जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Disha Jeevanachi

Disha Jeevanachi

 • सध्याच्या काळामध्ये मनुष्यावर भौतिक सुखाची इच्छा एवढी हावी झाली आहे की, तो योग्य आणि अयोग्यामधील फरक समजून देखील त्याकडे कानाडोळा करत आहे. हीच विवेकहीनता भविष्यात जीवनामध्ये अशांतता पसरवते. सुखी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी फक्त पैशाच महत्त्वाचा नसून त्यासोबतच सर्व नाते, भावना आणि अदृश देव कृपासुद्धा महत्त्वाची आहे. हिंदू धर्मग्रंथ श्रीरामचरितमानसमध्ये व्यावहारिक जीवनाशी संबंधित एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली आहे. ही गोष्ट आयुष्यात नसल्यास व्यक्ती सुख आणि शांतीने जगू शकत...
  September 17, 12:17 PM
 • प्राचीन हिंदू धर्म ग्रंथ मनुस्मृतीमध्ये मनुष्याला दोष आणि वाईटापासून दूर ठेवून आयुष्यभर सुखी राहण्यासाठी पाच महत्त्वाची कामे सांगण्यात आली आहेत. व्यावहारिक जीवनात कोणताही व्यक्ती या पाच गोष्टींचा अवलंब करून सुख-समृद्धी प्राप्त करू शकतो. विशेषतः मनुष्य स्वभावाचा एक महत्त्वाचा पैलू असा आहे की, तो इतरांमधील कमतरता शोधत राहतो, परंतु दुःखाचे कारण ठरणाऱ्या स्वतःमधील कमतरतेकडे दुर्लक्ष करतो. जीवनात शुभ आणि चांगले फळ प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि स्वतःमधील कमतरता दूर करणे...
  September 17, 12:17 PM
 • लग्न हा आयुष्यातील महत्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर वर-वधुचेच नव्हे तर त्यांच्या कुटूंबीयांचे देखील आयुष्य बदलते. लग्नाचा एक निर्णय आयुष्य बदलून टाकू शकतो. जोडीदाराची निवड काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. आज काल पुरूष सुंदर मुलीशी लग्न करण्यास प्रधान्य देतात परंतु काही सुंदर मुलीही लग्नासाठी अयोग्य असतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कशा प्रकारच्या मुलीशी विवाह करावा आणि कशा मुलीसोबत लग्न करु नये या बाबतीत चाणक्यने काही अचुक धोरणे सांगितली आहेत. पुढच्या स्लाइडवर वाचा लग्ना सबंधी...
  September 12, 10:19 PM
 • अशांती आणि तणाव या गोष्टी विशेषतः कोणत्याही लग्न झालेल्या व्यक्तीच्या मन आणि कामांवर वाईट प्रभाव टाकतात. यामुळे व्यक्तित्व आणि वागणुकीमध्ये होणारे बदल गृहस्थ जीवनाला संकटाकडे घेऊन जातात. शास्त्रामध्ये गृहस्थ जीवनात मर्यादा आणि अनुशासन या गोष्टींचे पालन, सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र मानले गेले आहे. यासाठी शास्त्रामध्ये विशेषतः पुरुषांसाठी गृहस्थ जीवनात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काही खास नियमांचे पालन करणे आवश्यक सांगण्यात आले आहे. या नियमांचे पालन केल्यास व्यक्ती...
  September 12, 10:19 PM
 • सामान्यतः लाज शिष्टाचाराचे एक आवश्यक अंग मानण्यात आले आहे. स्त्रियांसाठी लाज एखाद्या दागीण्याप्रमाणे आहे. परंतु आचार्य चाणक्यांनी काही अशी कामे सांगितली, जी करण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नये. येथे जाणून घ्या, कोणकोणती चार कामे करताना लाज बाळगू नये. आचार्य चाणक्य सांगतात की... धनधान्यप्रयोगेषु विद्यासंग्रहणे तथा। आहारे व्यवहारे च त्यक्तलज्ज: सुखी भवेत्।। या श्लोकामध्ये आचार्य चाणक्यांनी पहिले काम सांगितले आहे पैशाची देवाण-घेवाण. जो व्यक्ती...
  September 5, 04:38 PM
 • गणपती बाप्पा सर्वांचे आराध्य दैवत. संकटांचा नाश करणारा विघ्नहर्ता, कला आणि विद्येची देवता, नव्या कार्याची प्रेरणा असणारी देवता अशा सर्वांच्या आवडीच्या गणेशाचा उत्सव सुरू आहे. गणेशाला आपण एक उत्कृष्ट व्यवस्थापन गुरू म्हणू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या की बाप्पा आपल्या आयुष्याचे आणि कामाचे व्यवस्थापन करण्यात कशी मदत करू शकतात. जेव्हा जेव्हा व्यक्ती संकटात किंवा अडचणीत सापडतो. त्यावेळी आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाचा धावा करतो. परंतु संकटांपासून दूर राहण्यासाठी म्हणा किंवा यश...
  September 5, 09:46 AM
 • जेव्हा महाभारतातील युद्ध सुरु होणार होते, तेव्हा अर्जुनाने कौरवांसोबत भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य इ. ज्येष्ठ महानुभवांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल मनामध्ये स्नेह उत्पन्न झाल्यामुळे युद्ध करण्यास नकार दिला होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला. त्यानंतर अर्जुनाने न केवळ महाभारतातील युद्धामध्ये भाग घेतला तर ते युद्ध निर्णायक स्थितीपर्यंत पोहचवले. श्रीमद्भागवतगीतेला आजही हिंदू धर्मामध्ये पवित्र ग्रंथ मानले जाते. गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाने...
  September 5, 09:00 AM
 • आपल्या देशात 5 सेप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म झाला होता. हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर दुसरे राष्ट्रपती होते. शिक्षण क्षेत्रामधील यांचे अमुल्य योगदान पाहता 5 सप्टेंबरला शिक्षण दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. आपल्या देशात शिक्षक म्हणजे गुरुचे पद खूपच महत्त्वाचे आहे. कबीरदासांनी गुरुचे महत्त्व सांगताना लिहिले आहे की... गुरु गोविंद दोऊ खड़े, काके लागूं पाय। बलिहारी गुरु आपकी, गोविंद दियो बताए।। कबीरदासांनी लिहिलेल्या...
  September 5, 08:53 AM
 • असे म्हणतात की, पहिले सुख निरोगी काया आणि दुसरे धन हे आहे. याचा अर्थ, मनुष्याजवळ कितीही पैसा असला तरी त्याचे शरीर स्वस्थ नसेल तर तो सुखी राहू शकत नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या गोष्टीच्या अभावामध्ये आनंदी राहणे शक्य आहे, परंतु शरीर रोगी असेल तर अपार सुख असूनही दुःख भोगावे लागते. शास्त्रामध्ये आरोग्याला धनापेक्षाही जास्त महत्त्व देण्यात आले आहे. कारण खराब स्वास्थ्य तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकते. शास्त्रामध्ये निरोगी शरीरासाठी नियमित आणि सुनियोजित दिनचर्येचा अवलंब...
  September 2, 02:32 PM
 • घरामध्ये निकामी वस्तू ठेवल्याने कचरा वाढतो, ज्यामुळे घरामध्ये नकारत्मक उर्जा निर्माण होते. या नकारात्मक ऊर्जेमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. या निकामी वस्तूंचा रचनात्मक पद्धतीने उपयोग केल्यास घरातील वास्तुदोष दूर होईल तसेच त्या वस्तू वापरात येतील. सध्याच्या काळामध्ये जवळपास प्रत्येक घरात कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटर वर्क करणाऱ्या लोकांना काही काळापूर्वी डाटा संग्रहित करून ठेवण्यासाठी आणि डाटा एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी सीडीचा उपयोग मोठ्या प्रमाणात...
  September 1, 10:23 AM
 • लग्न हा प्रेत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वपुर्ण क्षण असतो. प्रत्येकजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो. विवाह हे एक असे बंधन आहे जे दोन हृदयांना एकत्र आणते. प्रेत्येक धर्मात लग्नाची पद्धत वेगळी असली तरी ऊत्साह एकसारखाच आसतो. जगात कित्येक असे लोक आहेत जे केवळ जोडीदार निवडण्यासाठी लग्न करत नाहीत तर त्यामागे निरनिराळी कारणे असतात. फक्त इतरांना दाखवण्यासाठी लग्न करणारेही लोक काही कमी नाहीत. पुढील स्लाइ़वर वाचा असे काही कारणे ज्यामुळे लोक विवाह बंधनात अडकतात...
  August 27, 11:55 AM
 • आचार्य चाणक्यांच्या नीतींचे पालन केल्यास व्यक्ती विविध प्रकारच्या अडचणींपासून दूर राहू शकतो. चाणक्यांना त्यांच्या नीतींमुळे आजही सर्वोच्च स्थान प्राप्त आहे. त्यांनी आपल्या नीतीच्या जोरावर बालक चंद्रगुप्तला भारताचा सम्राट बनवले आणि विदेश शासक सिकंदरच्या आक्रमणापासून भारताचे रक्षण केले. चाणक्यांनी एका नीतीद्वारे सांगितले आहे की, मूर्ख व्यक्तीपासून कशाप्रकारे दूर राहावे ज्यामुळे आपण अडचणींत सापडणार नाहीत. आचार्य चाणक्यांनी प्रत्येक स्थितीसाठी वेगवेगळी नीती सांगितली आहे....
  August 22, 10:02 AM
 • जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. सुखी आणि आनंदी जीवनासाठी काही खास गोष्टींचा अवलंब केल्यास कधीही दुःख पदरी पडणार नाही. आचार्य चाणक्यांनी सुखी जीवनासाठी काही खास नीती सांगितल्या आहेत. त्यामधील काही निवडक नीती आम्ही तुम्हाला सांगत आहोत. काय आहे चाणक्य नीती ? चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे...
  August 19, 07:46 AM
 • (फाइल फोटो) जसे आपले विचार असतात त्याच पद्धतीने आपला इतर गोष्टींकडे बघण्याचा द्दष्टीकोन असतो. ब-याच वेळेस आपले विचारच आपल्याला इतरांपासुन दुर करण्याचे कारण ठरू शकतात. तर एखद्याच्या अगदी जवळपण नेऊ शकतात. त्यामुळेच विचार आणि विश्वास या दोन गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या भुमिका निभावत असतात. आपल्या बुद्धीचा विकास लहानपणापासूनच होत असतो.यामध्ये प्रामुख्याने घरातील वातावरण, शिक्षण, आजुबाजुला असलेला शेजार याचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. स्त्री आणि पुरूष यांच्या संबंधाच विचार...
  August 19, 07:46 AM
 • चांगल्या आणि सुखी जीवनासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन करणाऱ्या व्यक्तीला जीवनात कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागत नाही. स्त्री असो किंवा पुरुष दोघांनीही समान रुपात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन न केल्यास भविष्यात भयंकर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. गोस्वामी तुलसीदास रचित श्रीरामचरित मानसमधील लंकाकांडात रावण आणि अंगद या दोघांच्या संवादाचा एक प्रसंग सांगण्यात आला आहे. या...
  August 16, 08:52 AM
 • जाणून घ्या सात फेर्यांचा अर्थ हिंदू धर्मानुसार सप्तपदीनंतरच लग्नाचा विधी पूर्ण होतो. मात्र वैवाहिक जीवनात प्रवेश करणार्या जोड्यांना या विधीला एवढ्या सहजासहजी घेऊन चालत नाही, कारण या सात फेर्या नसून 7 वचने आहेत ज्यांना पूर्ण करून हे नवदांम्पत्य संपूर्ण आयुष्यभर आनंदी राहू शकते. म्हणजेच हॅप्पी मॅरीड लाईफसाठी अग्नीसमोर तुम्ही जे वचन घेतले आहेत त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आजकाल अनेक ठिकाणी असे चित्र पाहायला मिळते की, इकडे भटजीबूवा मंत्र म्हणतात आणि तिकडे हे जोडपे...
  August 12, 02:49 PM
 • पालकांची तक्रार असते की मुले ऐकतच नाहीत. मुलांची तक्रार असते, आई-वडिलांना आमच्यासाठी वेळच नसतो. सर्व कुटुंबीय एकाच छताखाली राहूनही त्यांच्यात संवादच नसतो. प्रत्येक जण आत्ममग्न, स्वत:तच गुरफटलेला किंवा संगणकावर बसलेला असतो. वडील मुलाशी बोलताना नेहमी गंभीरतेनेच बोलताना दिसतात. मुलाला पैशांची गरज असेल तर तो वडिलांशी बोलतो. घराचा उपयोग सगळा राग व्यक्त करण्यासाठी होत असतो. सर्व कुटुंबीय मिळून जेवायला बसले, तरीही काहीतरी अप्रिय विषय निघतो व वादाला तोंड फुटते. कुटुंबात प्रेम मिळाले नाही की...
  August 10, 03:30 AM
 • एखाद्या महिलेला आपल्याकडे आकर्षित करु पाहत असाल तर त्यांच्यांशी मुक्त संवाद साधा. मनमोकळ्या गप्पा मारा. त्यांना आवडणा-या विषयावर चर्चा करा. बहुतेक महिलांना त्यांची स्तुती केलेली आवडते. परंतु आपण स्तुती करत नाही. महिलांना आवडणा-या अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी पुरुष संभ्रमामुळे त्यांच्याशी बोलत नाहीत. महिलांना त्या गोष्टी आवडतील का? असा गंभीर प्रश्न पुरुषांना पडतो. पण आश्चर्यकारक गोष्ट ही आहे, की त्या सर्व गोष्टी स्त्रियांना आवडत असतात. अशाच गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत....
  August 8, 08:57 PM
 • अनेकदा चांगली नोकरी, पैसा असूनही आयुष्यात एकटेपणा येतो. बरेच जण प्रसिद्धी व स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी पछाडलेले असतात. त्यांना स्पर्धात्मक वातावरणात कामासाठी प्रोत्साहन पुष्कळ मिळते, पण एकटेपण त्यांचा पिच्छा पुरवते. एकटेपणातून स्वत:ची सोडवणूक करण्यासाठी काही पथ्ये पाळल्यास आनंद मिळेल. एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी मित्रांची संख्या वाढवण्यापेक्षा समविचारी मित्रांना जवळ करा. समविचारी मित्र असतील तर तुमच्या आवडीच्या विषयांवर चर्चा व शेअरिंग होईल. बोलताना दबाव वाटणार नाही....
  August 3, 08:43 PM
 • कलात्मकता आणि महिला जणू एक समीकरणच बनले आहे. महिलांना कलाकुसर खुप आवडत असते. त्या नेहमी काहीतरी उपक्रम करत असतात. आपले घर सुंदर दिसावे यासाठी नेहमीच झटत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टींमधून कला, सौंदर्य प्रतित होत असते. घरामध्ये काही खाद्य किंवा भोजन महिला बनवत असतील तर त्यातही त्या कलात्मकता आणि सुबकता दर्शवित असतात. अशीच काही कलाकृती आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. ज्याद्वारे तुम्हीही अशी कलाकुसर करुन इतरांना प्रभावित करु शकता. पुढील स्लाइडवर पाहा, महिलांनी केलेली...
  August 1, 05:15 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात