशिवाय दाम्पत्य किंवा गृहस्थ जीवनाची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. सध्याच्या काळात अनेक जोडप्यांमध्ये प्रेम आणि त्यागाची भावना दिसून येते परंतु त्यांच्यामध्ये संतुष्टी नसते. या कारणामुळे सुख कमी आणि दुःख जास्त वाटू लागते. गृहस्थ जीवनात या पाच गोष्टींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. या पाच गोष्टींमधील एकही गोष्ट अपूर्ण असेल तर हे नातं फक्त नातं न...
  April 28, 12:01 AM
 • शुक्रवार, 19 एप्रिलला हनुमान जयंती आहे. मान्यतेनुसार त्रेतायुगामध्ये याच तिथीला महादेवाचे अंशावतार हनुमान यांचा जन्म झाला होता. श्रीरामचरितमानसचे सुंदरकांड हनुमानाला समर्पित आहे. रामायणातील हनुमंताच्या यशाचा दाखला सुंदरकांडामध्ये मिळतो. श्रीरामचरितमानस ग्रंथातील पाचव्या अध्यायाची लोक नेहमी चर्चा करताना दिसतात. या अध्यायाचे नाव सुंदरकांड का ठेवण्यात आले हा प्रश्न सर्वाना पडतो. येथे जाणून घ्या, या प्रश्नांचे उत्तर... श्रीरामचरितमानसमध्ये सात कांड... श्रीरामचरितमानसमध्ये सात...
  April 19, 12:02 AM
 • आज (19 एप्रिल) शुक्रवारी हनुमान जयंती आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला होता. यामुळे या दिवशी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. पूजन विधी - हनुमानाची पूजा सुरु करण्यापूर्वी सर्वात पहिले लोकरीच्या आसनावर पूर्व दिशेला मुख करून बसा. समोर हनुमानाची मूर्ती स्थापित करा. त्यानंतर हातामध्ये अक्षता आणि फुल घेऊन खालील मंत्राने हनुमानाचे ध्यान करा... अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं...
  April 19, 12:01 AM
 • शुक्रवार 19 एप्रिलला चैत्र मासातील पौर्णिमा आहे. या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. मान्यतेनुसार, हनुमानाचा जन्म त्रेतायुगामध्ये याच तिथीला झाला होता. श्रीरामचरितमानसचा पाचवा अध्याय सुंदरकांड आहे. हा श्रीरामचरितमानसमधील सर्वात जास्त वाचला जाणारा भाग आहे कारण यामध्ये बजरंगबलीच्या बळ, बुद्धी, पराक्रम आणि शौर्याचे वर्णन करण्यात आले आहे. सुंदरकांडमध्ये यश प्राप्तीचे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. सुंदरकांडमध्ये पवनपुत्र हनुमानाने सांगितले आहे की यश कसे प्राप्त करावे आणि यश...
  April 18, 12:01 AM
 • धर्म ग्रंथानुसार, चैत्र मासातील पौर्णिमा तिथीला भगवान हनुमानाचा जन्म झाला होता. यामुळे या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव संपूर्ण देशात साजरा केला जातो. यावेळी 19 एप्रिल, शुक्रवारी हनुमान जयंती आहे. या निमित्ताने उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा सांगत आहेत, कोणत्या अवस्थेमध्ये हनुमानाची पूजा करू नये... अस्वच्छ कपड्यात... काही लोक स्नान आटोपल्यानंतर लगेच टॉवेल गुंढाळून इनरवियरमध्येच हनुमानाची पूजा करतात. हनुमानाची पूजा करण्याची ही चुकीची पद्धत आहे. हनुमानाची पूजा करताना शुद्धतेची...
  April 17, 12:01 AM
 • यावर्षी 13 एप्रिलला शनिवारी श्रीरामनवमी आहे. चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी श्रीरामाचे व्रत आणि विशेष पूजन केले जाते. श्रीरामाची पूजा या विधीनुसार करा... पूजन विधी राम नवमीला सकाळी उठून घराच्या उत्तरेला एक सुंदर मंडप बनवून मध्यभागी एक वेदी बनवा आणि त्यावर भगवान श्रीराम आणि सीतेचा फोटो स्थापना करा. त्यानंतर गंध, तुप, फूल, धूप, दिप अर्पण करून श्रीराम आणि सीतेची पूजा करा. त्यानंतर खालील मंत्राचा...
  April 13, 12:03 AM
 • सध्या चैत्र नवरात्री सुरु आहे. नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथिला कन्या पूजन करण्याची प्रथा आहे. यावेळी अष्टमी आणि नवमी तिथी 13 एप्रिलला शनिवारी आहे. धर्म ग्रंथानुसार मुली साक्षात देवीचे स्वरूप असतात यामुळे नवरात्रीमध्ये यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. कन्या पूजन विधी आणि महत्त्व खालीलप्रमाणे आहे. कुमारिका पूजनाचा विधी कुमारिका पूजांमध्ये 2 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलींचीच पूजा करावी त्यापेक्षा कमी किंवा जास्त वयाच्या मुलींची पूजा वर्ज्य सांगण्यात आली आहे. सामर्थ्यानुसार...
  April 13, 12:02 AM
 • या वेळी 13 एप्रिल, शनिवारी श्रीरामनवमी आहे. पंचाग भेदामुळे काही ठिकाणी 14 एप्रिलला रामनवमी साजरी केली जाईल. भगवान श्रीरामाने त्रेता युगामध्ये अत्याचारी रावणाचा अंत केला होता. धर्म ग्रंथानुसार रावण महाज्ञानी, महान शिवभक्त आणि पराक्रमी होता. परंतु त्याला त्याच्या शक्तीवर अहंकार होता. याच अहंकारामध्ये रावणाने एक चूक केली आणि त्याचा सर्वनाश झाला. रामनवमीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगत आहोत, रावणाने कोणती एक चूक केली होती. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, रावणाच्या सर्वनाशाचे कारण...
  April 12, 12:01 AM
 • हिंदू नववर्ष चैत्र मासातील शुक्ल प्रतिपदेपासून सुरु होते. यावेळी 6 एप्रिल शनिवारपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. या वर्षाला हिंदू नव संवत्सर किंवा नव संवत असेही म्हणतात. आपल्या देशात नव्या वर्षाचा, संवत्सराचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या, तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. हा शालिवाहन शक सुरू करणारा राजा शालिवाहन महाराष्ट्रीय होता. भारतातील विविध भागांमध्ये हा दिवस गुढीपाडवा, उगादी इ. नावानी साजरा केला जातो. येथे जाणून घ्या,...
  April 6, 12:01 AM
 • मांगल्याचे प्रतीक असणारा गुढीपाडवा शनिवार (दि. 6 एप्रिल) आहे. यानिमित्त घरोघरी गुढ्या उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस समजला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, त्यामुळे नवीन उद्योग, व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ग्रहांवर आधारित असलेली ही कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते म्हणून...
  April 5, 03:49 PM
 • शुक्रवार, 5 एप्रिलला अमावस्या तिथी आहे. अमावास्येच्या दिवशी येथे सांगण्यात आलेल्या 5 ठिकाणी दिवा अवश्य लावावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊन वाईट काळ दूर होऊ शकतो. अमावास्येच्या रात्री दिवा का लावावा? अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही आणि यामुळे या रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त राहतो. प्राचीन मान्यतेनुसार अमावास्येच्या रात्री घराजवळ काही खास ठिकाणी दिवा लावल्यास नकारात्मक शक्ती सक्रिय होत नाहीत....
  April 5, 02:33 PM
 • या आठवड्यात 5 एप्रिल, शुक्रवारी स्नान, दानाची अमावस्या तिथी आहे. सध्या चैत्र मास सुरु आहे आणि या अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. अमावास्येला घरी आणि मंदिरात विशेष पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अमावस्या तिथीला पितर देवतेसाठी श्राद्ध कर्म केले जाते. पित्रणासाठी धूप-दीप लावले जातात. शुक्रवारी अमावस्या असल्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीसाठी काही खास काम अवश्य करावेत. येथे जाणून घ्या, या तिथीला कोणकोणते शुभ काम केला जाऊ शकतात... पिंपळाची पूजा करावी अमावस्या...
  April 4, 12:03 AM
 • यावेळी चैत्र नवरात्री संपूर्ण 9 दिवस राहील, म्हणजेच तिथीचा क्षय होणार नाही. यासोबतच नवरात्रीमध्ये अनेक शुभ योग जुळून येत आहेत. ज्योतिष विद्वानांनुसार नवरात्रीमध्ये कार्यसिद्धी, अर्थसिद्धी, पद-प्रतिष्ठेसाठी देवी मंदिरांमध्ये विशेष अनुष्ठान केले जातील. नवरात्रीमध्ये जुळून येत आहेत अनेक शुभयोग उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांच्यानुसार नवरात्रीमध्ये पाच सर्वार्थसिद्धी, दोन रवी योग आणि रवी पुष्य योग जुळून येत आहेत. श्रीमद् देवी भागवत आणि देवी ग्रंथानुसार अशाप्रकारचे...
  April 4, 12:02 AM
 • हिंदू धर्म ग्रंथांमध्ये मनुष्याने करू नयेत अशा अनेक कामांविषयी सांगण्यात आले आहे. ही कामे केल्यास न केवळ त्यांचे स्वतःचे तर संपूर्ण कुटुंबाचे अहित होऊ शकते. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शुक्रनीतीमध्ये 4 अशाच कामांविषयी सांगितले आहे. येथे जाणून घ्या, मनुष्याने कोणत्या चार कामांपासून दूर राहावे... श्लोक- अनृतात् पारदार्याच्च तथाभक्ष्यस्य भक्षणात्। अगोत्रधर्माचरणात् क्षिप्रं नश्यति वै कुलम्।। 1. खोटं बोलणे अनेक लोकांना खोट बोलण्याची सवय असते. त्यांना त्यांची ही सवय फार...
  March 26, 12:03 AM
 • फाल्गुन मास पौर्णिमेला होलिका दहन केला जाते. होळी दहनापूर्वी होळीची पुजा केली जाते. यावेळी 20 मार्च, बुधवारी होलिका दहन केले जाईल. धर्म ग्रंथानुसार, होळी पूजन केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. होलिका पूजन विधी आवश्यक सामग्री- रांगोळी, तांदूळ, फूल, हळकुंड, मुग, बत्ताशे, नारळ, इत्यादी पुजेचा विधी एका ताटामध्ये पुजेसाठी आवश्यक असणारी सर्व सामग्री घ्यावी. सोबत एक पाण्याचा भरलेला तांब्या घेऊन होळीचे दहन ज्या ठिकाणी केले जाणार आहे तेथे खाली दिलेल्या मंत्राचा जप करत स्वत:वर व पुजेच्या...
  March 20, 10:22 AM
 • बुधवार, 20 मार्च रोजी होळीचे दहन केले जाईल आणि 21 मार्च (गुरुवार) रंग खेळला जाईल. हा सण साजरा करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. धार्मिक महत्त्व म्हणजे भगवान विष्णु, भक्त प्रल्हाद, असुर राज हिरण्यकश्यपु आणि होलिकाशी संबधित आहे. तर, वैज्ञानिक महत्त्व हे वातावरणातील बदलाशी संबधित आहे. या काळात थंडी (हिवाळा) संपून उन्हाळा सुरू होण्यास प्रारंभ होतो. वातावरणात होणा-या बदलांमुळे अनेक आजार होण्याची भिती अधिक असते. या काळात अनेकांची रोगप्रतिकरक क्षमता कमजोर झालेली असते. त्यामुळे तुम्ही...
  March 20, 12:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात